अर्ज दाखल करण्याच्या ऐन मुहूर्तावर उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या पुढा:यांच्या हिकमतीवर अनुयायांनी शोधलेला तोडगा बंडखोरी हा आहे. पक्षातली धुसफूस तुर्तास शांत व्हावी म्हणून पुढा:यांनी वेळेत उमेदवार निश्चित करायचे नाहीत, त्यासाठी मित्रपक्षाशी तुटणारच असलेल्या वाटाघाटींचे गु:हाळ चालू ठेवायचे आणि ऐन वेळी कोणत्या ना कोणत्या सौदेबाजीच्या जोरावर आपल्याला हवी ती माणसे पुढे करायची, ही त्यांची रीत आता अनुयायांनाही चांगली तोंडपाठ झाली आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याआधीच तेही बाहेरच्या घरठावाच्या करामतीला लागतात. संजय देवतळे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले; मात्र वरो:याची विधानसभेची जागा त्यांना अनुकूल असल्याचे सा:याच जाणकारांचे म्हणणो होते. पण, ऐन वेळी त्यांना डावलून त्यांच्याच घरातल्या एका फारशा परिचित नसलेल्या महिलेला तिकीट देण्याची खेळी काँग्रेसने केली. ती का व कशासाठी केली, हे एक तर ते पुढारी जाणतात किंवा त्या उमेदवार. संजय देवतळे यांनी तत्काळ भाजपामध्ये प्रवेश केला आणि आश्चर्य याचे, की त्या पक्षाने त्यांना तिकीटही दिले. येथे अनुयायांची निष्ठा कमी पडली असे म्हणायचे की पुढा:यांची सौदेगिरी मोठी झाली म्हणायचे? हेच सा:या राज्यात आणि सा:या पक्षांत झाले. त्याला राष्ट्रवादी अपवाद नाही, भाजपा नाही, सेना नाही आणि अगदी ती मनसेसुद्धा नाही. पुढा:यांचा जमिनीशी वा राज्यातील वास्तवाशी संबंध उरला नसल्याचा व ते फक्त दिल्ली वा मुंबईत बसून तिकिटांचे सौदे करीत असल्याचा हा पुरावा आहे. पक्षांतरबंदी कायदा नसता, तर खासदार व आमदारांनी त्यांच्या सत्ता काळातच या सौदेबाज पुढा:यांना गुंडाळून ठेवले असते, असे सांगणारे हे वास्तव आहे. पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकारी राहिलेली माणसे पुढा:यांकडून अशी फसविली जात असतील, तर त्यांच्यावर मतदारांनी तरी किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्न आहे. गेले सहा आठवडे या पुढा:यांनी आपल्याच मित्रंना इशारे व धमक्या देण्यात दवडले. तो काळ प्रत्येक मतदारसंघातील आपल्या संभाव्य उमेदवारांची क्षमता अजमावून पाहण्यात त्यांनी घालवला असता, तर आजचे बाजारू चित्र दिसले नसते. पण, सा:यांनाच फार वर पाहण्याची व खाली दुर्लक्ष करण्याची सवय जडल्याने तसे काही झाले नाही. शिवसेनेला ‘मुख्यमंत्रिपद आपलेच’ अशी घमेंड, तर काँग्रेसला ‘आमच्याखेरीज कुणी नाही’ याची खात्री. राष्ट्रवादीला त्याच्या पैशाची मिजास, तर भाजपाला मोदींच्या मात्रेचा भरवसा. त्या चिमुकल्या मनसेलादेखील राज ठाकरे हे आपले इंजिन हाकतीलच, असा विश्वास. शिवाय, हे सारे जनतेच्या जिवावर आणि तेही तिला विश्वासात न घेता. काळ बदलला आहे. आपण तिकिटे देतो आणि लोक मत देतात, हा या पुढा:यांचा भ्रम आहे आणि तो निकाली निघाल्याचे चित्र आताच्या बंडखोरीने पुढे आणले आहे. तसेच ते निकालतही दिसणार आहे. दत्ता मेघे हे काँग्रेसचे एके काळचे मंत्री व खासदार. त्या पक्षातून बाहेर पडून भाजपामध्ये दाखल झाले आणि त्यांच्या एका मुलाला भाजपाने तिकीटही दिले. दुस:या एकाला विधान परिषद द्यायची, असे तो पक्ष खासगीत सांगतो. काँग्रेसचे दुसरे नेते व माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचा एक मुलगा भाजपाच्या, तर दुसरा राष्ट्रवादीच्या तिकिटावर आणि तेवढय़ावरही त्यांची काँग्रेसनिष्ठा शाबूत. लोकांना बावळे समजण्याचा हा पोरकटपणा आहे आणि तो तथाकथित पक्षनिष्ठेच्या नावावर पुढा:यांनी आणि त्यांच्या टाळक:यांनी चालविला आहे. तिकिटे पूर्वीही बदलली जात. नवे कार्यकर्ते पक्षात आणण्यासाठी व त्यांना सामावून घेण्यासाठी तो प्रकार केला जाई. ब:याचदा निवडणुकीच्या निकालाचा आगाऊ अदमास घेऊनही असे बदल केले जात. मात्र, एकाच जागेचे वचन एक डझन लोकांना देऊन त्यांना पक्षाकडे अर्ज दाखल करायला सांगणो आणि वेळेवर आपल्या मनातला माणूस उभा करून उरलेल्या 11 जणांना बाहेरचा रस्ता दाखविणो, ही पुढा:यांची मनमानी आहे. आता पुढा:यांएवढेच अनुयायांनाही राजकारण समजू लागले आहे. झालेच तर आपले पुढारी आपली ऐन वेळी फसवणूक करतील, याचीही त्यांना पुरेपूर जाणीव झाली आहे. पक्षांतर्गत लोकशाहीची जागा पक्षांतर्गत शंकेखोरीने घेतली आहे. हा सर्वच पक्षांच्या अनुयायांनी त्यांच्या नेत्यांना दिलेला इशारा आहे. पुढा:यांची ही मनमानीदेखील त्यांच्या हाती असलेल्या तिकीटवाटपाच्या अधिकारातून निर्माण होते. पक्षांतरबंदी कायदा नसता आणि त्यातून तिकिटांच्या वाटपांची मक्तेदारी पुढा:यांकडे राहिली नसती, तर कदाचित याहून चांगले व विश्वासाचे वातावरण राजकारणात निर्माण होऊ शकले असते. आताच्या अविश्वासाची खरी चपराक निकालात नक्कीच बसेल, यात काही शंका नाही.
बंडखोरी हा तोडगाच..
By admin | Published: September 30, 2014 12:09 AM