शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे अत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
3
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
4
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
5
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
6
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
7
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
8
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
9
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर
10
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
11
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
12
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
13
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
14
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
15
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
17
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
19
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
20
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू

सकारात्मकतेचा उदय

By admin | Published: January 03, 2016 2:15 AM

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीविषयी आपण मत व्यक्त करत असतो. मात्र, अशा घटनांविषयी सेलिब्रिटींना काय वाटते हे जाणून घेणेही चाहत्यांना आवडत असते.

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीविषयी आपण मत व्यक्त करत असतो. मात्र, अशा घटनांविषयी सेलिब्रिटींना काय वाटते हे जाणून घेणेही चाहत्यांना आवडत असते. अशा विविध घटनांवर महिन्यातून एक सेलिब्रिटी आपले विचार मांडणार आहे. या महिन्याचे मानकरी आहेत, विविध चित्रपट आणि मालिकांचे लेखन केलेले लेखक पराग कुलकर्णी.स्पर्धा आणि पैसा यांच्या नावाखाली आपण सगळ्याच गोष्टींकडे कानाडोळा करायला लागलोय. प्रत्येक गोष्ट आपण मोजायला आणि विकायला शिकलोय. टार्गेटचं जग आहे ना! स्वत:ला सोडून सगळ्यांना टार्गेट करत बसलोय आपण. या वर्षापासून बदलायचं. एक ‘डिलिट’चं बटण चोवीस तास स्वत:जवळ ठेवायचं. मनात नकार आला की दाबलं बटण. ‘नाही’ आला की दाबलं बटण. आपण असं दर वर्षी ठरवतो, पण मग ‘नाही’ का जिंकतो? तो जिंकत नाही, तर आपण हरतो. आता जिंकायचं. मोठ्यांच ऐकायचं, लहानांकडून समजून घ्यायचं आणि सकारात्मक माणूस म्हणून जगायचं. त्यातूनच जन्माला येणार ती ‘माणुसकी’. माणुसकी, माणुसकी म्हणजे तरी काय हो? लोकलमध्ये बसण्याची आसनं कमी केली आहेत, तर स्वत: उठून दुसऱ्याला बसण्याची जागा देण्याची माणुसकी. ‘माणुसकी’ म्हणजे नेमक काय, याचाच शोध स्वत: च घ्यायचा. कुणी सोबत येवोत अथवा न येवोत, एकच लक्षात ठेवायचं. ‘नाही’ला सोबती म्हणून घ्यायचं नाही. एकमेकांशी चर्चा करू. काय बदल घडतील ते बघू. एक अशी सकारात्मक साखळी तयार करू, जी स्वत:ला बदलेल. ‘मी’मध्ये सकारात्मक बदल झाला, तर ‘आम्ही’ सकारात्मक होईल. ‘आम्ही’ सकारात्मक झाला की, ‘आपण’ सकारात्मक होणारच! पण या बदलाची सुरुवात ‘मी’पासून करावी लागणार हे नक्की. आपण ती सुरुवात करणार, याबद्दल मला खात्री आहे. मग तुम्हालाही असलीच पाहिजे.नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...! वर्षानुवर्षे हे एकच वाक्य शुभेच्छा देत आलं आहे! कमाल आहे नाही!...इतकी वर्ष झाली... तप लोटले असतील, पण या वाक्यामागची भावना आजही तितकीच ताजी आणि खरी वाटते! या मागचं कारण काय असेल? हा विचार मनात येतो. शुभेच्छा पाठवणारी माणसं बदलत जातात. आपल्या लेखी त्यांचा संग्रह वाढत जातो, तर कधी कमी होत जातो. बरं ... संग्रह म्हटला की, तो जुना व्हायचीही शक्यता असते, पण ही एक शुभेच्छा...तो संग्रह नेहमी ताजातवाना ठेवते. तुम्हीच मोजा या वर्षी किती नवीन माणसं या संग्रहात जोडली गेली. ‘माणुसकी संपली हो!’ असं आजकाल ऐकायला मिळतं. तरी बघा यंदा किती शुभेच्छा नवीन होत्या? माणूस जोपर्यंत आहे, तोपर्यंत माणुसकी नाही संपणार. कशी संपेल? तुम्हीच सांगा. थंडी, ऊन, पाऊस यापैकी काहीतरी बदललं आहे का? नाही ना? त्याच प्रमाण कमी-जास्त झालं आहे, हे मान्य आहे. येण्या-जाण्याच्या वेळा बदललेल्या आहेत, पण मोसम नाही गायब झाले आणि होणार पण नाहीत, तसेच माणुसकीचं आहे. प्रमाण कमी-जास्त होईल, पण गायब नाही होणार. फक्त गारांमधून हिरे शोधायला जी नजर लागते ना, तशीच नजर माणसातून माणुसकी शोधायला किंवा माणुसकीचा माणूस शोधायला लागणार आहे. कुणीतरी म्हटलं आहे की, ‘बाभळीच्या लाकडाला श्रावणात हळद कुंकू लावलं, तरी त्याचा चंदन नाही होत,’ अगदी तसंच आहे. बाभळी आणि चंदन यांच्यातील फरक ओळखण गरजेचं आहे आणि त्यासाठी हवी सकारात्मक दृष्टी.आपल्या आजूबाजूला होणारे बदल हे काळाची गरज आहेत. आपल्याला या प्रश्नांपलीकडे जाऊन काहीतरी शोधायचं आहे. ती ‘माणुसकी’ की, तो ‘माणूस’ ? परत प्रश्न.बघू यात उत्तर शोधून सापडतेय का नाही ते. संग्रहात हरवलेली माणसं जर पुन्हा सापडत असतील, तर प्रश्नाची उत्तरदेखील सापडणार. यालाच म्हणतात ‘सकारात्मक माणुसकी’. या वर्षी बोलण्यात आणि वागण्यात ‘नाही’ हा शब्द वापरायचा नाही. जमेल? आता अजून एक मजा बघा. प्रश्नापलीकडे जाऊन काहीतरी शोधायचं म्हणतोय आपण आणि मीच प्रश्न विचारला. ‘मी’! मी-मी करता अहंकाराचा रस गळायला लागला की, माणूस रसातळाला जातो आणि मग हरवते माणसातली माणुसकी !‘मी का करू?’ आणि ‘मीच का करू?’ दोन्ही ‘मी’मध्ये अतिशय सूक्ष्म असा फरक आहे आणि सूक्ष्म असूनही तो फरक एखाद्या दरीइतका खोल आहे.पहिला ‘मी’ जो आहे, तो फक्त स्वत:भोवतीच्या वलयाशी निगडित आहे आणि ‘मीच’ जो आहे, तो गर्दीत असलेल्या स्वत:बद्दलचा आहे आणि खर सांगू, दोन्ही बरोबर आहेत. खरंच ...! कारण नवीन वर्षात जो सकारात्मक दृष्टिकोन आणायचा आहे, तो या ‘मी’ पासूनच सुरू होतो.मनात एक विचार आला आहे. बघा कसा वाटतोय.. असं करायच की, आजपासून दिवसभरात आपण सगळे जण ‘नाही’च्या संदर्भातील किती शब्द वापरतो ते मोजायचं आणि दिवसातून किती वेळा ‘नाही’ हा शब्ददेखील वापरतो ते ही मोजायचं, पण एकाला एक अशी नकारात्मक शब्दांची जी रेल आपल्या आयुष्यात आपण जोडत जातो, त्यांनी आपल्या स्वत:वर काय परिणाम होत असेल? विचार केलाय कधी? खर सांगू का, मीही आजच करतोय. आता बघा ‘मी नाही केला?’ हे लिहू शकत होतो, पण ‘नकार’ हा सकारात्मक वाटावा, याची सवय लावून घेतोय. सुरुवात ‘माझ्या’पासून होते. मी जेव्हा ठरवीन, तेव्हाच बदल घडू शकतो. मग तो समाजातला असो, नाहीतर घरातला असो. ज्या दिवशी हा ‘नाही’ नाहीसा होतो, त्या दिवशी स्वत:कडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलतो आणि परिणामी, जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते. तुम्हाला ती गोष्ट माहीत असेलच, ‘एका गावाबाहेर एक शास्त्रज्ञ आपली उपकरणं घेऊन बदलत्या वातारणाबद्दल अभ्यास करत होता. तेथे त्या वर्षी मनासारखा पाऊस पडला नसल्यामुळे गावकरी चिंताग्रस्त होत. कुणीतरी सुचवलं, म्हणून त्या शास्त्रज्ञाला भेटून काही उपाय आहे का? किंवा चमत्कार घडू शकतो का विचारू यात, असा विचार मांडला. गावकरी त्या शास्त्रज्ञाकडे आले. तो शास्त्रज्ञ आपली उपकरणात रमला होता. गावकऱ्यांचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि आकाशाकडे एकटक लावून बघितलं आणि ‘उद्या संध्याकाळी इकडे या पाऊस पडेल!’ असा एक निष्कर्ष मांडला. गावकरी खुश झाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चातकासारखी सगळे पावसाची वाट बघायला लागले, पण संध्याकाळ कोरडी गेली. असे दोन-तीन दिवस घडत राहिले, पण सगळा काळ कोरडाच गेला. शेवटी गावकऱ्यांची सहनशक्ती संपली. काठ्या-लाठ्या घेऊन समस्त गावकरी त्या शास्त्रज्ञाकडे पोहोचले आणि संतप्त गावकऱ्यांनी त्याला जाब विचारायला सुरुवात केली. त्यांना फसवण्याचं कारण ते शास्त्रज्ञाला विचारायला लागले. शास्त्रज्ञ सगळ्यांना बघत होता. त्याने शांतपणे उत्तर दिलं, ‘तीन दिवस मी तुम्हाला सांगतोय सकाळी पाऊस पडेल, दुपारी पाऊस पडेल, संध्याकाळी पाऊस पडेल, त्या वेळी एकजण तरी छत्री घेऊन उभा राहिला का?’ कारण आपल्याला स्वत:वरच विश्वास नसतो आणि म्हणूनच तो समोरच्या व्यक्तिवर विश्वास ठेवत नाही आणि येथूनच खरा उगम होतो ‘नाही’ या शब्दाचा. आपल्यापेक्षा मोठी माणसं काही समजावयाला गेली की, आपण दोन्ही कान उघडते ठेवतो. मात्र, हा वन-वे ट्रॅफिक असतो. एका कानामधून येणारी गाडी दुसऱ्या कानामधून बाहेर जाते, ती परत वळून न येण्यासाठीच. आपल्याला खात्री असते की, जग बदललं आहे आणि हा वयाने मोठा माणूस ते समजू शकत नाहीये. मग आपल्यापेक्षा लहान व्यक्ती जेव्हा आपल्याला काही सांगायला जाते, तेव्हा तर काही सांगायलाच नको किंवा विचार करून बघा, आपली काय प्रतिकिया असते. ‘आपली’ म्हणतोय हा मी. कारण मी पण तुमच्यासारखाच आहे. नकार, नकार, नकार आणि फक्त नकार! कुणाचं ऐकायचं नाही आणि ऐकलं तरी ते सोडून देण्यासाठी ऐकायचं. मी आता ऐकायचं ठरवलं आहे. मला अध्यात्माबद्दल जास्त ज्ञान नाही, पण अस म्हणतात की, श्रवणभक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे.