शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

राजकीय अगतिकता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 5:49 AM

फडणवीस सरकारने जे निर्णय घेतले, ते वरकरणी सर्वसामान्यांच्या हिताचे भासत असले तरी त्याचे दूरगामी परिणाम राज्याला भोगावे लागतील. एकीकडे उद्योग धोरण जाहीर करायचे आणि नाणार रिफायनरी प्रकल्प वाऱ्यावर सोडून द्यायचा, हे कसे?

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला ते एकाअर्थी बरेच झाले. गेल्या काही दिवसांपासून लोकानुनयासाठी लाभाचे निर्णय करण्याची जी लगीनघाई सुरू होती, त्याला आता चाप बसेल. सरकार निर्णयक्षम असायला हवे, यावर कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जे काही चालले होते, ते आक्षेपार्ह आणि आदर्श आचारसंहितेत बसणारे मुळीच नव्हते. पाच वर्षांसाठी निवडून आलेल्या सरकारांकडे धोरणात्मक निर्णय घेण्यास पुरेसा वेळ असतो. असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर विशिष्ट वर्गाला खूश करणारे निर्णय घेऊन मतांची बेगमी करण्याचा जणू प्रघातच पडला आहे. राज्यातील फडणवीस सरकारही त्यास अपवाद नाही.गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाने दोन डझनांहून अधिक निर्णय घेतले आणि सातशे ते आठशे जीआर काढले. समाजातील सर्व घटकांना खूश करण्याच्या हेतूने घेतलेल्या निर्णयांपैकी मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा जो निर्णय झाला, त्याचा राजकीय लाभ भलेही सत्ताधारी पक्षाला होईल; मात्र त्याचे दूरगामी परिणाम या महानगरावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेला दोन हजार कोेटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. एकीकडे जकातीचे उत्पन्न कमी झाल्यामुळे पालिका प्रशासन उत्पन्नाचे नवे स्रोत शोधत असताना, केवळ राजकीय लाभापायी सरकारने दोन हजार कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडले.५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी आणि नाणार प्रकल्प नको, या प्रमुख दोन अटी शिवसेनेने भाजपापुढे ठेवल्या होत्या. या दोन्ही अटींची पूर्तता करून फडणवीस यांनी राजकीय शहाणपण दाखवले असले, तरी या निर्णयाची झळ भविष्यात राज्यालाच सोसावी लागणार आहे. मुंबईतील घरांच्या किमती बघता ५०० चौ. फुटांचे घर ही मध्यमवर्गीयांना नव्हे, तर उच्चवर्गीयांनाच परवडणारी बाब आहे. या वर्गासाठी करमाफीचा निर्णय घेऊन शहराच्या विकासासाठी लागणारे उत्पन्नच बुडवले गेले. मुंबई हे आता आंतरराष्ट्रीय महानगर म्हणून ओळखले जाते, मात्र दिवसेंदिवस या शहराची बकालावस्था होत चालली आहे. रोजगाराच्या निमित्ताने वाढणारे प्ररप्रांतीयांचे लोंढे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनधिकृत झोपडपट्ट्यांनी या शहराला अक्षरश: वेढले आहे.नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा निर्णयही असाच राजकीय अगतिकतेपोटी घेतला गेला. एकीकडे राज्यात परकीय भांडवली गुंतवणूक व्हावी म्हणून, ‘मेक इन महाराष्टÑ’, ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ’ यासारखे उद्योगस्नेही मेळावे भरवायचे आणि दुसरीकडे आलेल्या गुंतवणुकीला लाथाडायचे. नाणार रिफायनरी प्रकल्पात सौदी अरेबियाची मोठी गुंतवणूक होऊ घातली आहे. तसा करार दोन्ही राष्ट्रांमध्ये झाला आहे. असे असताना केवळ स्थानिकांचा विरोध एवढ्या कारणास्तव हा प्रकल्पच तिथून हलविणे महाराष्ट्रासारख्या उद्यमी राज्याला शोभा देणारे नाही. पण इथेही पुन्हा तीच राजकीय अगतिकता आडवी आली. एन्रॉन प्रकल्पाचा अनुभव गाठीशी असताना त्यातून काही शिकण्याऐवजी आपण पुन्हा तीच चूक करून बसलो आहोत.फडणवीस सरकारने ज्या धोरणाचा डांगोरा पिटला त्या व्यवसाय सुलभतेतही (ईझ ऑफ डुइंग बिझनेस) लागोपाठ दुसऱ्या वर्षी राज्य तळाला गेले आहे. गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणुकीबाबत सरकारने केलेले दावेही फसवे ठरले आहेत. आता पुन्हा नव्या उद्योग धोरणात दहा लाख कोटींच्या गुंतवणुकीचा दावा केला गेला आहे. औद्योगिक क्षेत्रात सध्या मोठी घसरण सुरू आहे. २०१३-१४ या वर्षात राज्यात निर्मिती क्षेत्राचा विकास दर १० टक्के होता. मात्र २०१७-१८ मध्ये हाच दर ७.६ टक्क्यांपर्यंत घसरला. आघाडी सरकारने औद्योगिक वसाहतींमधील जमिनींवर बांधकामांना परवानगी दिली होती. फडणवीस सरकारनेही त्याचीच री ओढली आहे. २० हजार चौरस मीटरची जागा असली आणि सलग पाच वर्षे कारखाना बंद असल्यास या जागेपैकी ४० टक्के जमिनीवर बांधकामांना परवानगी दिली जाईल, अशी धोरणात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात घरबांधणी हाच एकमेव उद्योग असेल आणि त्यातून मूठभरांची घरे भरली जातील.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Electionनिवडणूकnanar refinery projectनाणार प्रकल्प