शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

एक्झिट पोलच्या दाव्यांची पोल‘खोल’

By admin | Published: October 20, 2014 5:58 AM

निवडणूकपूर्व अंदाज, एक्झिट पोलची आकडेवारी तज्ज्ञांनी काहीही दिली असली तरी मतदारांनी आपला कौल देताना बहुतेकांचे दावे खोटे ठरविले आहेत

निवडणूकपूर्व अंदाज, एक्झिट पोलची आकडेवारी तज्ज्ञांनी काहीही दिली असली तरी मतदारांनी आपला कौल देताना बहुतेकांचे दावे खोटे ठरविले आहेत. त्यामुळे अशा चाचण्यांच्या शास्त्रीय आधारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे. १५ आॅक्टोबरच्या मतदानाला ४८ तास बाकी असेपर्यंतच निवडणूकपूर्व अंदाज वर्तविता येतील, असे बंधन निवडणूक आयोगाने घालून दिले होते. मतदान सायंकाळी ६ वाजता संपल्यानंतर तासाभरातच एक्झिट पोलची आकडेवारी विविध टीव्ही चॅनेल्सवर झळकू लागली आणि त्यावर लगेच दावे-प्रतिदावेही सुरू झाले. मतदान संपताच निकाल सांगितल्याच्या आवेशात एक्झिट पोल कसे दिले जात आहेत, अशी विचारणा लगोलग सोशल मीडियातून सुरू झाली होती. भाजपाच्या समर्थकांनी एक्झिट पोलचे समर्थन करीत फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅपवर प्रतिहल्ले चढविले. आता निकालाने सगळे काही स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात अचूक अंदाज वर्तविल्याचा टेंभा मिरविणाऱ्या चाणक्यने भाजपाला १५१ आणि शिवसेनेला ७१ जागा दाखविल्या होत्या. सर्वांत खात्रीशीर एक्झिट पोल असे त्याचे कौतुकही करण्यात आले होते. तथापि, तो सपशेल चुकला. अर्थात हे भाकीत आपल्याकडेच चुकते असे नाही. २००४च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही ते चुकले होते आणि त्याची जगभर चर्चा झाली होती. मतदान करून बाहेर पडता पडता मतदारांचा कौल घेण्याचा प्रयत्न यात केला जातो. या वेळी कोणत्याही एक्झिट पोलचे सर्व पक्षांचे आकडे तंतोतंत खरे निघाले नाहीत, पण काही त्याच्या आसपास पोहोचले़ पाश्चात्त्य देशांमध्ये एक्झिट पोल घेताना जेवढी दक्षता बाळगली जाते आणि बारकावे टिपण्याचा प्रयत्न होतो तेवढी शास्रशुद्ध पद्धत आपल्याकडे आजही अवलंबिण्यात आलेली नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष निकाल आणि एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये बरेचदा तफावत दिसून येते. निवडणूकपूर्व चाचणी किंवा एक्झिट पोलचे काम करणाऱ्या एजन्सी एखाद्या पक्षाची बाजू घेण्यासाठी त्यांना सोईची आकडेवारी देतात, असाही आपल्याकडे मोठा आक्षेप आहे. काही एजन्सींनी आर्थिक देवाणघेवाणीच्या मोबदल्यात अनुकूल आकडेवारी देण्याची तयारी दर्शविली होती, असे एका स्टिंग आॅपरेशनमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी समोर आले होते. भारतातील अशा बहुतेक चाचण्या या मोठ्या मीडिया हाउसच्या माध्यमातून करण्यात येतात आणि या हाउसच्या राजकीय सलगीबाबत उलटसुलट चर्चा होत आली आहे. कमी मतदारसंख्या असलेल्या लहान देशांमध्ये एक्झिट पोलची आकडेवारी खरी निघू शकते. मात्र, भारतासारख्या विशालकाय देशात हे प्रचंड किचकट असे काम असते. भाषिक, धार्मिक आणि जातीय वैविध्य असलेल्या मतदारांचा अंदाज एकाच कसोटीवर मोजणे कठीण होऊन बसते.