शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

व्यंकय्याजी, ग्रामीण भागात फिरायचे होते!

By रवी ताले | Published: November 14, 2017 12:26 AM

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी नागपुरात होते. त्यावेळी उपस्थिताना संबोधित करताना, त्यांनी कृषी क्षेत्रावर व्यापक भाष्य केले.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी नागपुरात होते. त्यावेळी उपस्थिताना संबोधित करताना, त्यांनी कृषी क्षेत्रावर व्यापक भाष्य केले. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात राज्यकर्त्यांनी कृषी क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून धोरणे तयार न केल्यानेच, शेतकºयाला आत्महत्या करावी लागत आहे, हा त्यांच्या भाषणाचा सार होता. उपराष्ट्रपती हे संवैधानिक पद आहे. त्या पदावरील व्यक्ती राज्यसभेची पदसिद्ध अध्यक्षही असते. स्वाभाविकच त्या व्यक्तीने पक्षातीत असणे, अभिप्रेत असते. त्यामुळे नायडू यांच्या वक्तव्यामागे एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाला लक्ष्य करण्याचा उद्देश नक्कीच नसावा! स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या सर्वच राजकीय विचारधारा शेतकºयांच्या आजच्या अवस्थेसाठी जबाबदार आहेत, असेच त्यांना सुचवायचे असावे. त्यामध्ये चुकीचे काही नाही. शेतकºयाची आजची हलाखीची स्थिती हा गत ७० वर्षातील धोरणांचाच परिपाक आहे. या कालावधीत, अपवादात्मकरीत्या काही चांगले निर्णय निश्चितपणे झाले आणि त्यांचे तात्कालिक लाभही शेतकºयांच्या पदरात पडले; मात्र एक वर्ग म्हणून त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यात हा देश सपशेल अपयशी ठरला, हे कटूसत्य आहे. शेतकºयाला स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सक्षम करण्याऐवजी, त्याला सतत अनुदानाच्या कुबड्या पुरविण्यातच राज्यकर्त्यांनी धन्यता मानली. त्यामुळे शेतकरी उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला व आपल्यावर अवलंबून राहील आणि त्यायोगे आपली मतपेढी शाबूत राहील, या मतलबी अपेक्षेशिवाय दुसरे कोणते कारण त्यामागे असू शकत नाही. बरे, राज्यकर्त्यांनी ज्यांचा वारेमाप डांगोरा पिटला, ती प्रत्यक्षात अनुदाने नव्हतीच, तर शेतकºयांची लूट होती, हे १९९० च्या दशकात स्व. शरद जोशींसारख्या विद्वान अर्थतज्ज्ञाने सप्रमाण सिद्ध करून दाखविले होते. अनुदान नको, केवळ शेतमालाला योग्य भाव द्या, ही शेतकºयांची उचित मागणी कधीच, कोणत्याही राजकीय विचारधारेच्या राज्यकर्त्यांच्या कानी पडलीच नाही. विरोधात असताना शेतकºयांचा कैवार घेऊन सत्ताधाºयांवर टीकास्त्रे डागावी आणि सत्ता मिळाली, की पूर्वासुरींचीच धोरणे पुढे राबवावी, हाच कित्ता सगळ्याच राज्यकर्त्यांनी गिरवला. परिणामी, कृषी क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या या देशात कृषी क्षेत्राच्या विकासाचा फार गांभीर्याने कधी विचारच झाला नाही. त्यामुळेच सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीमधील कृषी क्षेत्राचा वाटा सतत घसरत गेला आणि कृषी क्षेत्राच्या विकास दरानेही नीचांकी पातळी गाठली. या दोन्ही आघाड्यांवर सुधारणा घडवून आणत, २०२२ पर्यंत शेतकºयांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याचे गाजर दाखवून, २०१४ मध्ये सत्तांतर घडविण्यात आले खरे; मात्र पुढील लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली तरी, परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिकट होत असल्याचेच चित्र दिसत आहे. आधीच्या राजवटीत हमीभाव कमी असल्याची तक्रार करणारा शेतकरी आता किमान हमी भावाने तरी खरेदी करा, असे डोळ्यात अश्रू आणून म्हणत आहे. उपराष्ट्रपती राज्याच्या उपराजधानीत येऊन गेले. ते विदर्भाच्या ग्रामीण भागात फिरले असते, तर शेतकरी किती हवालदिल झाला आहे, हे त्यांना कळले असते!- रवी टाले१ं५्र.३ं’ी@’ङ्म‘ें३.ूङ्मे

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू