शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

गुलाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2017 11:30 PM

मला माझ्या घराविषयी, गावाविषयी, राज्याविषयी आणि राष्ट्राबद्दल काय वाटतं? असा प्रश्न खुपदा विचारला जातो.

मला माझ्या घराविषयी, गावाविषयी, राज्याविषयी आणि राष्ट्राबद्दल काय वाटतं? असा प्रश्न खुपदा विचारला जातो. म्हणजे देशभक्त आणि देशद्रोह या एकाच नाण्याच्या दोन गोष्टी आहेत. मी एकाचवेळी दोन्ही असतो. देशाचे कोणतेही नुकसान जेव्हा कळत नकळत माझ्या हातून घडते तेव्हा मी द्रोही असतोच. केळाचे साल रस्त्यात टाकणे, वरच्या मजल्यावरून केसांचे गुंते फेकणे, लाइनी मोडणे, सिग्नल तोडणे आणि हो अलीकडेच हेल्मेट घालणे हे सारं करताना आपण नकळत द्रोह करतोच. मग देशभक्ती कोणती? तर या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी नाकारणे, परकीय मालाची होळी करणे, १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी धडाक्यात साजरी करणे. मग हे सगळे उत्सव करताना बेंबीच्या देठापासून ओरडणे हेही चालूच असते. आपण एखादी गोष्ट ठरवून करून टाकली की शिक्का बसतोच ! म्हणूनच देशभक्त ठरणे आणि असणे हेही विरळच आणि तसाच देशद्रोही ठरविणे कठीणच ! आपल्या महाकाय देशाला हजारो माणसांनी घडवलंय, गंमत पहा, माझा तेलगू, मल्याळम, तामीळ बांधव तिकडे राष्ट्रभक्त म्हणून देशप्रेमाच्या गोष्टी सांगत असतो, ज्या मला कळत नसतात. इकडे मी मराठीत ‘जय भारत’ पुकारत असतो. ते त्याला कळत नसतं. आपण एकाच देशाचे घटक आहोत, मग भगतसिंग असो की चाफेकर बंधू असो, वासुदेव बळवंत फडके असो की बंगालचा बोस असो एकच चिवट धागा आपल्याला जोडून आहे आणि तो म्हणजे भारत देश आणि या देशातील एका विभागाचा मी एक घटक. आपण आपल्या देशाच्या या वैविध्यपूर्ण माहितीचा कधी विचार केला आहे. त्यामुळेच कदाचित कट्टर मुस्लीम आणि देशभक्त मुस्लीम यांच्यात आपल्याला फरक करता येत नाही. आणि त्यामुळेच एकत्वाची भावना कायम साशंक राहते म्हणून ‘भारत माता की जय’ हा फक्त सवाल नाही तर उत्तरच आहे. भारताबद्दल मत मांडताना आपण काय म्हणतो हा प्रश्न आहे.मी म्हणालो, भारत माता की जयत्यांनी माझ्यावर गुलाब उधळलेआणि देशभक्तीचा अंगारा लावला, मी पुढे गेलो आणिपुन्हा म्हणालो, भारत माता की जयत्यांनी काट्यांनी मला रक्तबंबाळ केलेआणि देशद्रोहाची राख फासलीएकाचवेळी द्रोह आणि भक्ती सांभाळणाऱ्यागुलाबाचा मला राग आला आणिमी गुलाबाला खुडले, चिरडले, त्याला चुरगळले आणि बघता बघता भारत माता सुगंधित झाली...मी या देशाचा कोण लागतो? गुलाबाला कुठे बसायचे? कुणाबरोबर जायचे हे कुठे माहीत? त्याला असेपर्यंत फक्त सुगंध उधळीत रहायचे एवढेच माहीत, तरीही गुलाब आपल्याला प्रिय कारण आपण त्याला वाहतो देवाला किंवा टाकतो प्रेतावर. तो दोन्ही ठिकाणी स्थितप्रज्ञ सुगंधी म्हणून नेहरूंच्या कोटाला असलेला गुलाब केरात जातोही! आपण एवढेच, सर्वत्र गुलाब लावायचे, सर्वत्र गुलाब व्हायचे ! ते शक्य झाले की झालो आपण जिंदगीच्या मैफलीचे खरे शिलेदार. खरे गुलाब !-किशोर पाठक