- उमेश शर्मा, सीएअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीआर-९ सी अंतर्गत कोणती माहिती द्यावयाची आहे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जीएसटीआर-९ सी हा पार्ट अ आणि पार्ट इ अशाप्रकारे दोन भागांत विभागलेला आहे. पार्ट अ अंतर्गत करदात्याला वार्षिक रिटर्न व वहीखात्यानुसार विक्री व खरेदी यांचा रीकन्सीलीएशन द्यावयाचा आहे, व पार्ट इ अंतर्गत जीएसटी ऑडिट रिपोर्ट प्रमाणित करून घ्यावयाचे आहे.अर्जुन : कृष्णा, करदात्याला जीएसटीआर-९ सी मध्ये विक्रीसंबंधीची माहिती कशाप्रकारे द्यावयाची आहे?कृष्ण: अर्जुना, विक्रीसंबंधीची माहिती ही टेबल ५ ते टेबल ११ पर्यंत द्यावयाची आहे. टेबल ५ आणि ७ मध्ये करदात्याला विक्रीबद्दल माहिती द्यावयाची आहे व टेबल ९ मध्ये कराच्या दरानुसार कर दायित्वाची माहिती टेबल ११ मध्ये द्यावी लागेल. रिकन्साईल न झालेल्या पुरवठ्याची व कराची कारणे ही टेबल ६, ८ आणि १0 अंतर्गत द्यावयाची आहे.अर्जुन : कृष्णा, टेबल ५ आणि ७ अंतर्गत कोणती माहिती द्यावी लागेल?कृष्ण : अर्जुना, टेबल ५ मध्ये करदात्याला एकूण उलाढालीचे रिकन्सीलेशन द्यावयाचे आहे. ती माहिती खालीलप्रमाणे द्यावी लागेल.टेबल ५अ अंतर्गत करदात्याला प्रत्येक जीएसटी नंबर प्रमाणे आर्थिक वर्ष २0१७-१८ मधील वही खात्यानुसार असलेल्या उलाढालीची माहिती द्यावी लागेल.टेबल ५ इ मध्ये मागील आर्थिक वर्षात जे अनबील्ड रेव्हेन्यु संचय प्रमाणीनुसार नमूद केले गेल आहे व ते चालू आर्थिक वर्षात बिलिंग करण्यात आले आहे त्याबद्दल माहिती द्यावी लागेल.आर्थिक वर्ष २0१७-१८ मध्ये मिळालेले अडव्हान्स जीएसटी भरलेला असून जर ते वहीखात्यात उत्पन्न म्हणून दाखवलेले नसल्यास ते टेबल ५उमध्ये द्यावे लागेल.सीजीएसटी कायदा २0१७ मधील शेड्युलनुसार असलेल्या सप्लाय (पुरवठा) एकूण मूल्य हे टेबल क्रं ५ (ऊ) मध्ये द्यावे लागेल. (जसे सर्व्हिसची आयात, गिफ्ट इ.)ट्रेड डिस्काउंट जे वहीखात्यात नमूद केले असून ते कपात करण्यास पात्र नाही असे टेबल क्रमांक ५ ऋ मध्ये दाखवावे लागेल. तसेच एप्रिल २0१७ ते जून २0१७ मधील एकूण उलाढाल ही टेबल क्रमांक ५ ॠ द्यावी लागेल.क्रेडिट नोट जी मान्य आहे, ती टेबल ५ख मध्ये दाखवावी लागेल, व तसेच विदशी व्यापारापासून असलेला नफा किंवा तोटा टेबल क्रमांक ५ठ मध्ये दर्शवावा लागेल.जीएसटीआर - ९ तसेच वही खात्यामध्ये दाखवलेल्या तफावतीची अन्य कारणे ही टेबल क्रमांक ५ड मध्ये द्यावी लागतील. उदा:- स्थायी मालमत्तेची विक्रीनिल रेटेड, झीरो रेटेड, एक्झाम्पटेड, नॉन-जीएसटी पुरवठा इत्यादीबद्दलची माहिती टेबल ७ मध्ये करपात्र उलाढाल मिळविण्यासाठी द्यावी लागेल. वरीलप्रमाणे मिळालेल्या करपात्र उलाढालीचा तपशील हा वार्षिक रिटर्ननुसार असलेल्या करपात्र उलाढालीशी तपासावा लागेल. त्यात काही आढळल्यास ते टेबल क्रमांक ८ मध्ये कारणांसहित दाखवावे लागेल.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, जीएसटी लागू झाल्यापासूनची ऑडिटची ही पहिलीच वेळ आहे. त्यानुसार करदात्याला व ऑडिटरला योग्य अशाप्रकारे झालेल्या व्यवहारांची माहिती देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ऑडिटरला जीएसटी ऑडिट करतांना निर्णायक भुमिका निभवावी लागणार आहे. सर्व नियम नीट पाहून टेबल तपशीलवार भरले की करदात्याला काहीच समस्या उद्भवणार नाही, हे नक्कीच.
जीएसटी ऑडिटमध्ये विक्रीसंबंधी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 4:20 AM