शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

डॅडींचा सोप्पा पेपर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 6:37 AM

प.पू. डॅडी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरील परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवल्याचे ऐकून व वाचून चाळीतील प्रत्येकाचा ऊर भरून आला.

प.पू. डॅडी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरील परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवल्याचे ऐकून व वाचून चाळीतील प्रत्येकाचा ऊर भरून आला. डॅडींची ती ऐतिहासिक प्रश्नपत्रिका आमच्या हाती लागली असून विनाविलंब त्यास प्रसिद्धी देत आहोत...प्रश्न क्र. १) गाळलेल्या जागा भराअ) महात्मा गांधी यांची निर्भर्त्सना अर्धनग्न... म्हणून केली जायची.ब) गांधीजींच्या आजोबांचे नाव... होते.क) गांधीजींनी ... पदवी प्राप्त केली होती.ड) महात्माजींचे.... हे गुरू होते.......................प्रश्न क्र. २) योग्य पर्याय निवडाअ) गांधीजींना ‘महात्मा’ ही उपाधी कुणी दिली?अ) शर्मिला टागोर, ब) रवींद्रनाथ टागोर, क) उत्पल टागोर, ड) देब टागोरब) लहानग्या मोहनदासच्या मनावर कोणत्या कथेचा परिणाम झाला?अ) डोरेमॉन, ब) हॅरी पॉटर, क) श्रावणबाळ, ड) संतोषीमाता.क) गांधीजींच्या आंदोलनाचे नाव काय?अ) मूक मोर्चा, ब) ठोक मोर्चा, क) तिरडी मोर्चा, ड) असहकार.ड) गांधीजींची हत्या कुठे झाली?अ) गांधी भवन, ब) नेहरू सायन्स सेंटर, क) बिर्ला भवन, ड) गांधीनगर स्टेशन..........................प्रश्न क्र. ३) योग्य जोड्या जुळवाविन्स्टन चर्चिल - जालियनवाला बागनीळ - दांडी यात्राकस्तुरबा- आईजनरल डायर- नंगा फकीरपुतळीबाई - पत्नीडर्बन - रेल्वेतून ढकललेमीठ- चंपारणपीटरमारित्झबर्ग - टोपी काढायला लावली...................प्रश्न क्र. ४) खालीलपैकी कोणत्याही तीन विषयांवर १० ते १५ ओळीत टीप लिहा.अ) आंतरराष्ट्रीय अंहिसा दिनब) भारत छोडो आंदोलनक) गोलमेज परिषदड) करा किंवा मरा.........................प्रश्न क्र. ५) खालील विधाने कोण कोणास म्हणाले ते संदर्भासह स्पष्ट करा. (कोणतीही दोन)अ) मांस, बाई व बाटली यापासून आपण आयुष्यभर दूर राहू.ब) अगोदर या देशाचा संपूर्ण दौरा करा, देश नीट पाहा आणि मगच राजकारणात प्रवेश करा.क) स्वातंत्र्य प्रत्यक्षात आणण्याकरिता स्वत:चे रक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजेच शस्त्र बाळगण्याची आणि वापरण्याची क्षमता हवी.ड) दलितांना हरिजन म्हणणे म्हणजे त्यांना सामाजिकदृष्ट्या अपरिपक्व म्हणण्यासारखे आहे..............निबंध लिहाअ) नथुराम तुमच्या समोर उभा राहिला तर...ब) गांधीगिरी काळाची गरज आहे का?क) ड्राय डेने देश व्यसनमुक्त होईल का?(डॅडींची उत्तरपत्रिका हाती लागताच ती जाहीर करू.)- संदीप प्रधान 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी