- डॉ. भारत पाटणकर१ मे १९६० रोजी १०५ - १०७ हुतात्म्यांनी बलिदान देऊन हजारोंनी लाठ्या खाऊन आणि जेलमध्ये जाऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला. याचा ‘मंगल कलश’ मात्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी आणला. बेळगाव - कारवार - डांग - उंबरगाव आजपर्यंत बाहेर राहिले ते राहिलेच. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष अशा पक्षांच्या नेतृत्वाखाली हा रणसंग्राम लढविला गेला. संयुक्त महाराष्टÑ समितीने काँग्रेसचा दारुण पराभव केल्यामुळे अखेरचा टोला बसला आणि मागणी बहुतांशी मान्य झाली. ‘महाराष्ट्र आता बहुजन-दलित जनतेने चालवायचा’ अशा प्रकारची हुल उठवून यशवंतरावांनी समितीच्या रथी-महारथींच्या पाठीवर गोंजारले आणि या सर्व पक्षांमधून मोठमोठे नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. महाराष्टÑ आता विकासाची नवी वाट चालू लागल्याचे चित्र उभे केले गेले; पण महाराष्टÑ आता एक नवा शोषक वर्ग आणि नव्या प्रकारचे आधुनिक जातवर्चस्व निर्माण करून विकासाचे सहकारी वळण घेऊ लागला.या पार्श्वभूमीवर १९६० पासून सुरू होणाऱ्या दशकाच्या अखेरीला महाराष्टÑाच्या जनतेतून तरुणांच्या बुलंद सहभागातून नव्या चळवळी आणि जनचळवळींच्या नव्या दिशा पुढे आल्या. या चळवळींनी खरे म्हणजे आजचा महाराष्टÑ घडविला आहे; पण हा इतिहास अंधारातच ढकलला गेला आहे. या दशकापासून ते १९७० ते ८० च्या दशकांपर्यंत महाराष्टÑाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, जाती-अंत विषयक, स्त्री मुक्तीविषयक, कला-साहित्यविषयक क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक बदल घडविणाºया चळवळी निर्माण झाल्या. या चळवळींनी आजच्या काळापर्यंतच्या पायाभूत बदलांना दिशा दिली, आकार दिला.या चळवळींपैकी सर्वांत पहिल्यांदा महाराष्टÑाच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर, साहित्यिक कलाविषयक जीवनावर परिणाम करणारी चळवळ ‘दलित पँथर’ या नावाने पुढे आली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिल्यांदाच स्वाभिमानाने, नव्या जाणिवेने, बिनतोड बाण्याने ही नवी चळवळ वादळी पद्धतीने उभी राहिली. आजच्या तरुण पिढीला या चळवळीचे एक खास आकर्षण आहे. याही पिढीवर तिच्या इतिहासाचा प्रभाव आहे. युवक क्रांतीदल, समाजवादी युवक दल अशा वेगवेगळ्या प्रकारे समाजवादी विचारांच्या वेगळ्या चळवळी याच काळात पुढे आल्या. त्यांनीही विद्यार्थी- युवकांमध्ये एक रसरशीत आंदोलन उभे केले. परंपरागत समाजवादी पठडीच्या बाहेर जाऊन उभे केले.‘मागोवा’ या नावाने उभा राहिलेला नवमार्क्सवादी ग्रुप मात्र याच काळात उदयाला आला. दलित पॅँथर्स आणि युवक क्रांती दल वगैरे प्रवाहांशी जवळीकीचे नाते बांधून या ग्रुपने आदिवासी, शेतमजूर, कामगार, दलित, स्त्रिया अशा सामाजिक घटकांच्या चळवळी नव्या प्रकारे उभ्या केल्या. नवी दिशा, नवा दृष्टिकोन निर्माण केला. महाराष्टÑामधल्या तरुणांना नव्या शोषणमुक्त समाजाचे स्वप्न बघण्याचा वारसा दिला. याच वारशामधून श्रमिक मुक्ती दल या नावाने एक नवी चळवळ उभी राहिली. मार्क्स - फुले - आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानांशी संयुक्त वैचारिक घुसळण करून वर्गीय - जातीय - लैंगिक शोषणाचा अंत करणारा दृष्टिकोन पर्यावरण संतुलित, शोषणमुक्त समृद्ध समाज निर्माण करण्याचे स्वप्न पुढे आणणाºया चळवळी केल्या. समन्यायी पाणी वाटपाची नवीन संकल्पना संघर्षातून प्रत्यक्षात आणणे, विकसनशील पुनर्वसन, पर्यायी ऊर्जा, विकास चळवळ अशा इतिहास घडविणाºया चळवळी केल्या. स्त्री मुक्ती संघर्ष चळवळीच्या माध्यमातून परित्यक्तांच्या प्रश्नाला नवी दिशा दिली.याचवेळी या महाराष्टÑात रोजगार हमी या देशातला पहिलाच कायदा आणणाºया, आधी पुनर्वसन मगच धरण कायदा करण्यास भाग पाडणाºया, दुष्काळ निर्मूलनासाठी दिशा देणाºया आदिवासींचे अधिकार प्रस्थापित करणाºया चळवळी झाल्या. डॉ. बाबा आढाव, कॉ. दत्ता देशमुख, क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांनी यापैकी वेगवेगळ्या चळवळींचे नेतृत्व केले. सहकारी साखर कारखानदारी ही खºया अर्थाने सभासद नियंत्रित, किफायतशीर आणि वैज्ञानिक पायांवर चालू शकते, अशी चळवळसुद्धा क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांनी दिशादर्शक पद्धतीने करून दाखविली.आजपर्यंत जे जे जनतेच्या हाती विकासाच्या नाड्या देऊ शकणारे, शाश्वत विकासाचा पाया घालणारे, स्वातंत्र्याचा जास्तीत जास्त अनुभव देणारे, शोषण संपविण्याच्या दिशेने नेणारे आणि पर्यावरण संतुलित समृद्ध समाजदर्शन करण्याकडे नेणारे झाले. ते ते या सर्व चळवळींमुळे झाले आहे.विद्रोही सांस्कृतिक चळवळ’, सामाजिक अत्याचार प्रतिबंधक - जाती अंत चळवळ अशाही चळवळींनी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात ताज्या दमाची, नवी दिशा देणारे कार्यक्रम घेतले. बडवे हटाव चळवळ, विठोबा रखुमाई मुक्ती चळवळ, याही वेगळीच उदाहरणे घालून देणाºया चळवळी महाराष्टÑाला अभिमान वाटावा अशा प्रकारे झाल्या.
(श्रमिक मुक्ती दलाचे नेते)