शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

राष्ट्रप्रेमाची भावनाच घडवेल क्रांती

By admin | Published: August 09, 2015 1:40 AM

औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर भारताला सर्वप्रथम पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवावी लागेल. आज आपला देश ९ लाख कोटी रुपयांचे क्रुड आॅइल (कच्चे तेल) आयात करतो.

- सत्यनारायण नुवालऔद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर भारताला सर्वप्रथम पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवावी लागेल. आज आपला देश ९ लाख कोटी रुपयांचे क्रुड आॅइल (कच्चे तेल) आयात करतो. हा आपल्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा बोजा आहे. आपल्या देशात कोलबेड मिथेन (सीबीएम), शेलगॅस आणि गॅस हायड्रेड्सचे भरपूर साठे आहेत. पण अजून आपण त्या साठ्यांचा उपयोगही करायला सुरुवात केलेली नाही. अमेरिकेमध्ये एकट्या शेलगॅसपासून इंधनाची ८० टक्के गरज भागविली जाते. पाकिस्तानसारख्या देशातही शेलगॅसपासून इंधन बनविणे सुरू झाले आहे. भारतातही हे घडायला हवे. आपल्याला क्रुड आॅइलसाठी मध्य-पूर्वेतील देशांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आपली अर्थव्यवस्था पांगळी झाली आहे. त्यामुळे इंधनाच्या बाबतीत आपल्याला स्वयंपूर्ण होणे अत्यावश्यक आहे.गेल्या वर्षीपासून आपण ‘मेक इन इंडिया’चा उद्घोष करतो आहोत. पण ‘मेक इन इंडिया’ची खरी गरज देशाच्या संरक्षणासाठी आहे. सैन्याला जी शस्त्रे, दारूगोळा लागतो त्या सामग्रीमध्ये स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी त्याचा वापर व्हायला पाहिजे. आपले दोन शेजारी पाकिस्तान आणि चीन हे भारताचे मोठे शत्रू आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आज जवळपास सगळी संरक्षण उत्पादने आयात केली जात असून, त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होतो. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेती आणि उद्योग या क्षेत्रांत गतिमानता आणण्यासाठी आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. आपल्या देशात मुबलक पाणी आहे. सुपीक जमीन आहे, सूर्यप्रकाश आहे आणि मनुष्यबळही आहे. इतर देशांच्या तुलनेत ही भारतासाठी खूप मोठी पर्वणी आहे. कारण कोणत्याच देशाजवळ शेतीसाठी एवढी आदर्श परिस्थिती नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण नद्या जोडण्याची गोष्ट करीत आहोत, पण अजूनही ही योजना कागदावरच राहिली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आमच्या नेत्यांमध्ये असलेला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे आहे. नद्यांना जोडण्याचे एक काम आपण करू शकलो तरी देशात एकाच वेळी कृषी आणि औद्योगिक क्रांती घडवून आणता येईल. विशेष म्हणजे त्यानंतर आपल्याला युनोच्या दारात उभे राहण्याची गरज भासणार नाही. उलट सर्व जग भारताकडे खाद्यान्न, क्रुड आॅइल, नैसर्गिक वायू, प्रशिक्षित मनुष्यबळ, संरक्षण सामग्रीसाठी आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आध्यात्मिकता यासाठी आशेने पाहू लागेल. विदर्भात रेंगाळलेले सर्व सिंचन प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. पश्चिम महाराष्ट्र, पंजाब या प्रदेशांमध्ये कृषी क्रांती केवळ सिंचनामुळे झाली. ती विदर्भातही व्हायला हवी. याचबरोबर औद्योगिक क्रांतीसाठी विदर्भात सवलतीच्या दरात वीज देणे आवश्यक आहे. विदर्भात जमीन, जंगल, खनिजसंपदा मुबलक प्रमाणात आहे. स्वस्त वीज मिळाली तर त्यातून औद्योगिक क्रांती घडू शकेल. हवेतर विदर्भासाठी वेगळी वीज वितरण कंपनी करण्याची तयारी सरकारने ठेवली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरच्या ‘मिहान’मध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आपण उभ्या केल्या, पण अद्याप त्याचा उपयोगच झाला नाही. परिणामी हा एवढा मोठा प्रकल्प निरुपयोगी ठरला.

(लेखक हे संरक्षण सामग्री क्षेत्रातील उद्योगपती आहेत.)