शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

स्त्री-पुरुष सहजीवनातील बदलते संदर्भ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 7:18 AM

कोणतीही स्त्री असो किंवा पुरुष, तिने किंवा त्याने अन्यायाला विरोध हा केलाच पाहिजे! अन्याय कोणावर होतो, हे महत्त्वाचे नाही.

डॉ. रविनंद नामदेव होवाळ

एका मराठी वाहिनीवरून अलीकडेच प्रसारित झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान एका महिलेने तिच्या सासू-सासऱ्यांची माफी मागितली. कारण हे, की तिने त्यांच्याङ्कमुलाला आपल्या आई-वडिलांपासून हिरावून घेतले होते. या महिलेला तिच्या चुकीची जाणीव स्वत:च्या उतारवयात झाली. दरम्यानच्या काळात मुलापासून दुरावल्या गेलेल्या सदरङ्कमुलाच्या मातापित्यांना काय वेदना झाल्या असतील व कोणत्या परिस्थितीतून ते गेले असतील, याचा आपण केवळ अंदाजच बांधू शकतो. परंतु तरीही आपली चूक लक्षात आल्यानंतर ती सर्वांसमोर मान्य करणाºया व त्या चुकीचे परिमार्जन करू पाहणाºया सदर भगिनीचे आपण स्वागतच केले पाहिजे. तसे पाहता अशा प्रकारचा अन्याय तर भारतीय प्रदेशातील प्रत्येक महिलेवर व तिच्या कुटुंबीयांवर मागील शेकडो वर्षांपासून होतच आलेला आहे. विवाह झाला की मुुलीला तिचे घर सोडावे लागते. दुसºया एखाद्या घरात जाऊन स्थिरावावे लागते. असे होते, कारण आपण सर्वांनी स्वीकारलेल्या प्रथा किंवा परंपरेचाच तो एक भाग आहे. आजही आपल्याकडील बहुसंख्य घरांमधील केवळ वडील, काका किंवा भाऊ इ. पुरुषच नाही, तर अगदी आई, काकी, मामी इत्यादी स्त्रियाही आपल्या घरातील मुलींना परक्याचे धन मानतात. अशा घरांतील स्त्री आणि पुरुष हे दोघेही सारखेच दोषी असतात.

 

कोणतीही स्त्री असो किंवा पुरुष, तिने किंवा त्याने अन्यायाला विरोध हा केलाच पाहिजे! अन्याय कोणावर होतो, हे महत्त्वाचे नाही. अन्याय होतो, ही वाईट बाब आहे. स्त्रियांवरील अन्यायाचा केवळ स्त्रियांनीच विरोध करणे ही चुकीची गोष्ट आहे. स्त्रियांनी फक्त स्त्रियांवर होणाºया अन्यायाचाच विरोध करणे हीसुद्धा चुकीचीच गोष्ट आहे. दोघांनी मिळून एकमेकांवरील अन्यायाचा विरोध करणे, ही अचूक गोष्ट आहे. सर्वांनी मिळून सर्व प्रकारच्या अन्यायाचा विरोध करणे, ही अचूक बाब आहे.

 

आजही भारतीय प्रदेशातील विवाह किंवा इतर प्रसंगांदरम्यान एखाद्या स्त्रीबाबत केल्या जाणाºया अन्यायात पुरुषांबरोबरच काही स्त्रियाही सहभागी असतात की नाही, याचे आपण डोळसपणे परीक्षण केले पाहिजे. इथल्या जातीय संघर्षात दुर्बल जाती-समूहांतील स्त्री-पुरुषांवर केल्या जाणाºया अन्यायात सबल समूहांतील स्त्री आणि पुरुष दोघेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असतात की नाही, याचेही आपण परीक्षण केले पाहिजे. इतकेच नाही, तर श्रीमंत वर्गाकडून जेथे जेथे गरीब वर्गातील स्त्री-पुरुषांवर अन्याय केला जातो, तेथे तेथे या अन्यायात श्रीमंत वर्गातील स्त्रिया आणि पुरुष दोघेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असतात की नाही, याचेही आपण डोळसपणे परीक्षण केले पाहिजे. सत्याचे पूर्णांशाने अवलोकन करूनच कोणत्याही संदर्भातील अन्याय नष्ट करण्यासाठीची रणनीती आपण ठरवली पाहिजे.विवाहप्रसंगी आपल्या घरातील मुलासाठी मुलगी शोधताना विशिष्ट जातीचीच मुलगी हवी, गोºया रंगाचीच मुलगी हवी, धारदार नाक किंवा पाणीदार डोळे असलेली मुलगीच हवी, अशा प्रकारचा आग्रह वरपक्षातील केवळ पुरुषच नाही, तर स्त्रियाही धरताना आपण सर्रास पाहतो. अशा ठिकाणी केवळ पुरुष नाही, तर स्त्रिया आणि पुरुष असे दोघेही एखाद्या स्त्रीवर अन्याय होण्यास कारणीभूत ठरतात. दुसºया बाजूने पाहिले असता असे दिसते, की अशा वेळी मुलीच्या कुटुंबातील स्त्रिया आणि पुरुष अशा दोघांवरही अन्याय होतो. मग सन्मानाचा हा लढा केवळ स्त्री विरुद्ध पुरुष असा उरतो कुठे? तो तर अन्यायी स्त्री-पुरुष विरुद्ध अन्यायग्रस्त स्त्री-पुरुष असा बनलेला असतो.आपल्या आजूबाजूला आज आपल्याला अशी अनेक कुटुंबे दिसतात, की जिथे पुरुषांइतकेच स्त्रियांचेही वर्चस्व निर्माण झालेले आहे. अशा घरांमध्ये एक मुलगा आपल्या आईच्या सल्ल्याने वागतो. एक पती आपल्या पत्नीच्या सल्ल्याने वागतो. तिला घरकामात अल्पस्वल्प मदतही करतो. स्वत:च्या सुख-दु:खापेक्षा आपल्या आई किंवा पत्नीच्या सुखदु:खाचा विचार करून स्वत: झिजत राहतो आणि प्रसंगी स्वत:वरच मोठा अन्यायही करून घेतो. अशा ठिकाणी लिंगभेद गळून पडलेला असतो व केवळ माणुसकीच शिल्लक राहिलेली असते. ही माणुसकी जपणे आणि सर्व बाजूंनी फुलवणे हेच आजच्या सर्व स्त्री आणि पुरुषांनी आपले कर्तव्य मानले पाहिजे. स्त्री आणि पुरुष या दोघांचेही जीवन कसे अधिकाधिक सुखकर बनेल, याचाच आपण अधिक विचार केला पाहिजे व हे करताना अन्यायग्रस्त सासू-सासºयांची माफी मागणाºया सुनेचे आपण मनापासून स्वागत केले पाहिजे. या भगिनीने उतारवयात केलेल्या या सुरुवातीमुळे आपली एक चूक सुधारण्याची संधी अशा प्रकारच्या चुका करणाºया अनेक भगिनींना तरुणपणीच मिळो आणि या अनुषंगाने भारतीय समाजजीवनाच्या सर्वच अंगांनी एक उत्तम समतोल साधण्याची प्रेरणा प्रत्येक संघर्षशील स्त्री-पुरुषाला मिळो, हीच सदिच्छा.(लेखक सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :Womenमहिला