शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

...ही धोक्याची घंटा ओळखून फ्रान्समध्ये जारी होतो आहे पॉर्न पासपोर्ट! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 11:19 AM

अल्पवयीन मुलांना इंटरनेटवर पॉर्न पाहता येऊ नये यासाठी फ्रान्स सरकारने 'पॉर्न पासपोर्ट' जारी केला आहे. काय आहे ही योजना?

तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ, मानसशास्त्रज्ञ 

महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लिहिलेल्या "विद्येविना मती गेली..." या पंक्ती आठवतात का? त्यात शेवटी महात्मा फुले म्हणतात "इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.." त्याच धर्तीवर सध्या बंधनाविना कोणालाही काहीही बघण्यासाठी असलेल्या इंटरनेटने केलेले अनर्थ आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. मुलांनी इंटरनेटवर नको त्या गोष्टी पाहू नयेत म्हणून अनेक पालक किड्स मोड, रेस्ट्रिक्टेड मोड यासारख्या नानाविध युक्त्या वापरतात; पण सारे व्यर्थ ठरते. बहुतांश लोक कोडग्या मुलाला बिचकून असतात, तसेच इंटरनेटचेही आहे. अनेकांची अवस्था 'आपण तर बुवा इथे हात जोडले' अशी झाली आहे. 

एका प्राथमिक शाळेत मधल्या सुटीत स्टाफरूममध्ये महिला शिक्षिकांची कुजबुज चालली होती. एक कागद सगळ्यांच्या हातात फिरत होता. ते एक प्रेमपत्र होते. पाचवीतल्या पिटुकल्याने पाचवीतल्याच चिमुरडीला लिहिलेले. त्यात आय लव यू बदाम या व्यतिरिक्त "तू नाही म्हणालीस तर मी बिल्डिंगवरून उडी मारेन' असेही लिहिले होते. हे गंभीरपणे घ्यावे की बालिशपणा म्हणून दुर्लक्ष करावे याबाबत शिक्षकांमध्ये एकमत होत नव्हते. सातवी आणि सहावीच्या बहीण-भावांनी अश्लील चाळे करत एक व्हिडीओ बनवला आणि तो इंस्टाग्रामवरून व्हायरल केला.

या दोन्ही उदाहरणांमधील मुलांना काय कळत असेल? आपण काय करतोय त्याचे परिणाम काय होतील याची थोडी तरी जाणीव या मुलांना असेल का? या नको त्या कल्पना या मुलांना इंटरनेटवर व्हिडीओ बघून सुचतात. आता इंटरनेट, मोबाइल, लॅपटॉप इतक्या आवश्यक गोष्टी झाल्या आहेत की मुलाच्या हातात हे सगळे पडू द्यायचे नाही असे ठरवण्याला काही अर्थच राहिलेला नाही; पण जर थेट इंटरनेटच्या वापरावरच काही बंधने आली तर?

हे शक्य करून दाखवणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरणार आहे. फ्रान्स एक असा पासपोर्ट तयार करणार आहे ज्याशिवाय कोणालाही पॉर्न साईटला भेट देता येणार नाही. आपल्या फोनमध्ये एक ॲप डाऊनलोड करावे लागेल ज्यामध्ये वापरकर्त्याच्या वयाची पडताळणी झालेली असेल. याआधी पॉर्न पाहण्यासाठी तुम्ही अठरा वर्षांचे आहात का याच्या उत्तरादाखल केवळ होय असे क्लिक करणे पुरेसे अर्धे वर्ष या व्हिडीओमुळे वाया गेले. होते; पण ती शुद्ध चोरवाट त्यातून पॉर्न मुलांपर्यंत पोहोचतच होते. फ्रान्समध्ये झालेल्या पाहणीत २०२२ मध्ये पॉर्न साईटला भेट देणाऱ्या मुलांचे सरासरी वय दहा-बारा वर्षांपर्यंत खाली आले होते. ही धोक्याची घंटा ओळखून फ्रान्स सरकार २०२३ पासून हा पॉर्न पासपोर्ट सुरू करत आहे.

उदाहरणार्थ, किरण एकदा आपल्या मित्रांसह पत्त्याशी संबंधित काहीतरी गेम खेळत होता. अचानक उजव्या कोपऱ्यात कमी कपड्यातील एका मुलीचा फोटो झळकायला लागला. तो फोटो एवढासा, त्याच्या कोपऱ्यात असणारे फुलीचे बटन त्याहून छोटे. त्या बटनाला बोट लावून बंद करताना फोटो आणि एक व्हिडीओ सुरू झाला आणि त्या सगळ्यांनी मिळून अश्लील व्हिडीओ पाहिला. त्याचा परिणाम म्हणजे मेंदूमध्ये डोपामाईन हे रसायन स्रवले आणि मग परत परत हा डोपामाईन स्त्रवण्यासाठी, छान वाटण्यासाठी है।व्हिडीओज बघावेसे वाटत राहिले. किरणच्या बारावीचे अर्धे वर्ष या व्हिडीओमुळे वाया गेले.

आपल्या मेंदूमध्ये प्रमस्तिष्क (front lobe) हा भाग अठरा वर्षांपर्यंत विकसित होतो. तो पूर्णपणे विकसित झाला की मग चूक काय बरोबर काय याची समज येऊ लागते. त्या मनाने जन्मल्यापासूनच लिम्बिक प्रणाली जी भावनांशी संबंधित आहे, ती विकसित होत असते. त्यामुळे लिम्बिक प्रणालीचे वर्चस्व मुलांवर जास्त असते. आपला अभ्यासाचा वेळ जात आहे. आपल्याला या गोष्टी बघण्याचे व्यसन लागत आहे, असे लक्षात येऊनही विचारांवर भावना जास्त प्रभावी ठरतात. अशा परिस्थितीत ज्याप्रमाणे आपण अठरा वर्षापर्यंत मतदानाचा, गाडी चालवण्याचा परवाना देत नाही, त्याचप्रमाणे त्यांना अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत अशा पॉर्न साईट पाहता आल्याच नाहीत, तर या मुलांवर त्याचा अनुकूल परिणाम होईल.

अशा अश्लील साईटवर बघितलेल्या गोष्टी मग मुलांना करून बघाव्याशा वाटतात, "सख्ख्या भावानेच केला बहिणीवर बलात्कार" ही बातमी वाचल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक क्रूर, निष्ठुर, नीतिमूल्यांची चाड नसणारा भाऊ येतो; पण वास्तवात मला अशा दोन भावांचे समुपदेशन करताना असे समजले की हे दोन्ही भाऊ ती दुर्घटना वगळता वागायला बोलायला अगदी सर्वसामान्य होते; पण सातत्याने अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओज बघितल्याने त्यांची उत्सुकता चाळवली आणि त्यांनी घरातच बहिणीबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित करून बघितले असले प्रश्न मुळातून सोडवण्यासाठी त्या घटनेमागील कारणांची चिकित्सा करावी लागेल हे नक्की