शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

दबावाचा परिणाम?

By admin | Published: March 19, 2016 3:17 AM

सुमारे सहा वर्षांपूर्वी पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील एकमात्र आरोपी मिर्झा हिमायत बेग याला पुणे न्यायालयाने

सुमारे सहा वर्षांपूर्वी पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील एकमात्र आरोपी मिर्झा हिमायत बेग याला पुणे न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कमी करुन त्याला जन्मठेपेची सजा सुनावण्याचा निवाडा जाहीर केला आहे. संसदेवरील दहशतवादी हल्ला प्रकरणी अफझल गुरु यास झालेली फाशी चुकीच्या पद्धतीने दिली गेली अशी चर्चा सध्या देशभर सुरु असून एकूणच फाशीच्या शिक्षेच्या विरोधातील दबाव वाढत असून त्याचाच तर हा परिणाम नव्हे ना, अशी शंका उपस्थित केली जाऊ शकते. विशेष तपास पथकाने बेगवर अनेक आरोप ठेवले होते आणि ज्या बॉम्बचे स्फोट घडवून आणले गेले त्यांची निर्मितीदेखील त्यानेच केली या आरोपाचा त्यात समावेश होता. उच्च न्यायालयाने मात्र एक वगळता बाकी सर्व आरोपांमधून त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बेगच्या राहत्या घरी पोलिसाना तब्बल बाराशे किलो इतका मोठ्या प्रमाणातील आरडीएक्सचा साठा आढळून आला होता. परिणामी उच्च न्यायालयाने प्राणघातक स्फोटके जवळ बाळगल्याचा एकमात्र आरोप त्याच्याविरुद्ध सिद्ध होत असल्याचे स्वीकारुन त्यासाठी त्याला जन्मठेपेची सजा सुनावली. हिमायत बेगकडे जी स्फोटके सापडली त्याच स्फोटकांचा वापर करुन त्याने बॉम्ब तयार केले व जर्मन बेकरीत प्रत्यक्ष स्फोट घडवून आणणाऱ्यांच्या सुपूर्द केले असा कोणताही नि:संदिग्ध पुरावा तपासी यंत्रणेला सादर करता आला नाही असे निकालपत्रात नमूद करुन न्यायालयाने तपासी यंत्रणेवर कडक ताशेरे ओढले आहेत. बॉम्बची निर्मिती नेमकी कोणी केली, ते कोणी कोणाच्या हवाली केले आणि त्यांची नेमकी पेरणी कोणी केली हे सर्व प्रश्न अनुत्तरित राहिल्याचे व त्यालाही पोलीसच जबाबदार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सबब सतरा निरपराधांचा बळी घेणाऱ्या आणि ५८जणांना जखमी करणाऱ्या या घातपाती कृत्यामागील गुन्हेगार आजही मोकळेच आहेत. हिमायतला जन्मठेप झाली असून व जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत कारावास असा अर्थ अलीकडे मांडला जात असताना त्याने कच्च्या कैदेत काढलेले दिवस या शिक्षेत जमा धरले जातील असे जे न्यायालयाने म्हटले आहे त्याचा उलगडा मात्र होत नाही.