शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

भविष्यवेधी लेखक

By admin | Published: July 03, 2016 2:45 AM

गेली पाच दशके ज्यांच्या पुस्तकांनी वाचकांवर गारुड केले, त्या अ‍ॅल्विन टॉफ्लर या लेखकाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या भविष्यवेधी पुस्तकांनी वाचकांना नुसते खिळवून ठेवले नाही,

- विनायक पात्रुडकरगेली पाच दशके ज्यांच्या पुस्तकांनी वाचकांवर गारुड केले, त्या अ‍ॅल्विन टॉफ्लर या लेखकाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या भविष्यवेधी पुस्तकांनी वाचकांना नुसते खिळवून ठेवले नाही, तर त्याची परिणतीही अनुभवता आली. बदलत्या नागरी वसाहतीवर नव्या संक्रमणांचा आघात कसा होत जाणार आहे, याचे तंतोतंत वर्णन टॉफ्लर यांच्या पुस्तकांमधून दृष्टिपथात येते.तोकुणी बुवा, संत किंवा योगी नव्हता; तरीही तो जे लिहीत गेला तसंच जग घडत गेलं; जणू जगाची पावलं कुठं पडणार आहेत याची जाणीव त्याला आधीच झाली होती! त्याची पुस्तकं वाचून जगभरात नवे उद्योगपती तयार झाले. अनेक देशांचे नेतेही त्याची पुस्तके वाचत आणि बदलत्या काळाचा आढावा घेत. विलक्षण प्रतिभा लाभलेल्या अ‍ॅल्विन टॉफ्लर या लेखकाचे नाव ग्रंथप्रेमींना माहीत नसणारा कदाचित सापडणार नाही. कुठलाही लेखक त्याच्या लिखाणाने वाचकांचे आयुष्य समृद्ध करीत असतो. टॉफ्लरने केवळ आयुष्य समृद्ध केले नाही, तर समृद्ध आयुष्याची दिशाही स्पष्ट केली. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचे ते ‘गुरू’ झाले. ज्ञानाधिष्ठित समाजरचना नेमकी कशी असते? शारीरिक श्रमावर आधारलेली औद्योगिक रचना बदलून त्याचे रूपांतर माहिती तंत्रज्ञानात कसे होईल, याचे भाकीत ४० वर्षांपूर्वीच टॉफ्लर यांनी करून ठेवले होते. आपले आयुष्य संगणक व्यापून टाकणार आहे. नवे युग हे डिजिटल वर्ल्ड कसे असेल, याचे भाकीत त्यांनी त्यांच्या पुस्तकातून अतिशय बारकाईने केले होते. तंत्रज्ञानाच्या वेगामुळे विविध समाजघटकांवर, त्यांच्या सांस्कृतिक जीवनावर कसे आघात होतील, याचे साद्यंत वर्णन टॉफ्लर यांच्या पुस्तकांतून आढळले. त्यांची पत्नी हैदी यांच्याबरोबर त्यांनी चेंजेस इन सोसायटी, थर्ड वेव्ह, पॉवर शिफ्ट अशी पुस्तके लिहिली, ज्यांच्या लाखो प्रती जगभर खपल्या, कितीतरी भाषांमध्ये त्यांचे भाषांतर झाले. १९८०मध्ये त्यांनी ‘थर्ड वेव्ह’ हा ग्रंथ लिहिला. त्यात क्लोनिंग, वैयक्तिक संगणक, इंटरनेट विश्व, केबल टीव्ही, मोबाइल माध्यम यामुळे मानवी जीवन कसे बदलून जाईल याचा आढावा घेतला होता. त्या वेळी या गोष्टी अशक्य वाटत होत्या. आज जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे पाहतो, तेव्हा नागरी आयुष्य या तंत्रज्ञानांनी किती व्यापून गेलेय, हे लक्षात येते. आज चुकून जर आपण घरी मोबाइल विसरून गेलो तर शरीराचा एखादा अवयव गायब झाल्याची भावना निर्माण होते. १९६०मध्ये लिहिलेल्या ‘फ्युचर शॉक’ पुस्तकाने अ‍ॅल्विन टॉफ्लर हे नाव जगभर माहीत झाले. या पुस्तकाच्या ६० लाख प्रती खपल्या. त्या वेळेचा हा विक्रमच होता. १९८०मध्ये त्यांनी हाच भविष्यवेधी दृष्टिकोन कायम ठेवत ‘थर्ड वेव्ह’ हा ग्रंथ प्रकाशित केला. शेती आणि उद्योग या दोन लाटांनी मानवी आयुष्याला नवे वळण मिळाले. परंतु माहिती - तंत्रज्ञानाच्या तिसऱ्या लाटेमुळे मानवी विचारप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणला गेला. त्याचा वेध त्यांनी ‘थर्ड वेव्ह’ या ग्रंथातून घेतला होता. इंटरनेट, मोबाइल आणि डिजिटलमुळे मनुष्य माहितीच्या मायाजालातून प्रवास करेल. माहिती हेच जगण्याचे सूत्र राहील आणि तीच त्रासदायक गोष्ट ठरेल, असेही टॉफ्लर यांनी लिहून ठेवले आहे. आज साक्षर - निरक्षरतेच्या व्याख्या बदलल्या आहेत. लिहिता-वाचता येणारा मनुष्य साक्षर, ही रचनाही बदलली आहे. ज्याला संगणक येत नाही तो ‘संगणक निरक्षर’ अशी संकल्पना दृढ झाली आहे. नव्या तंत्रज्ञानाशी जो जुळवून घेत नाही तो जगातून दूर फेकला जाईल, अशी रचनाच तयार होत गेली. त्यामुळे माहिती युग अधिक परिणामकारक ठरले. या युगात मनुष्य अधिक गोंधळलेला राहील. धर्म, राष्ट्र, समाज, कुटुंब, व्यवसाय या साऱ्यावर नव्या माहिती युगाचे परिणाम दिसतील. त्याच्या ठरावीक चौकटीतल्या विचारप्रणालीला त्यामुळे जोरदार धक्का बसेल, असे वक्तव्य टॉफ्लरने ‘फ्लूचर शॉक’मध्ये केले होते. त्याने व्यक्त केलेले सर्व धोके आपण अनुभवत आहोत. अमेरिका आॅन लाइन (एओएल) या बड्या कंपनीचे संस्थापक स्टीव्ह केस असो वा सीएनएन संस्थापक टेड टर्नर असो सर्व जणच टॉफ्लर यांच्या भविष्यवेधी लिखाणाचे चाहते होते. या बड्या कंपन्या स्थापन करताना त्यांच्या मनात कुठेतही अ‍ॅल्विन टॉफ्लर यांची भविष्यवाणी असायची असे या दोघांनी जाहीरपणे कबूलही केले आहे. त्यामुळे जगभर प्रभावी नेते घडविणारा लेखक म्हणून अ‍ॅल्विन टॉफ्लर यांची ख्याती होती. २७ जूनला त्यांनी अमेरिकेतील त्यांच्या निवासस्थानी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या गं्रथांनी आजच्या जगाचा वेध घेतला खरा; पण त्यांनी जे सांस्कृतिक दुष्परिणाम सांगितले त्याकडे मात्र आपण सोईस्कर दुर्लक्ष केले. विविधतेतून घडलेल्या मानवी संस्कृतीवर केवळ माहितीच्या आधारे भिन्न संस्कृती लादण्याचा प्रयत्न हा मानवतेला घातकच ठरणारा आहे. याची जाणीव या ‘उद्या’च्या लेखकाने आधीच करून दिली होती. तरीही प्रगतीचा आणि विकासाचा वेग पकडणाऱ्या मनुष्यसमूहाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने सांस्कृतिक आक्रमण होतच राहिले. डिजिटल वर्ल्डनंतरचा प्रवास कसा असेल याची भविष्यवाणी अजूनतरी कुठल्याही लेखकाने केल्याचे वाचनात नाही. मात्र सांस्कृतिक आक्रमणाचे दुष्परिणाम पुढची काही दशके आपल्याला भोगायला लागतील यात शंका नाही. अ‍ॅल्विन टॉफ्लरसारख्या प्रतिभावानाने ही ऐतिहासिक साहित्यकृती निर्माण करून चमत्कारच केला. त्याच्या भविष्यवेधी साहित्यकृतींना आणि प्रतिभेला मन:पूर्वक सलाम. ज्ञानाधिष्ठित समाजरचना नेमकी कशी असते? शारीरिक श्रमावर आधारलेली औद्योगिक रचना बदलून त्याचे रूपांतर माहिती तंत्रज्ञानात कसे होईल, याचे भाकीत ४० वर्षांपूर्वीच टॉफ्लर यांनी करून ठेवले होते.1990 या साली लिहिलेल्या ‘पॉवर शिफ्ट’ या पुस्तकातून, ज्याच्याकडे जगाची खूप माहिती आहे, तेच जगावर राज्य करतील असे भाकीत टॉफ्लर यांनी वर्तविले होते. आज गुगल, फेसबुक, टिष्ट्वटर यांनी आपले आयुष्य किती वेढलेले आहे, याचा अंदाज आला तरी पुरे. रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह असो अथवा चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झिआंग सारेच टॉपर अ‍ॅल्विन टॉफ्लरच्या लिखाणाचे चाहते होते.टॉफ्लर स्वत:ही शेकडो व्याख्याने देत. जगभर त्यांचा चाहतावर्ग विखुरलेला होता. न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या टॉफ्लर यांची सुरुवातीची कारकिर्द पत्रकारितेची होती. ‘फॉर्च्युन’ नियतकालिकातील त्यांचे कॉलम खूप गाजले. त्यानंतर आयबीएमने त्यांना संगणकाचे सामाजिक आणि संस्था, संघटनांवर होणारे परिणाम याविषयी संशोधनात्मक लिखाण करण्यास सांगितले. एटी अ‍ॅण्ड टीसारखी कंपनी त्यांचे सल्ले घ्यायची.

 

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)