शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

रामाची हनुमानउडी!

By admin | Published: December 29, 2015 2:42 AM

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परतीच्या वाटेवर असताना लाहोरमध्ये थांबून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वाढदिवसानिमित्त

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परतीच्या वाटेवर असताना लाहोरमध्ये थांबून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वाढदिवसानिमित्त जे अभिष्टचिंतन केले व त्यांच्या नातीच्या लग्नानिमित्त तिला जे आशीर्वाद दिले, त्या घटनेकडे आंतरराष्ट्रीय संबंधातील एक वेगळा आणि स्वागतार्ह पुढाकार इतक्या मर्यादित अर्थानेच खरे तर पाहायला हवे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सदैव ताणलेलेच असतात व त्याची कल्पना उभय देशातील लोकाना आणि शासकांनाही असते आणि आहे. त्यामुळे अशा एका सौहार्दपूर्ण भेटीने सारे मतभेद संपुष्टात येतील असे मानणे आणि त्याचबरोबर या भेटीचे वेगवेगळे अर्थ शोधत बसणे खूपच भाबडेपणाचे ठरेल. पण तरीही एकवेळ हे भाबडेपण परवडले अशी एक भलीथोरली हनुमानउडी भाजपाचे एक सरचिटणीस राम माधव यांनी मारली आहे. काही काळ हे राम रा.स्व.संघाचे अधिकृत प्रवक्ते होते आणि त्यानंतर संघाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना भाजपात सरचिटणीस बनविले गेले. मोदी-शरीफ भेटीचा त्यांना गवसलेला अर्थ फारच अफलातून आहे. पंतप्रधान अफगाणिस्तानचा यशस्वी दौरा पूर्ण करुन आणि पाकिस्तानात सौहार्दाचे दर्शन घडवून देऊन माघारी परतले या एकाच घटनेत माधव यांच्या किंवा संघाच्या स्वप्नातील अखंड भारताच्या निर्मितीने उचल खाल्ली आहे. १९४७पूर्वीचा म्हणजे भारत-पाक-बांगला देश यांचा अखंड भारत त्यांना दिसू लागला आहे. वास्तविक पाहाता भारताची फाळणी हा आता इतिहास बनला आहे आणि घड्याळाचे काटे कोणालाही उलटे फिरविता येत नाहीत, हे वास्तव आहे. खुद्द भारतातील अनेक इतिहासकारांनी आणि विश्लेषकांनीही फाळणी अपरिहार्य ठरवितानाच तिचे स्वागतदेखील केले आहे. तरीही अखंड भारताचे स्वप्न ज्यांना पाहायचेच असेल त्यांना अडवता येणार नाही. पण राम माधव आज सत्ताधारी पक्षाचे सरचिटणीस असल्याने त्यांच्या वक्तव्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरत असल्याने जशी ती काँग्रेसने घेतली तशीच खुद्द भाजपानेही घेतली असून भाजपातर्फे बोलताना एम.जे.अकबर यांनी राम माधव यांच्या भूमिकेशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा देऊन टाकला आहे. भाजपाचेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्याही लाहोर भेटीच्या वेळीच दोन्ही देश सार्वभौम असल्याची ग्वाही दिली होती व त्या मताशी आजही भाजपा ठाम असल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. भाजपात नसलेले पण रालोआत असल्याने केन्द्रीय मंत्री असलेले रामविलास पासवान यांनीही मोदींच्या पाक भेटीचा त्यांना गवसलेला अर्थ मांडताना आता या चार देशांचे महागठबंधन निर्माण करावे असे म्हटले आहे. तसे करण्याने परस्परांमधील सहकार्य आणि सौहार्द वृद्धीस लागेल असे त्यांना वाटत असेल तर मग ‘सार्क’ काय आहे? इकडे भारतात असा अनैसर्गिक उत्साह दाखविला जात असताना पाकच्या प्रधानमंत्र्यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी मात्र नकारात्मक सूर लावूून पुढील महिन्यात उभय राष्ट्रांदरम्यान होऊ घेतलेल्या सचिव पातळीवरील चर्चेतून फार काही निष्पन्न होणार नाही असेच भाकीत वर्तविले आहे.