शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

रशियन तरूणीने केले ब्रिफकेसशी लग्न! वस्तूंशी लग्न करण्याचा हा सोस  का ?

By meghana.dhoke | Published: December 19, 2020 2:00 PM

रेनने ब्रिफकेसशी लग्न करण्यामागे नक्की कोणती मानसिक गुंतागुंत आहे हे कळायला अर्थात काही मार्ग नाही मात्र जगभरात माणसं विचित्र मनोवस्थेतून जात असे टोकाचे निर्णय घेताना दिसतात.

ठळक मुद्देथट्टा-टवाळी आणि आचरटपणाचं लेबल लावणं तसं सोपंच आहे, पण त्यामागे मनाची भलतीच कोडी असतात हे नक्की.

गेल्या आठवड्यात एक बातमी जगभरातल्या माध्यमात गाजली. रेन गॉर्डन नावाच्या २४ वर्षीय रशियन मुलीने तिच्या ब्रिफकेसशी मॉस्को येथे विवाह केला. तिनं त्या ब्रिफकेसचं नाव ठेवलं गाइडऑन. रेननं जाहीर केलं होतं की, या ब्रिफकेसच्या आपण प्रेमात आहोत, तिच्याशी लग्न करणार आहोत. जूनमध्ये रीतसर विधी होऊन रेनचं ब्रिफकेसशी लग्न झालं. ( तिला ब्रिफकेस म्हटलेलं रेनला आवडत नाही, तिचं नाव गाइडऑन आहे तसंच म्हणा, असा तिचा आग्रह असतो.) कुणालाही वाटावं की, हा काय आचरटपणा, या मुलीला वेड लागलेलं आहे का असं कुणी ब्रिफकेसशी लग्न करतं का? वाट्टेल ते करतात लोक हल्ली आणि त्याला माध्यमं प्रसिद्धी देतात. समाजमाध्यमांत यावर टीकाही केली. तसं पाहता वरकरणी ही बातमी चटपटीत वाटत असली तरी या मागे एक गंभीर समस्या आहे, एकप्रकारचा आजार आहे. त्या आजाराचं प्रमाण जगभर वाढतं आहे. त्याला म्हणतात ऑब्जेक्टफिलिया. अर्थात काही माणसांना काही वस्तू इतक्या आवडतात की प्राणाहून प्रिय होतात. ती माणसं त्या वस्तूंच्या प्रेमात पडतात. त्या वस्तू जवळ नसतील तर वेडीपीशी होतात. त्या वस्तूंनाच आपल्या जन्माचा जोडीदार मानून त्याच्याशी विवाहही करतात. असा वस्तूशी विवाह करणारी रेन ही काही जगात एकटीच किंवा पहिलीच व्यक्ती नाही. याआधीही काही व्यक्तींनी असे विवाह केलेले आहेत. रेनचंच उदाहरण घ्या, वयाच्या आठव्या वर्षीपासून तिला वस्तूच अधिक आवडतात. तरुणपणी ती प्रेमातही पडली, पण पुरुष जोडीदारासह ते नातं फार काळ टिकलं नाही. रेन सांगते की, शहरात उघडलेल्या मॉलच्या इमारतीच्याही ती प्रेमात होती, पण लोक हसतील म्हणून मी तेव्हा काही बोलले नाही. पाच वर्षांपूर्वी ही ब्रिफकेस तिनं विकत आणली आणि आता त्या ब्रिफकेसशीच लग्न करण्याइतपतच तिचा जीव त्यात गुंतल्याचे ती सांगते. आणि समर्थनही करते की, जिवंत व्यक्तीवर करतात तेच प्रेम असं ठरवणारे तुम्ही कोण, प्रेम -प्रेम असतं. ते कशावरही करावं. रेन ॲनिमिझम नावाची धार्मिक विचारधारा मानते, त्यानुसार प्रत्येक वस्तूत प्राणतत्त्व असतं असं काहीजण मानतात.

त्यानुसार ट्रेन स्टेशनशी लग्न करणं, आपल्या लॅपटॉपच्या प्रेमात असणं, त्यांच्याशी संवाद अशाही घटना घडतात. अलीकडेच ४५ वर्षीय अमेरिकन महिला कॉरोल सांता फे मेड यांनी एका ट्रेन स्टेशनशी लग्न केलं. एरिका आयफेल यांनी फ्रान्समधल्या आयफेल टॉवरशी लग्न केल्याची घटनाही गाजली होती.

मात्र हे सारं ज्या ऑब्जेक्टफिलियामुळे होतं तो कशामुळे होते. वस्तू अशा टोकाच्या आवडणं, त्या नसतील तर वेडंपिसं होणं, त्या वस्तू आपल्याशी बोलतात, आपलं ऐकतात, त्यांना आपल्या भावना कळतात हे सारं कशामुळे वाटतं?

त्याचं विश्लेषण आणि अभ्यासही जगभर सुरू आहे.

मानसशास्त्रतज्ज्ञांच्या मते ऑब्जेक्टफिलिया असण्याची काही कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात प्रमुख म्हणजे माणसांपासून फटकून वागणं. काही माणसं अती एकेकटी असतात. कुणाशी बोलणं, माणसांसोबत राहणं त्यांना अवघड जातं. ते लाजाळूही असतात आणि एकेकटेही. पण या माणसांना बोलायचं तर असतं, मग ते बाहुल्या, फोन, दागिने किंवा त्यांच्या एखाद्या आवडत्या वस्तूशी तासंतास बोलतात. त्यासोबतच राहतात. दुसरं कारण म्हणजे काही माणसांना स्वत:ला बोलायला आवडतं पण त्यांना दुसऱ्या कुणाचंही मत नको असतं. कुणी वाद घातलेला आवडत नाही. ते स्वत:चंच खरं करतात. मग माणसांपेक्षा वस्तूशी बोलून आपली बोलण्याची गरज भागवणं त्यांना सुखकर वाटतं. गुंतागुतीच्या या मानसिकतेची मुळं अस्वस्थ लहानपणाही आडळतात. एकेकटं लहानपण, सतत अवतीभोवती भांडणं, कुणीच बोलायला नसणं यातूनही अनेकांना एखाद्या निर्जीव वस्तूशी बोलणंच जास्त सोयीस्कर वाटू लागतं. त्याची सवय लागते.

काही शास्त्रज्ञ तर असंही सांगतात की, काही काही माणसांना खरंच विचित्र आकार, रचना पराकोटीच्या आवडतात. त्या इतक्या का आवडतात, का त्यांना वेडं करतात हे मात्र अजूनही कोडंच आहे. याशिवाय आधी म्हंटलं तसं ॲनिमिझम सारख्या गोष्टींवर भरवसा ठेवूनही अनेकजण प्राणी, झाडं, नद्या, वस्तू अशा अनेक गोष्टींच्या प्रेमात पडतात किंवा त्या वस्तू सतत जवळ बाळगतात.

त्यांना थट्टा-टवाळी आणि आचरटपणाचं लेबल लावणं तसं सोपंच आहे, पण त्यामागे मनाची भलतीच कोडी असतात हे नक्की.

 

बॉडीबिल्डर तरुणाचं  बाहुलीशी लग्न

 

अलीकडेच युरी टोलोचको नावाच्या कझाखस्तानी बॉडीबिल्डर तरुणानं एका आकारानं प्रचंड मोठ्या बाहुलीशी लग्न केलं. त्याच्या लग्नाची छायाचित्रंही इन्स्टाग्रामवर व्हायरल होती.

टॅग्स :russiaरशिया