शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

काव्यगत न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 8:27 AM

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया अलिकडे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील न्यायालयात अटक वारंट रद्द करण्यासाठी आल्या होत्या. भाजपा नेते एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी एकूण २२ खटले वेगवेगळ्या न्यायालयात दाखल केले आहेत.

- मिलिंद कुलकर्णीसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अलिकडे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील न्यायालयात अटक वारंट रद्द करण्यासाठी आल्या होत्या. भाजपा नेते एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी एकूण २२ खटले वेगवेगळ्या न्यायालयात दाखल केले आहेत. बदनामी खडसे यांची झालेली असताना त्यांनी स्वत: खटला दाखल न करता कार्यकर्त्यांमार्फत दाखल करून माझा छळ चालविला असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.कर्करोगाने पीडित असल्याने प्रत्येक न्यायालयात जाणे शक्य नसल्याने सर्व खटले एकत्र करावे, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयातही त्यांनी ही कैफियत मांडली, दोनदा त्यांना अश्रू अनावर झाले. न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.भ्रष्टाचाराविरुध्द लढणे चुकीचे आहे काय? असा छळवाद का मांडला आहे, असे दोन प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा व्हायला हवी.भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्रात लढा उभारला तो अण्णा हजारे यांनी. राळेगण सिद्धीत रचनात्मक कार्य केल्यानंतर अण्णा यांनी संपूर्ण देश असा का होऊ शकत नाही, असा प्रश्न समाजाला विचारला. आधी कृती आणि मग उक्ती या प्रकारात अण्णांचे कार्य मोडत असल्याने तरुणांपासून तर विचारवंतांपर्यंत अनेक जण त्यांना जोडले गेले. संघटन तयार होत असताना, कार्य विस्तारत असताना काही पथ्य पाळावी लागतात. आंदोलन हे व्यक्तीकेंद्रित न होता, सामूहिक निर्णयावर भर देणारे असायला हवे. परंतु ते व्यक्तीकेंद्रित राहिले आहे, हा भ्रष्टाचारविरोधी लढ्याला मिळालेला शाप आहे. अण्णा यांच्यासोबत असलेले अनेक विचारवंत, कार्यकर्ते हळूहळू त्यांना सोडून गेले. परवाच्या दिल्लीतील फसलेल्या आंदोलनात कोणीही नामवंत व्यक्ती सहभागी झालेली नव्हती, हे ठळकपणे समोर आले.यापूर्वीच्या दिल्लीतील आंदोलनात सहभागी अरविंद केजरीवाल, किरण बेदी, रामदेव बाबा यांनी राजकीय स्वार्थ साधल्यानंतर आंदोलन वाऱ्यावर सोडले. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची स्थापना मुळात या आंदोलनातून झाली. परंतु पुन्हा केवळ व्यक्तीकेंद्रीत राजकारणामुळे ‘आप’ची प्रतिमा माफीनामा मागणारा आणि पंजाब, गोव्यात पराभूत होणारा पक्ष अशी झाली. दिल्लीत सत्ता असूनही सरकार आणि पक्षात मोठा सावळागोंधळ आहे. योगेंद्र यादव, कुमार विश्वास हे एकेकाळचे सहकारी त्यांना सोडून गेले.भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे चुकीचे नाही, परंतु हा लढाऊ नेता, कार्यकर्ता प्रामाणिक असायला हवा. दुर्दैवाने या चळवळीतील नेते ‘हम करेसो कायदा’ या मनोभूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. माहिती अधिकार कायदा तसेच संबंधितांच्या प्रतिस्पर्धी गटाने दिलेल्या कागदपत्रांवरुन हे नेते मंत्री, राजकीय लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिकांवर थेट आरोप करतात. प्रतिष्ठित व्यक्तींवर आरोप म्हटल्यावर प्रसारमाध्यमे ते उचलून धरतात. विरोधी पक्ष त्याचे भांडवल करतात. समाजदेखील त्यावर विश्वास ठेवतो. न्यायालयाने निकाल देण्यापूर्वीच त्या व्यक्तीची राजकीय, व्यावसायिक मोठी हानी होते. पुन्हा ही प्रकरणे तडीस नेण्याचा उत्साह भ्रष्टाचारविरोधी नेत्यांमध्ये दिसून आलेला नाही. त्यामुळेच केजरीवालांना माफीनाम्याचे सत्र सुरू करावे लागले.दुसºयावर आरोप करताना स्वत: ची प्रतिमा प्रामाणिक, स्वच्छ असायला हवे ना? पण या मंडळींना प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र दुसºयाकडून नको असते, आम्ही प्रामाणिक आहोत, म्हणजे आहोतच. त्याविषयी युक्तीवाद करणे त्यांच्या कार्यपद्धतीत बसत नाही.आता कल्पना इनामदार या अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील कार्यकर्तीने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दमानियांवर आरोप केले. खडसे यांना गुंतविण्यासाठी दमानीया यांनी माझ्याकडे प्रस्ताव दिला होता. तर दमानिया म्हणतात, भुजबळांविरुद्ध लढ्यातून दूर व्हावे, म्हणून इनामदार माझ्याकडे प्रस्ताव घेऊन आल्या होत्या. भ्रष्टाचाराविरुध्द लढणा-या नेत्यांकडून एकमेकांवर होणा-या चिखलफेकीने या चळवळीची होणारी हानी, धोक्यात आलेली विश्वासार्हता हे समाजाच्या दृष्टीने गंभीर विषय आहेत.दमानिया बाई यांनी खडसेंविरुद्ध खटला दाखल केला, तर खडसे समर्थकांनी त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केले. लोकशाही राज्यव्यवस्थेत प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत. ते बजावणे म्हणजे छळवाद कसे म्हणता येईल? आपण वापरला तो अधिकार, दुस-याने वापरला तर तो छळवाद, असे म्हणणे न्यायोचित नाही.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे