शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

पंतप्रधानांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By admin | Published: January 07, 2015 10:43 PM

प्रसारमाध्यमांपासून दूर राहणाऱ्या पंतप्रधानांनी पुणे आणि कोल्हापूरमध्ये लोकभावनेला साद घालत विकासाच्या मुद्द्यांची चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. प्रसारमाध्यमांपासून दूर राहणाऱ्या पंतप्रधानांनी पुणे आणि कोल्हापूरमध्ये लोकभावनेला साद घालत विकासाच्या मुद्द्यांची चर्चा केली. पंतप्रधान मोदी हे मुरब्बी राजकारणी आहेत. कुठे काय बोलायचे, याचे नेमके भान त्यांना आहे. कोणत्या ठिकाणी कुणाला पुढे करायचे, याचेही तंत्र चांगलेच अवगत आहे. ‘मै प्रधानमंत्री नहीं, प्रधानसेवक हूँ’ असे म्हणून थेट जनतेच्या हृदयाला हात घालण्याची खुबी करवीरवासीयांनीही अनुभवली. आमदार-खासदारांप्रमाणे ‘मै कामदार हूँ’ असे म्हणत त्यांनी वेगळी ओळख ठसविण्याचा चतुराईने प्रयत्न केला. त्यांनी आश्वासन कुठलेच दिले नाही; परंतु विविध प्रलंबित मागण्यांबाबत अतिशय मुत्सद्दीपणाने मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविले. टोल प्रश्न, शहर आराखडा, खंडपीठ, कोकण रेल्वे आणि विमानतळाचे राष्ट्रीयीकरण हे प्रश्न पंतप्रधानांसमोर आले. परंतु, तेल लावलेला मल्ल जसा कुणाच्या हाती सहसा लागत नाही, त्याप्रमाणे राजकारणाच्या मातीत मुरलेल्या मोदींनी आपल्या अंगावर काही घेतले नाही. समस्यांचा चेंडू त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ‘टोल’वला. राष्ट्रीय प्रश्नांवर पंतप्रधान आश्वासन देऊ शकले असते; परंतु त्यांनी ते हुशारीने टाळले आणि प्रलंबित प्रश्न इतर मुख्यमंत्र्यांप्रमाणे रखडत न ठेवता राज्यात देवेंद्र तडीस लावतील, असा दिलासा दिला. आश्वासनांची खैरात न करता त्यांनी हळूच अंग काढून घेतले. परंतु, त्यांच्या सूचक वक्तव्यांमुळे वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या प्रश्नांना चालना मिळण्याच्या करवीरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या ऊसदराच्या प्रश्नावर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केले नाही. शेतकऱ्यांना किफायतशीर रास्त भाव मिळणे गरजेचे आहेच; परंतु साखरेच्या ढासळत्या किमतीमुळे कारखाने कर्जात बुडू नयेत, याबाबतही सरकारला विचार करावा लागेल. पुण्यात पंतप्रधानांनी सार्वजनिक बँकांच्या राष्ट्रीय परिषदेत आश्वासक भूमिका जाहीर केली. सरकारी हस्तक्षेप कमी करून जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी बँकांना सक्षम करण्याची ग्वाही त्यांंनी दिली. बँकांना भविष्यात स्वायत्तता दिली जाईल व सोन्याचे दिवस येतील, असा आशावाद जागवत वित्तीय व्यवस्थापनासंदर्भात मौलिक दिशादर्शन व सोनेरी स्वप्नांची चाहूल देण्याचे काम पंतप्रधानांनी केले. पश्चिम महाराष्ट्रातील त्यांची ही भेट चौफेर विकासाची नांदी ठरेल? स्वरोत्सवाची सांगतासवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाची सुरेल सांगता सवाई गंधर्वांच्या ध्वनिमुद्रिकेने झाली. वॉटरप्रूफ मांडवाखाली झालेल्या या उत्तरार्धात संगीतरसिक सुरांच्या वर्षावात न्हाऊन निघाले. एकाहून एक सरस, सुरस व सुरेल मैफली या स्वरोत्सवात रंगल्या. नवोदितांनी केलेले ‘सवाई’ सादरीकरण व बुजुर्ग कलावंतांचा अभिजात ‘भीमसेनी’ आविष्कार यांचा अप्रतिम मिलाफ संगीतरसिकांना अनुभवायला मिळाला. हा संगीतानंद वेबकास्टिंगच्या माध्यमातून जगभरातील रसिकांना आता घरबसल्या अनुभवता येईल, ही यंदाची विशेष उपलब्धी म्हणावी लागेल. स्वर्गीय तालस्वरांचा आनंद तनामनात साठवत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या हृद्गतासह रसिकांनी या स्मरणीय स्वरयज्ञाला निरोप दिला.विज्ञानयोगी हरपलाअवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या यशाचे प्रमुख शिल्पकार, राष्ट्रीय विज्ञान धोरणाला आकार देणारे बिनीचे शिलेदार आणि ‘मॉन्सून मॉडेल’चे जनक डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या निधनाने एक विज्ञानयोगी हरपला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेल्या गोवारीकरांच्या अवकाशाला गवसणी घालणाऱ्या देदीप्यमान कारकिर्दीची पायाभरणी कोल्हापुरात झाली. अखेरच्या श्वासापर्यंत हा विज्ञानयोगी विविध संशोधन प्रकल्पांत कार्यमग्न राहिला. डॉ. गोवारीकर हे तमाम संशोधकांसाठी दीपस्तंभ होते. या ‘अवकाशव्यापी’ अग्रणी शास्त्रज्ञाची अनुपस्थिती तराळ-अंतराळाला अस्वस्थ करणारी आहे. एकीकडे देशात नवे संशोधक, शास्त्रज्ञ घडावेत आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना डॉ. गोवारीकरांसारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ शास्त्रज्ञाचे आपल्यातून जाणे, ही न भरून येणारी अवकाश-पोकळी आहे. - विजय बाविस्कर