शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

सलमान, झोपड्या आणि राजकारण

By admin | Published: May 11, 2015 5:15 AM

सलमानला शिक्षा झाली, जामीन मिळाला आणि सगळा देश माध्यमांनी ढवळून काढला. ‘जेवढ्या कमी वेळात बेल मिळाला, तेवढ्या कमी वेळात भेळही मिळत नाही’ अशा पातळीवर चर्चा गेली.

अतुल कुलकर्णीसलमानला शिक्षा झाली, जामीन मिळाला आणि सगळा देश माध्यमांनी ढवळून काढला. ‘जेवढ्या कमी वेळात बेल मिळाला, तेवढ्या कमी वेळात भेळही मिळत नाही’ अशा पातळीवर चर्चा गेली आणि या विषयामागचे गांभीर्यच संपवले गेले. हे सगळे जाणीवपूर्वक झाले आहे. मूळ विषयाकडे कोणी येऊच नये अशी इच्छा असणारे यात यशस्वी झाले. रस्त्यावर लोक झोपले आणि सलमानच्या गाडीने त्यांना चिरडले एवढ्यापुरता हा विषय मर्यादित केला गेला. मात्र लोक रस्त्यावर का झोपत होते, तशी वेळ त्यांच्यावर कोणी आणली, त्यांच्यासाठीच्या योजनेचे कसे मातेरे केले गेले, या मूळ प्रश्नांना मात्र काही अपवाद वगळता सोयीस्कररीत्या बगल दिली गेली. मुंबईत लोंढेच्या लोंढे येतात. जागा मिळेल तेथे पथारी पसरतात. हे पाहून वीस वर्षांपूर्वी युती सरकारने एसआरएची योजना आणली. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना झाली. झोपड्यात राहणाऱ्यांना फुकट घरं देण्याच्या योजनेचा जेवढा प्रचार, प्रसार राज्यात झाला नाही, तेवढा तो देशभरात झाला. कोठेही झोपडी टाकली की सरकार फुकट घर देते, हे माहिती झाले आणि देशभरातून मुंबईकडे येणाऱ्यांचे लोंढेही वाढले. अनेक राजकीय नेत्यांनीही आपल्या झोपड्या टाकत यात हात धुऊन घेतले. हेच लोंढे मतपेटीचे साधन बनताच झोपड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आले. त्यातून झोपडपट्टी दादा ही नवी जमात तयार झाली. मुंबईकरांना संरक्षण देणाऱ्या पोलीस हवालदाराला याच दादांच्या दयेवर अवलंबून रहावे लागते, असे लेखी विधान करण्यापर्यंत गृहसचिवांची मजल गेली. झोपड्यांच्या किमती कोटीच्या घरात गेल्या.दरम्यान, युती सरकार गेले, आघाडी सरकार आले. पंधरा वर्षांत त्यांनी एसआरए योजनेचे पुरते वाटोळे करून टाकले. बिल्डरांना हव्या तशा अटी टाकल्या गेल्या, त्यांच्या सोयीचे नियम बनवले गेले. एकदा का एसआरए योजनेला मंजुरी मिळाली आणि बिल्डर निश्चित झाला की या योजना दहा दहा वर्षे जाणीवपूर्वक थंड्या बस्त्यात टाकल्या गेल्या. तेवढ्या काळात त्या जागांचे भाव गगनाला भिडले. घर मागायला येणाऱ्यांना दूर लोटले गेले किंवा त्यांची तोंडं तरी बंद केली गेली. तोंड बंद झालेल्यांनी दुसऱ्या जागी झोपड्या टाकल्या. नंतर एसआरएच्या हिश्श्याची घरं कुठेतरी कोपऱ्यात बांधली गेली आणि उर्वरित जागेवर मोठमोठे टॉवर्स उभे राहिले. त्यातून बिल्डरांनी करोडोंची माया जमवली. झोपडीत राहणारे मात्र होते तिथेच राहिले. या संपूर्ण काळात मुंबईत येणाऱ्यांना, वाट्टेल तेथे पथारी पसरणाऱ्यांना चाप लावणारा कोणताही सक्षम कायदा राज्य सरकार करू शकले नाही किंवा अतिक्रमणं करून झोपड्या टाकल्याबद्दल कधीही एखाद्या वॉर्ड आॅफिसरला खडी फोडायला पाठवले गेले नाही. परिणामी आजही लोकांचे लोंढे येणे थांबलेले नाही. चारचाकी चालवता आली की मुंबईची माहिती नसली तरी त्याला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळू लागली, सुरक्षा एजन्सीच्या नावाखाली पॅकेजमध्ये लोंढे आणले जाऊ लागले.बांगलादेशी नागरिकांनी यात आणखीनच भर टाकली. आजही अवघ्या चार पाच हजारांत बांगलादेशाच्या सीमा ओलांडून मुंबईत आणून सोडणाऱ्या टोळ्या बिनदिक्कत कार्यरत आहेत. हे उघड सत्य आहे. फार दूर कशाला, मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या समोर असलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये रस्तेच्या रस्ते अडवून छोट्या मोठ्या वस्तू विकणाऱ्यांची जरी कठोर तपासणी केली तर हजारो बांगलादेशी सापडतील. पण ते करण्याची इच्छाशक्ती ना आघाडी सरकारमध्ये होती, ना ती फडणवीस सरकारकडे आहे.सलमानमुळे चार दिवस माध्यमांना विषय मिळाला पण रस्त्याच्या कडेला फुटपाथवर जीव मुठीत घेऊन झोपणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. हे असे झोपणे बंद व्हावे म्हणून कोणतीही उपाययोजना झालेली नाही. फुकटात घर मिळण्याचे स्वप्न लोकांच्या मनात कायम आहे. व्होट बँकेचे राजकारणही अखंडपणे चालू आहे. चर्चा मात्र फक्त सलमानच्या अटकेची आणि सुटकेची होते आहे...