डॉ. मिन्नू भोसलेवास्तविक पाहता पुरुष नसबंदी ही स्त्रियांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेच्या तुलनेत कमी जोखमीची, सुलभ, कमी वेळात केली जाणारी, खर्च कमी, आरामाची गरज नाही, अशी. तरीही आपल्या देशात पुरुष नसबंदीचे प्रमाण अत्यल्प आहे. याचे कारण त्याविषयीचे गैरसमज आणि जनजागरणाचा अभाव आहे. बऱ्याचदा अजूनही खेड्या-पाड्यांत पुरुष वा स्त्री नसबंदीविषयी अनेक गैरसमज आहेत. लैंगिक क्षमतेवर नसबंदीमुळे परिणाम होतात, अशी मानसिकता अजूनही आपल्या समाजात आहे. ग्रामीण भागांत या मुद्द्याविषयी अज्ञान आहे, हे वास्तव स्विकारले पाहिजे. या सदरात पुरुष नसबंदीच्या वास्तवाविषयी जाणून घेऊया...पुरुष नसबंदीविषयी सध्या समाजात काय स्थिती आहे?देशात पुरुष नसबंदीचे प्रमाण कमी कारण त्या नवरा-बायकोला पुरेसा वेळ देऊन समुपदेशन करण्यासाठी आमची यंत्रणा कमी पडते. मासिक पाळीची कटकट, गर्भधारणा, मुलांचे जन्म, संततिनियमन, मेनोपॉज या चक्रात अडकलेल्या बाईवर कुटुंबनियोजनाची जबाबदारी न टाकताना तिच्या नवºयाने ती घेतल्यास बायको बद्दलचे प्रेम आणि काळजी व्यक्त करण्याची एक हुकमी संधी पुरुषांना मिळू शकते. मात्र असे चित्र आपल्या समाजात दिसून येत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. २००९-१० मध्ये राज्यातत पुरुष नसबंदी प्रमाण ६.९ टक्के होते, ते आता गेल्या सात वर्षांत २०१५-१६ मध्ये २.६ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.पुरुष नसबंदी कशापद्धतीने करता येते?स्त्रीच्या नसबंदीपेक्षा पुरुष नसबंदी ही शस्त्रक्रिया लहान व सोपी अशी आहे . या शस्त्रक्रियेसाठी भूलही द्यावी लागत नाही. लोकल अॅनस्थेशियाच्या सहाय्याने केवळ वृषणांचा भाग बधीर करुन ही शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेत दोन्ही बाजूच्या वृषणकोशांच्या त्वचेवर लहानशी चीर घेऊन आतली शुक्रजंतूवाहक नलिका कापली जाते. तसेच, तिची दोन्ही टोक बांदली जातात. त्वचा कापलेल्या ठिकाणी टाके दिले जातात.पुरुष नसबंदीमुळे पौरुषत्त्ववर का विपरित परिणाम होतो का?पुरुष नसबंदी केल्यानंतर पुरुषांची सेक्सची पॉवर कमी होते आणि पुरुष कष्टाची कामे करू शकत नाही असे काही गैरसमज स्त्री-पुरुषांच्या मनात खोलवर रुतून बसले आहेतच. यावर उपाय म्हणजे ज्या पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. गावोगावी शक्य नसेल तर निदान जिल्हास्तरावर एकत्रित करून ते कष्टाची कामे करू शकतात याचे प्रात्यक्षिक लोकांना दाखवावे लागेल. कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्त्रियांकडून पुरुषांकडे दिली जावी, असे वाटत असेल तर फक्त जनजागरण करून उपयोगाचे नाही तर पुरुष नसबंदी करून देऊन, नसबंदी झाल्यानंतरची काळजी घेण्याची तत्पर सेवा निर्माण करून देण्याची यंत्रणेची पुन्हा एकदा उभारणी करावी लागेल.
पुरुष नसबंदीविषयी जनजागृती महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 1:03 AM