शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘कोविड’च्या निमित्ताने निसर्गाचा संदेश ओळखा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 6:36 AM

या गंभीर संकटावेळी देशवासीयांचा समजूतदारपणा व परिपक्वता प्रशंसनीय आहे. नागरिकांच्या सहयोगामुळेच सर्व संस्थांना आपसांत समन्वय ठेवून एकदिलाने काम करणे शक्य होत आहे. हे असाधारण व वाढते संकट हाताळताना आपल्या आरोग्यसेवा संस्थांनी खूपच कार्यक्षमता व दक्षता दाखविली आहे.

- रामनाथ कोविंद(भारताचे राष्ट्रपती)‘कोविड-१९’ या नॉव्हेल कोरोना विषाणूच्या प्रसाराने संपूर्ण जगात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. साथीचे रोग व महामारी पसरणे हे मानवी जातीसाठी नवे नाही. तरीही, अशा प्रकारच्या विषाणूचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होणे ही आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक न भूतो अशी घटना आहे.या कोरोना विषाणूच्या संसर्गाशी मुकाबला करत असलेल्या व त्याने प्राण गमवाव्या लागलेल्या जगभरातील लोकांच्या कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी आहे. अशा संकटसमयी स्वत:चा जीव धोक्यात घालून मानवजातीची सेवा करीत असलेल्या सर्व डॉक्टर, परिचारक, अर्धवैद्यकीय कर्मचारी व आरोग्य सेवकांसह इतरांसोबतही माझी संवेदना आहे.या गंभीर संकटावेळी देशवासीयांचा समजूतदारपणा व परिपक्वता प्रशंसनीय आहे. नागरिकांच्या सहयोगामुळेच सर्व संस्थांना आपसांत समन्वय ठेवून एकदिलाने काम करणे शक्य होत आहे. हे असाधारण व वाढते संकट हाताळताना आपल्या आरोग्यसेवा संस्थांनी खूपच कार्यक्षमता व दक्षता दाखविली आहे. या परीक्षेच्या घडीला आपल्या नेतृत्वाने व प्रशासनानेही आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे आपण या संकटावर एकजुटीने मात करू, याची मला खात्री आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करीन. या महामारीला आळा घालण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच प्रभावी उपाय योजले व ‘सार्क’ संघटनेतील शेजारी देशांना सोबत घेऊन यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्यासही त्यांनी गेल्या आठवड्यात सुरुवात केली.या महामारीने आपल्याला इतरांपासून चांगल्या हेतूने चार हात दूर राहणे भाग पाडले. यानिमित्ताने लोकांना आत्तापर्यंतची जीवनयात्रा व भविष्यातील मार्ग यावर स्वत:च्या विवेकाने किंवा डॉक्टरांनी एकांतवास सक्तीचा केला म्हणून मनन-चिंतन करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. या कठीण काळातून जात असताना आपल्याला या आव्हानातूनही संधी निर्माण करायला हवी व या संकटाच्या रूपाने निसर्ग आपल्याला काय संदेश देऊ पाहात आहे, यावर विचार करायला हवा. निसर्ग आपल्याला बरेच संदेश देत आहे. पण त्यातील काही निवडक संकेतांवर मी थोडक्यात प्रकाश टाकू इच्छितो.साफसफाई ही या संकटाने आपल्याला दिलेली पहिली आणि सर्वांत स्पष्ट शिकवण आहे हे आपण सर्वच जाणतो. सावधगिरी बाळगणे हाच या कोरोना विषाणूवर मात करण्याचा एकमात्र मार्ग आहे. म्हणूनच डॉक्टरमंडळी ‘सोशल डिस्टन्सिंग’सोबतच साफसफाई ठेवण्याचा सल्ला देत आहेत. स्वच्छता हा सुजाण नागरिकाचा मूलभूत गुण आहे. आजवर या गुणाला कमी महत्त्व दिले जात होते. त्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी खुद्द महात्मा गांधींनीही आपल्याला प्रेरित केले होते. महात्माजींनी दक्षिण आफ्रिकेत व भारतात हाती घेतलेल्या अनेक ऐतिहासिक मोहिमांतही स्वच्छता हा महत्त्वाचा भाग होता.१८९६ मध्ये गांधीजी भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा मुंबईत प्लेगची साथ सुरू होती. त्याचा प्रसार रोखण्यासाठी गांधीजींनी सरकारला आपल्या सेवा देऊ केल्या. सरकारनेही तो प्रस्ताव स्वीकारला. त्या वेळी गांधीजी राजकोटमध्ये होते त्यामुळे त्यांनी तेथूनच आपली सेवा सुरू केली. एक स्वयंसेवक या नात्याने त्यांनी शौचालयांच्या स्थितीची पाहणी केली व स्वच्छतेकडे लक्ष देण्यासाठी लोकांना प्रेरित केले. आपण दैनंदिन जीवनात गांधीजींची शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे. यंदाच्या गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षात आपण सर्व जण स्वत:ला व्यक्तिगत व सार्वजनिक साफसफाईच्या बाबतीत नव्या उत्साहाने समर्पित करू शकतो.निसर्गाचा सन्मान करण्याची दुसरी शिकवण यातून आपल्याला मिळाली आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या प्रजातीवर मनुष्य या एका प्रजातीने अधिपत्य स्थापन केले आहे. संपूर्ण पृथ्वीचे नियंत्रण माणसाने आपल्या हाती घेतले आहे. एवढेच कशाला पृथ्वी सोडून माणसाने चंद्रावरही पाऊल ठेवले आहे. पण एवढी शक्तिशाली मानवजातही कोरोना विषाणूसारख्या एका छोट्याशा जीवापुढे हतबल व्हावी, ही मोठी विडंबना आहे. पण सरतेशेवटी एक सत्य आपण लक्षात घ्याला हवे. ते हे की मानव हाही एक सजीव आहे व त्याचे जीवन अन्य सजीवांवर अवलंबून आहे. निसर्गावर मात करण्याचे व सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीचा आपल्या लाभासाठी वापर करण्याचे माणसाचे हे प्रयत्न एका विषाणूच्या फटक्याने कोलमडू शकतात. बरे, हा विषाणूही एवढा सूक्ष्म की जो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसतही नाही.आपले पूर्वज निसर्गाला मातेचा दर्जा देत असत हे लक्षात घ्यायला हवे. त्यांनी आपल्याला नेहमीच निसर्गाचा सन्मान करण्याची शिकवण दिली. परंतु इतिहासाच्या या वळणावर त्या मार्गावरून आपण दूर गेलो व पारंपरिक विवेकही गमावून बसलो. हल्ली अशाप्रकारच्या महामारीच्या साथी व हवामानाच्या टोकाच्या घटना नित्याच्या होऊ लागल्या आहेत. आपण नेमका रस्ता कुठे चुकलो व पुन्हा योग्य रस्त्यावर येण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.जागतिक समुदायाला समानतेचा धडा अजूनही म्हणावा तेवढा मिळालेला नाही. पण तुम्ही माझ्यापुढे सर्व समान आहात, असे निसर्ग आपल्याला सांगत आहे. जात, पंथ, क्षेत्र किंवा अन्य कोणताही मानवनिर्मित भेदभाव या विषाणूला मान्य नाही. तºहेतºहेचे भेदभाव निर्माण करणे व तुझ्या-माझ्याच्या भांडणांमध्ये जग मग्न आहे. अशा वेळी अचानक एक दिवस असे एखादे जीवघेणे संकट उभे राहते. अशा वेळी आपल्याला जाणीव होते की, माणूस हीच आपल्या सर्वांची एकमेव ओळख आहे व आपण काही झाले तरी फक्त माणूसच आहोत.परिस्थिती मान्य असताना आपण परस्परावलंबन या जीवनमूल्याकडेही नेहमी दुर्लक्ष करीत असतो. माझ्या भाषणांमध्ये मी नेहमी ‘वसुधैव् कुटुंबकम्’ या सुविचाराचा उल्लेख करीत असतो. संपूर्ण जग हे एकच कुटुंब आहे, असा याचा अर्थ आहे. हे वचन आजच्याएवढे पूर्वी कधीही समर्पक ठरले नव्हते. आज प्रत्येक व्यक्ती दुसºयाशी खूपच जोडलेली आहे. इतरांच्या सुरक्षेची काळजी घेतली तरच आपणही सुरक्षित राहू शकतो. आपल्यावर केवळ माणसांच्याच नव्हे, तर अन्य सजीवसृष्टीच्या सुरक्षेचीही जबाबदारी आहे. असाधारण संकट आले की, लोक बव्हंशी स्वार्थी होतात. परंतु आपण स्वत:एवढीच इतरांचीही चिंता करायला हवी.कोरोनाची ही महामारी अत्यंत संसर्गजन्य असल्याने लोकांना एकत्रित करून ऐच्छिक सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करता येत नाही. तरीही या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोक स्वत:हून अनेक पद्धतीने मदत करीत आहेत. जागरूकता वाढविणे व घबराट न पसरू देणे यात प्रत्येक नागरिक नक्कीच योगदान देऊ शकतो. जे सुखवस्तू आहेत ते आपल्याकडे जे आहे ते इतरांसाठी व खासकरून आसपासच्या गोरगरिबांना उपलब्ध करून देऊ शकतात.समानता व परस्परावलंबन या मूलभूत जीवनमूल्यांचा आपण संपूर्ण विनम्रतेने स्वीकार कराण्याची हीच वेळ आहे, याची आठवण निसर्ग आपल्याला करून देऊ पाहात आहे. हा धडा मिळण्यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. पण हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानाचा मुकाबला करताना व उत्तम आणि सामायिक भविष्य घडविण्याच्या कामी हा धडा आपल्याला खूपच उपयोगी पडेल. या संकटातून आपण लवकरात लवकर नक्की बाहेर पडू व एक राष्ट्र म्हणून एका अभूतपूर्व शक्तीने मार्गक्रमण करू, असा सामूहिक संकल्प तुमच्यासोबत मीही करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत