शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

महात्मा बसवेश्वरांची समताधिष्ठित समाज रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 3:01 AM

१२ व्या शतकात जन्मलेल्या महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुता व न्याय या भूमिकेचे समर्थन करून देशात मानवतावादी युग निर्माण केले. श्रमाला प्रतिष्ठा निर्माण करून दिली. श्रमाला कैलासाचे (कायक वे कैलास) रूप दिले

- प्रा. सुदर्शन बिराजदार(अध्यक्ष, लिंगायत महासंघ महाराष्ट्र प्रदेश)१२ व्या शतकात जन्मलेल्या महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुता व न्याय या भूमिकेचे समर्थन करून देशात मानवतावादी युग निर्माण केले. श्रमाला प्रतिष्ठा निर्माण करून दिली. श्रमाला कैलासाचे (कायक वे कैलास) रूप दिले.  Work is worship ही पद्धत लागू करून नवा अध्याय रचला म्हणून त्यांना युगप्रवर्तक, क्रांतिसूर्य, विश्वगुरू व महात्मा आदी नावाने आदराने संबोधले जाते. संपूर्ण मानवाच्या कल्याणाचे भले करण्याचा विचार करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची आज ९१३ वी जयंती आहे. त्या निमित्ताने हा लेख प्रपंच.विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे शिवभक्त मादरस या अग्रहाराच्या घरी मादलांबिका या मातेच्या पोटी अक्षयतृतीयेच्या शुभ दिवशी एका दिव्य बालकाचा जन्म झाला. जे बालपापासून दिव्यत्वाची प्रचिती देत होते. वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा उपनयन संस्कार करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी या संस्कारास नकार दिला. त्यांनी धर्ममार्तंडांना आव्हान दिले. माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या बहिणीची मुंज पहिले करा अन् मग नंतर माझी मुंज करा. धर्मनेते, आप्तस्वकीय सगळ्यांनी महात्मा बसवेश्वरांची समजूत घातली. स्त्री क्षुद्र असते तिला हा संस्कार करता येत नाही. स्त्री जर क्षुद्र असेल तर तिच्या पोटी जन्मणारा क्षुद्रच असला पाहिजे ना? आई क्षुद्र मुलगा पवित्र ही गोष्ट मनाला पटत नाही. जोपर्यंत आपण याचे नीट उत्तर देणार नाही तोपर्यंत मी ही मुंज करणार नाही? मानवा-मानवात आई- मुलात, बहीण-भावात भेद करणारा तुमचा धर्म मी मानणार नाही. म्हटल्यानंतर तत्कालीन परंपरावादी सनातनी धर्ममार्तंडांना उत्तर देता आले नाही आणि त्यावेळी महात्मा बसवेश्वरांना या घरात, या परंपरावाद्यात राहून काही उपयोग नाही असे समजून आले आणि त्यांनी घर सोडले. त्यांनी एवढ्या छोट्या वयात स्त्री-पुरुष भेद, वर्ग-वर्ण भेद, जातीयता, धर्ममार्तंडांनी स्वत:च्या सोयीसाठी तयार केलेल्या परंपरा, कर्मकांड या गोष्टीतील खरे सत्य जाणले. म्हणून त्यांनी त्यावेळी माझ्या आत्म्याला जोपर्यंत एखादी गोष्ट पटत नाही, तोपर्यंत ती मी मान्य करणार नाही दृढनिश्चय केला.पुढे महात्मा बसवेश्वर जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांनी जी वर्ग-वर्ण विरहित राज्य निर्मितीची कल्पना मांडली. जातीयता निर्मूलन, स्त्री-पुरुष भेद नसलेली एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली. या व्यवस्थेमध्ये कुणीही एका नात्यांचे होऊ शकतात. क्षुद्र व अतिक्षुद्र वा स्वर्ण कुणीही एका नावाखाली एक व्हावे. केवळ एक माणूस म्हणून त्यांना पाहिले जावे यासाठी त्यांनी एका नव्या व्यवस्थेची निर्मिती केली. विश्वाच्या आकाराच्या इष्टलिंगाची कल्पना केली, ज्यात सर्व देव-देवतांचा, साºया विश्वातील तत्त्वांचा समावेश होता. विश्वाचे प्रतीक इष्टलिंग जो धारण करेल तो या नव्या व्यवस्थेत एका माळेचे, एका तत्त्वाचे, एका संस्काराचे असे एकरूप झाले. लिंग धारण करणारा लिंगायत, लिंगायत हा विविध जाती-पातीने, स्त्री-पुरुष समानतेचे एक क्रांतिकारी प्रतीक ठरला. जो लिंग धारण करतो तो लिंगायत अशा पद्धतीने एवढ्या सोप्या पद्धतीने लिंगायत धर्माची रचना सुरू झाली. लिंगायत धर्मात कुणालाही प्रवेश मिळू लागला. या मानवतावादी लिंगायत धर्माच्या सोप्या धर्म प्रवेश पद्धतीमुळे व त्यात असणाºया मानवतावादी तत्त्वामुळे देश-विदेशातून विविध-धर्मांचे हजारो, लाखो अनुयायी या लिंगायत धर्मात सहभागी झाले.हा त्या काळात सनातनी परंपरावाद्यांना महात्मा बसवेश्वरांनी दिलेला सगळ्यात मोठा हादरा होता आणि त्यामुळेच सनातनी चिडले. त्यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विरोधात रान उठवले. धर्म बाटल्याच्या, बाटवल्याच्या भावनांनी उग्र रूप धारण केले. अशाही प्रसंगी महात्मा बसवेश्वरांनी धर्म उपदेश करताना धर्माची व्याख्या सांगितली. १२ व्या शतकात अनुभव मंटप नावाची जगातील पहिली संसद निर्माण केली. विविध जाती धर्माच्या ७७० शरण-शरणींना या अनुभव मंटपाचे सदस्यत्व दिले. या काळी ७० महिलांना अनुभव मंटपात त्यांनी सहभागी करून घेतले. एवढेच नाही तर त्यांना मत मांडण्याचा व निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकारही दिला आहे ही फार मोठी क्रांतीच आहे. ब्राम्हण मंत्री मध्वरस यांची कन्या लावण्यवती व चांभार हरळय्या यांचा पुत्र शिलवंत यांचा आंतरजातीय विवाह लावला. हा विवाह लावून वर्ण भेदाने समाजात दुही निर्माण करणाºया धर्म व्यवस्थेला महात्मा बसवेश्वरांनी नवे मार्गदर्शन व नवे आव्हान दिले. जातीअंताची केवळ भाषाच त्यांनी केली नाही तर त्यांनी कृतीही केली. हा विवाह करून महात्मा बसवेश्वरांनी नव्या सामाजिक व्यवस्थेची रचना केली.महात्मा बसवेश्वरांनी अनेक वचनांची निर्मिती केली. त्यांनी सांगितलेले एक वचन माणसाला कसे जगावे व कसे रहावे याचे मार्गदर्शन करते. नको करू चोरी, नको करू हत्या, बोलू नको मिथ्या, रागावू नये, तिरस्कार करू नये हीच अंतरंग शुद्धी हीच बहिरंग शुद्धी, कुंडलसंगदेवाला प्रसन्न करण्याची हीच असे रीत असे ते म्हणतात. धर्माची कल्पना मांडताना महात्मा बसवेश्वर म्हणतात दयेविना धर्म काय कामाचा? दया असावी सकळ प्राणी मात्रा, दया हेच धर्माचे मूळ देवा, दयेविना धर्म न आवडे कुंडलसंगदेवा. स्वर्ग नरकाची कल्पना १२ व्या शतकात मांडली ती अशी, सदाचार हाच स्वर्ग, अनाचार हाच नरक. महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर प्रकाश टाकणाºया अशा हजारो गोष्टी आहेत. त्यांचे जीवन व विचार हे संपूर्ण मानव जातीला प्रेरणादायी आहेत. म्हणूनच महात्मा बसवेश्वर हे इतिहासातील पहिले समाजसुधारक ठरतात.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र