शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पुणेरी सोलापूरकर!

By सचिन जवळकोटे | Published: August 25, 2018 8:52 AM

आयुष्यभर एकमेकांकडे बोट करण्याचं राजकारण खेळण्यातच रमलेली नेतेमंडळी देऊ शकतील का सोलापूरकरांच्या स्थलांतराला पर्याय?

आयुष्यभर एकमेकांकडे बोट करण्याचं राजकारण खेळण्यातच रमलेली नेतेमंडळी देऊ शकतील का सोलापूरकरांच्या स्थलांतराला पर्याय?

पुण्याकडे धावणारी ‘इंटरसिटी’ जेव्हा तरुणाईनं खचाखच भरते, तेव्हा दिसू लागते सोलापूरच्या भवितव्याची भयाण पोकळी. मायभूमीला घडवू पाहणारे हातच जेव्हा करू लागतात ‘बायऽऽ बायऽऽ’, तेव्हा सोलापूरच्या अकाली म्हातारपणाला जावं लागतं सामोरं. होय... ही आहे सोलापूरवर येऊ घातलेल्या भीषण संकटांची चाहूल. सोलापूरकरांनो... आत्ताच व्हा जागे, अन्यथा तुमच्याही घरातली पुढची पिढी ओळखली जाईल ‘पुणेरी सोलापूरकर’ म्हणूनच... 

तीन लाखांपेक्षाही अधिक सोलापूरकर झालेत पुण्यात स्थायिक...

कधीकाळी आपल्या गिरणगावात म्हणे सोन्याचा धूर निघायचा. आशिया खंडातली सर्वात मोठी जुनी मिल सोलापूरच्या सुवर्णकाळाची साक्षीदार ठरलेली... पण आता याच गिरण्यांच्या चिमणींच्या भग्नावशेषांकडं अत्यंत तटस्थपणे बघत इथली तरुणाई निघालीय पुण्याकडे. गेल्या आठ ते दहा वर्षांत सोलापुरातून स्थलांतर करणाऱ्या तरुण वर्गाची संख्या वाढलीय झपाट्यानं...आजच्या घडीला पुणे परिसरात स्थायिक झालेल्या सोलापूरकरांची आकडेवारी पोहोचलीय तीन लाखांपेक्षाही अधिक. दर महिन्याला जातोय हजारोंच्या संख्येत तरुणांचा घोळका. सोलापूरच्या बेकारीला नावं ठेवत पुण्यात नोकरी हुडकण्यासाठी. तिथं मिळेल ते काम करुन कसंबसं जगण्यासाठी. म्हणूनच की काय... हडपसर, सिंहगड रोड, पिंपरी-चिंचवड अन् काळेवाडी परिसरातील बहुतांशी वस्त्या फुलून गेल्यात निव्वळ सोलापूरकरांच्याच अस्तित्वानं. इकडच्या सोलापुरी स्टाईल आडनावावरुन झटकन् ओळखतात एकमेकांना. तरीही अर्थात त्यांची तिथली ओळख एकच... ‘पुणेरी सोलापूरकर’.

लेकरांसोबत आई-वडीलही निघाले घरदार विकून...

अभियांत्रिकी शिक्षण सोलापुरात, नोकरी मात्र पुण्यात. आयुष्यभर राब-राबून कमविलेला पैसा पालकांनी लेकरांच्या शिक्षणावर खर्च करणार. मग हीच पोरं आठ-दहा लाखांचं पॅकेज घेऊन पुण्यात स्थायिक होणार. तो पैसा तिथल्याच मार्केटमध्ये उधळणार. सोलापूरचे व्यापारी मात्र ‘मंदी चल रही हैऽऽ’ म्हणत माशा मारत ग्राहकांची वाट बघणार. किती हा विरोधाभास? सोलापूरच्या विकासाला हातभार लागावा असे ‘क्रिएटिव्ह’ हातच परके झाल्यानंतर त्यांचा पैसा इथल्या मार्केटमध्ये कसा खेळणार? सांगा... इथल्या बाजारपेठेची भरभराट कशी होणार?

तिकडं पुण्यात अर्धा-पाऊण कोटीचा फ्लॅट घेऊन हीच पोरं महिन्याला अर्ध्या लाखाचा इएमआय भरतात, तेव्हा सोलापुरात राहणाऱ्या बिचाऱ्या आई-वडिलांना फुटतो उमाळा. मग पूर्वजांनी जतन केलेलं घर-दार विकून जातात आपल्या लेकरांकडं. जन्मभूमीला भिजल्या डोळ्यांनी नमस्कार करून... पिढ्यानपिढ्यांचा ऋणानुबंध क्षणार्धात तोडून ही वयस्कर मंडळीही होताहेत ‘पुणेरी सोलापूरकर’.

सोलापुरात मात्र नेत्यांच्या सतरंज्या उचलणार...

तोंडात पुडी टाकत ‘कुठं गेल्तास बेऽऽ?’ म्हणणारे तरुण म्हणजेच सोलापूरकर... अशी एक चुकीची ओळख पूर्वी बाहेर केली गेली होती. चौकाचौकातल्या पानाच्या टपऱ्या पाहून परक्या प्रवाशांना ते खरंही वाटायचं, परंतु आता हिंजवडी-मगरपट्टा परिसरातल्या आयटी कंपन्यांमध्ये बहुतांश सर्वोच्च पदावर आपल्या सोलापूरचीच तरुण मंडळी. फर्ड्याऽऽ इंग्लिशमध्ये ही पोरं परदेशातील कंपन्यांबरोबर संवाद साधतात, तेव्हा नकळत येते आपली छाती फुलून... परंतु सोलापुरात राहणाऱ्या बहुतांश पोरांची काय अवस्था? शिक्षण अर्धवट. नोकरी नाही. आई-बापाच्या जीवावर गल्लीबोळात रुबाब करत फिरायचं. नेहरू शर्टाच्या बाह्या मागं सरकावून नेत्यांच्या मागं हिंडायचं. नेता मोठा होत जातो. मजल्यावर मजले चढवतो. ही पोरं मात्र सतरंज्या उचलण्यातच आयुष्य सार्थकी घालवितात. नाही म्हणायला कधीतरी होते रात्रीची सोय. पुन्हा दुसऱ्या दिवशी आहेच... चौकातल्या टपरीवर पुढारपणाच्या फुकाच्या बाता. ना कसलं भवितव्य... ना कसला विकास.

एमएच-१३ च्या सिटीत झळकू लागल्यात एमएच-१२ च्या नंबर प्लेट्स 

जेव्हा अठरा वर्षांपूर्वी पहिली ‘इंटरसिटी’ सुरू झाली होती, तेव्हा ती फक्त उच्चभ्रू व्यापारी अन् उद्योजकांसाठी जणू धावत होती. बाकीच्या सर्वसामान्य सोलापूरकरांसाठी ती अप्रुपाचीच गोष्ट होती; मात्र गावची हद्द ओलांडून इथली कोवळी पोरं पोट-पाण्यासाठी पुण्याकडं झेपावली, तेव्हा या गाडीचं वाढलं महत्त्व. आता तर एक सोडून दोन-दोन गाड्या धावताहेत, तरीही सारेच डबे कसे हाऊसफुल्ल... सोलापूरचं भवितव्य लांब घेऊन जाणाºया या डब्यांपेक्षाही खचाखच गर्दी सध्याच्या शिवनेरी बसेसमध्ये. बसस्थानकावर पुण्याला जाणाऱ्या गाड्यांचा प्लॅटफॉर्म बारा महिने चोवीस तास गर्दीनं उधाणलेला. याच स्थलांतरित पोरांच्या पैशावर कितीतरी ट्रॅव्हल्स कंपन्या गबरगंड बनलेल्या. आता तर ही पोरे तिकडनं काम घेऊन सणाला घरी येतात, तेव्हा एमएच-१३ च्या सिटीत झळकू लागतात एमएच-१२ च्या नंबर प्लेटस्.... कारण एकच ‘पुणेरी सोलापूरकर’. कोण आहे या परिस्थितीला जबाबदार? ‘सोलापुरात आता काही राहिलेलं नाही,’ म्हणत कडाकडा बोटं मोडणारी मंडळी तरी देऊ शकतील याचं उत्तर ? आयुष्यभर एकमेकांकडे बोट करण्याचं राजकारण खेळण्यातच रमलेली सारीच नेतेमंडळी देऊ शकतील का स्थलांतराला पर्याय? नाहीतर शेवटी आहेच की होऽऽ आपली ओळख.. ‘पुणेरी सोलापूरकर’ म्हणून !

‘आम्ही सोलापूरकर’ नावाचा क्लबही स्थापन...

केवळ सोलापूर शहरातीलच तरुण मंडळी नव्हे तर ग्रामीण भागातीलही मुलांचा वाढतोय पुण्याकडे ओढा. तिथल्या कंपन्यांमध्ये तांत्रिक कामगार म्हणून का होईना कसंबसं काम करणा-या या खेडवळ पोरांना पडलीय पुणेरी संस्कृतीची भुरळ. इकडं माय-बाप शेतात मर-मर मरतात, तिकडं पोरं पुण्याच्या तुडुंब गर्दीत हरवून जातात. अशा कितीतरी वाड्या-वस्त्या आपल्याकडं सापडतील, जिथं घरटी एक तरी पोरगं पुणेकर झालंय. या पोरांनी तिथं ‘आम्ही सोलापूरकर’ नावाचा क्लब सुरू केलाय. ‘आम्ही सोलापुरी’ नावाचं मंडळही स्थापन केलंय. मायभूमीपासून शेकडो मैल दूर राहणाऱ्या या लेकरांना आजही आपल्या गावाची आठवण येतेय, सय येतेय... कारण ते आहेत ‘पुणेरी सोलापूरकर’. 

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणे