शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

स्तुतीपाठक, नको रे बाबा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:45 AM

मिलिंद कुलकर्णी जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन महाराष्टÑभर क्षोभ उसळला आहे. शिवप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त ...

मिलिंद कुलकर्णीजयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन महाराष्टÑभर क्षोभ उसळला आहे. शिवप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर हे पुस्तक मागे घेण्यात आले. स्तुतीपाठकांनी गोची केल्याचे हे नवे उदाहरण म्हणावे लागेल.समाजाच्या सर्वच क्षेत्रात स्तुतीपाठकांची जमात असते. त्यांची ओळख पटविणे नितांत आवश्यक आहे. अन्यथा फसगत झालीच म्हणून समजा.तुम्हाला मिळत असलेले यश, पद आणि प्रतिष्ठा ही तुमच्या मेहनतीचे फळ असतेच असते, परंतु, त्यासोबतच अनुकूल परिस्थिती, अनेकांनी तुम्हाला कळत नकळत केलेली मदत किंवा सहाय्यकारी भूमिका याचाही वाटा असतो. त्याची कायम जाणीव ठेवणे आवश्यक आहे. गफलत याचठिकाणी होते. यशाचे श्रेय घ्यायला सगळे तयार असतात, पण अपयशाला बाप नसतो, असे म्हटले जाते, ते याचसंदर्भात.नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. सलग दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पूर्ण बहुमत मिळविले आहे. त्यांच्या कामगिरीविषयी सहमती आणि आक्षेप असे दोन्ही विचारप्रवाह असू शकतात. परंतु, त्यांची तुलना महापुरुषांशी करुन लेखक गोयल हे मोदी यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या या उपद्व्यापामुळे मोदी आणि भाजपविषयी खप्पामर्जी होण्याची शक्यता दाट आहे. भाजप कार्यालयात आणि पदाधिकारी श्याम जाजू यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याने भाजपविषयी शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. स्तुतीपाठकांना वेळीच ओळखणे आणि त्यांच्या कारवायांपासून पक्ष व नेत्याला दूर ठेवण्याचे कार्य खरे तर व्हायला हवे, पण तसे होत नाही.नरेंद्र मोदी यांचे सहकारी अमित शहा यांना ‘चाणक्य’ म्हणून उपाधी दिली जाते. हे स्तुतीपाठकांचेच काम आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा यश मिळण्यात तसेच इशान्येतील काही राज्यांमध्ये मिळालेल्या यशात मोदींसोबत शहा यांचाही वाटा असेल. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाचे राष्टÑीय अध्यक्षपद आणि नंतर केंद्रीय गृहमंत्रीपद देण्यात आले. पण, ‘चाणक्य’ संबोधणे अतिशयोक्ती ठरु शकते. त्यांच्या स्वत:च्या गुजराथ राज्यात भाजपला बहुमतासाठी धडपडावे लागले. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्टÑ, छत्तीसगड या राज्यात पराभव पत्करावा लागला. कर्नाटक आणि हरियाणात तडजोडीमुळे सत्ता आली. सीएए, एनआरसी संबंधी देशभर आंदोलनांचा उडालेला भडका हा शहा यांच्या गृहमंत्रालयाच्या अंदाजापेक्षा मोठा आहे. गुप्तचर यंत्रणांना याची पूर्वकल्पना नाही. हे कथित ‘चाणक्यांं’चे अपयश नाही का?महाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना मोदींबरोबर करणारे स्तुतीपाठक आहेत. ‘मी पुन्हा येईन’ हे अशा स्तुतीपाठकांचे कृत्य आहे. ‘महाजनादेश यात्रे’च्या निमित्ताने स्वत:वर प्रकाशझोत ठेवण्याची फडणवीस व त्यांच्या गटाची खेळी उलटली आणि संपूर्ण अपयशाचे धनी ते एकटे ठरले. सामूहिक निर्णय प्रक्रिया ही भाजपमधील नैसर्गिक संस्कृती असताना फडणवीस यांनी मोजक्या मंडळींना सोबत घेऊन सरकार आणि पक्ष चालवला आणि सरकार घालवण्यास या गोष्टी कारणीभूत ठरल्या.फडणवीस यांच्या निकटवर्तीयांनाही मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले, ते स्तुतीपाठकांनी त्यांना फुलविल्यामुळेच. एक किस्सा जळगाव जिल्ह्यात घडलेला. फडणवीस हे परदेशी गेले असताना त्यांनी कामकाज पाहण्यासाठी काही मंत्र्यांची एक समिती गठित केली होती. त्यातील एक मंत्री अमळनेरला आले होते. कंत्राटी शिक्षकांनी त्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. मी मुख्यमंत्री आहे, तुमची समस्या २४ तासात सोडवेन असे त्यांनी राणा भीमदेवी थाटात सांगितले. अर्थात ही समस्या अद्यापही सुटलेली नाही. पण त्या मंत्र्यांना स्वत:च्या जिल्ह्यातून भाजपचा एक आमदारदेखील निवडून आणता आला नाही. एवढेच काय त्यांना स्वत:साठी दुसºया जिल्ह्यात सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला.असेच एक दुसरे मंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय होते. स्तुतीपाठकांना या मंत्र्यांच्या कार्याचा मोठा अभिमान होता. मुख्यमंत्र्यांचे ‘यांच्याशिवाय’ पान हलत नाही, हे ते ज्याला त्याला सांगत असत. काहींनी तर मतदारसंघात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फलक झळकवले. मात्र या मंत्र्यांना पक्षाने सोपविलेली जबाबदारी विधानसभेत पार पाडता आली नाही. स्वत:च्या जिल्ह्यात पक्षाचे बळ खालावले.म्हणून म्हणावेसे वाटते, एकवेळ निंदकाचे घर शेजारी असलेले परवडते,पण आजूबाजूला स्तुतीपाठक नको रे बाबा...

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव