- अभिषेक मनु सिंघवीकॉँग्रेसचे ज्येष्ठ नेतेमी माझ्या लेखाची सुरुवात इंदर मल्होत्रा यांनी प्रणव मुखर्जी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने करतो. मुखर्जी यांचे बहुआयामीे व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेस पक्षासाठी ते किती महत्त्वाचे होते हे त्यावरून सहज लक्षात येते. मल्होत्रा त्यांचा उल्लेख आघाडीचे नेतृत्व, विघ्नहर्ता, संकटरोधक, सळसळते व्यक्तिमत्त्व असा करत असत. त्यांच्या मते, ते एकप्रकारे शासनाचे हृदय आणि आत्मा होते. आपल्या आयुष्याची सुरुवात अत्यंत सामान्यपणे करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने एवढे यशोशिखर गाठणे खरोखरच विस्मयकारक आहे. बालपणी त्यांना घराजवळच्या शाळेत जाण्यासाठी काही मैल पायी जावे लागत असे, आणि पुढे ते देशाचे सर्वोच्च नेते बनले. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या आणि दुसºया सरकारमध्ये ते सर्वेसर्वाच होते. अनेक प्रकारच्या मंत्रिगटांचे त्यांनी केलेले नेतृत्व याची साक्ष देते. ते अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. त्यामुळेच ते काळ, अंतराळ आणि ज्ञानाच्या पलीकडे जाऊ शकत. या वैशिष्ट्यांमुळेच ते भारतीय राजकारणात नवे आयाम स्थापित करू शकले, जे आजवर कुणालाही शक्य झाले नाही.गेल्याच वर्षी त्यांनी माझ्याशी पश्चिम बंगालच्या राजकारणातील ऐतिहासिक क्रांतीवर तासभर चर्चा केली होती. ते फारच शिस्तप्रिय होते. अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत दैनंदिनीचे काटेकोरपणे पालन सातत्याने करत असत. अतुल्य घोष यांनी चुकीच्या पद्धतीने अजोय मुखर्जी यांना पक्षातून काढले व त्यातूनच बांगला काँग्रेसची व १९६७ साली प्रणवदा यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली, असे ते रात्री उशिरा होणाºया आमच्या बैठकांमध्ये सांगायचे.बांगला काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठविले. तेथे त्यांचे उद्योगविषयक ज्ञान व विश्लेषण क्षमतेने इंदिरा गांधी प्रभावित झाल्या व यातूनच त्यांच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना इंदिरा गांधी यांनी देशाचे वाणिज्य मंत्री केले. त्यांना हद्दपार केल्यानंतर (त्यासाठी जबाबदारी व्यक्तीचे नावही त्यांनी सांगितले होते) राजीव गांधी यांनी स्वत: त्यांना प्रवक्ता म्हणून नियुक्त केले. हिंंदीवर हवे तसे प्रभुत्व नसणे व दुसरे म्हणजे तोवर कधीही लोकसभेवर थेट निवडून न जाणे(नंतर ते निवडून गेले) या दोन कमतरतांमुळे कधीही पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली नाही, असे ते नेहमी सांगत. मात्र देशाला कधी पश्चिम बंगालमधून राष्ट्रपती किंवा पंतप्रधान मिळू शकलेले नाहीत याचीदेखील ते आठवण करून देत. भारताला हे असे अविश्रांत काम करणारे व्यक्तित्त्व, प्रामाणिक श्रमांसाठी न संपणारा उत्साह असलेले चाणाक्ष सल्लागार आणि भक्कम स्थिरता असलेले प्रबुद्ध तत्त्वज्ञानी तसेच मार्गदर्शक लाभला, हे देशाचे सौभाग्यच होते.प्रणवदांनी कधी कुणाविषयी आकस धरला नाही, कधी कुणाशी सूडबुद्धीने वागले नाहीत. त्यांची व्यक्तिरेखा, त्यांची कार्यशैली आणि त्यांचा समतोल दृष्टिकोन यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व पक्षात व बाहेरही उठून दिसत असे. म्हणूनच भिन्न राजकीय विचारसरणी असलेली अन्य पक्षातली नेतेमंडळीही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत चर्चा करीत असत. कोणत्याही व्यक्तीच्या मूल्यमापनासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येकी चार महत्त्वपूर्ण निकषांवर, प्रणवदा खरे उतरत होते. त्याची प्रतिभा महान होती. त्यांची वैचारिक बांधिलकी स्पष्ट व सातत्यपूर्ण होती आणि सामाजिक व आर्थिक मुद्यांबाबत त्यांचा दृष्टिकोन संतुलित होता. प्रणवदांशी संवाद साधणाºया कोणत्याही व्यक्तीवर पहिली छाप पडायची ती त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची. त्यांच्या विचारांनी जणू संमोहित होऊनच त्यांना भेटणारे बाहेर पडत असत.- हे सारे आता संपले!
प्रणव मुखर्जी : वैचारिक स्थिरता असलेला प्रबुद्ध तत्त्वज्ञानी !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 5:11 AM