पश्चिमेला अरबी समुद्र तर मध्य महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगा आहेत व पूर्वेला पठारे आहेत. या भौगोलिक विविधतेमुळे येथील हवामानात बदल होत जातो. कोकण व पश्चिम विभागात खूप पाऊस पडतो. तर मध्य महाराष्ट्रात त्या अनुषंगाने कमी पाऊस पडतो तर काही ठिकाणी जास्त. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमीच आहे. वर्षभर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सगळेच ऋतू अनुभवास मिळतात. शिवाय नैसर्गिक आपत्तींचा देखील सामना करावा लागतो.हवामान खाते गारपिटीबाबतचा अंदाज व्यक्त करीत असते. अंदाज वर्तविण्यासाठी डॉप्लर, रडारचा आधार घेतला जातो. भारतीय हवामान खात्याने डॉप्लरचे जाळे संपूर्ण देशभरात पसरविले आहे. महाराष्ट्रातील कुलाबा येथे कार्यरत असलेल्या डॉप्लर आणि रडारद्वारे ३-४ तास आधी गारपिटीचे पूर्वानुमान देता येते. शिवाय रत्नागिरी आणि औरंगाबाद येथे देखील अशी यंत्रणा उभी करण्यावर भर दिला जात असून, या माध्यमातून नैसर्गिक आपत्तींचा अगोदरच अंदाज घेणे आणखी सोपे होईल.ज्यात पावसाळ्यात पूर, पावसाळ्यानंतर अतिउष्ण हवामान, हिवाळ्यात शीत लहरी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि उन्हाळ्यात अतिउष्ण तापमान, उष्ण लाट पाहण्यास मिळते. गेल्या दोन वर्षांतील हवामान पाहिले तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी हिवाळ्यात गारपीट तर कधी अवकाळी पाऊस झाला. हवामान खात्याने नैसर्गिक आपत्तींबद्दल पूर्वानुमान दिले होते. शिवाय हवामान खात्याच्या वतीने त्या संबंधीच्या सूचना राज्याच्या नैसर्गिक आपदा निवारण विभागाला तत्काळ दिल्या जात असतात.राज्यात गेल्या २-३ वर्षांत हिवाळ्यात दरवर्षी गारपीट होत आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतात देखील गारपीट होत असते. गारपीट म्हणजे गारांचा पाऊस. जेव्हा हवामानाचे स्तर खूप खालच्या पातळीवर येतात, तेव्हा अनेक वेळा गारांचा पाऊस होते. बाष्पाचे कण अतिउच्च स्तरावरील उष्ण आणि अति शीतल स्तरांवरील झंझावातात अडकतात आणि ते गोठत जातात. जेथे असे कण अति शीत स्तराच्या अति थंड पाण्याच्या संपर्कात येतात, तेव्हा त्याच्या स्तरावर पाण्याचा बदल होतो आणि त्याचा आकार वाढतो. तेव्हा या कणांचा भार अति शीत स्तराला जड होतो. तेव्हा गारांचा पाऊस पडतो. ही परिस्थिती साधारणपणे अस्थिर वातावरणाच्या विशिष्ट परिणामामुळे तयार होते. सोबतच हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढते. किमान तापमानात सततच्या बदलामुळे हे होत असते. गारांचा आकार हा झंझावाताच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. तो १५ ते ५.१ सेंमीपर्यंत असतो. गारा पडण्याचा कालावधी हा १५ मिनिटांपासून ३० मिनिटांपर्यंत असतो. शेतकरी वर्गाने गारपिटीपासून बचाव करायचा असेल तर जाळ्यांचा वापर करायला हवा. पण जेव्हा गारपिटीचा आकार लहान असतो तेव्हाच या जाळ्या उपयोगाच्या असतात. वैज्ञानिकरीत्या वातावरणातील स्तरांमध्ये क्लाऊड सिडिंग केले तरी काही प्रमाणात गारपिटीची तीव्रता कमी करता येईल. हवामान खाते आणि पुणे यांच्या संयुक्त प्रायोगिक तत्त्वावर याबाबत अधिक सखोल अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया फार खर्चिक आहे. गारपीट, वादळ व पाऊस हे परस्परांशी संबंधित आहेत. हवामानातील बदल, तापमानातील वाढ हे सर्व घटक गारपिटीला कारणीभूत असण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास, संशोधन सुरू असून, गारपिटीबाबत पूर्वानुमान देण्यासाठी हवामान खाते अधिक प्रत्यत्नशील आहे.(लेखिका मुंबई हवामान विभागाच्या संचालिका आहेत.)- शुभांगी भुते
गारपिटीचे पुर्वानुमान; हवामान खाते सज्ज
By admin | Published: December 21, 2014 12:21 AM