- एम. व्यंकय्या नायडू (उपराष्ट्रपती)पण संयुक्त प्रयत्नातून देशाला उन्नतीकडे नेऊ शकू, पण आपल्यात जर एकात्मतेचा अभाव असेल तर तो आपल्याला नव्या संकटात लोटेल’’ हे भविष्यदर्शी विचार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदर्शीपणाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे निदर्शक आहेत. आधुनिक भारताला एका सूत्रात बांधण्याचे काम त्यांनीच केले. स्वातंत्र्योत्तर संघर्षमय काळात सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीमुळेच देशाला पुढे नेण्याचे काम केले. देशातील ५६५ संस्थांना भारतीय गणराज्यात विलीन करून घेण्याचे जे काम त्यांनी केले ते आधुनिक काळात बेजोड समजले जाईल.लॉर्ड माऊन्टबॅटन यांनी सरदार पटेल यांच्या कर्तबगारीचे कौतुक करताना म्हटले होते. ‘‘सध्याच्या सरकारची महत्त्वाची कामगिरी ही सर्व संस्थानांना देशात विलीन करून घेणे हीच आहे. त्यात जर अपयश आले असते तर त्याचे भयानक परिणाम भोगावे लागले असते.संस्थानांबद्दल या सरकारने ज्या धोरणाची अंमलबजावणी केली त्यामुळे सध्याच्या सरकारच्या लौकिकात भरच पडली आहे.’’पटेल हे खऱ्या अर्थाने राजकारणी होते आणि राजकारणाची त्यांना जाण होती. ते वास्तववादी होते आणि त्यांचे पाय मातीत घट्ट रुजलेले होते. समृद्ध आणि सशक्त भारताची निर्मिती हेच त्यांचे उद्दिष्ट होते. इंग्रजांनी हा देश सोडून जाताना संस्थानिकांसमोर भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचे दोन पर्याय ठेवले होते, तसेच त्यांना स्वतंत्र राहण्याचा पर्यायही खुला होता. पण पटेलांचे शहाणपण, दूरदृष्टी, देशभक्ती त्यांच्यात असलेली क्षमता आणि देशाविषयीची बांधिलकी यामुळे त्यांना या जटिल राजकीय आणि सामाजिक प्रश्नातून मार्ग काढता आला. तो काढत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची बंडखोरी किंवा अशांतता निर्माण होऊ दिली नाही. पण हैदराबादच्या निजामाने जेव्हा स्वतंत्र राहण्याची किंवा पाकिस्तानात सामील होण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा मात्र त्यांनी बळाचा वापर करून आॅपरेशन पोलोच्या माध्यमातून हैदराबादचे संस्थान भारतात विलीन करून घेतले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद हे पाच दिवसांच्या कारवाईनंतर भारतात विलीन झाले.भारताचे राजकीय अस्तित्वच संकटात सापडले असताना देशाला सरदार पटेल यांच्यासारखी व्यक्ती लाभली. त्यांनी कमालीचा संयम योजकतेचा आणि कडव्या लोकशाहीवादाचा प्रत्यय आणून देत भविष्य न जाणू शकणाºया सम्राटाला वठणीवर आणले. त्या सम्राटाचा तो विषय युनोत नेऊन राष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा मानस होता, पण सरदार पटेलांनी तो हाणून पाडला. जुनागढ संस्थानचा जटिल विषयदेखील पटेलांनी हुशारीने हाताळला. जम्मू-काश्मीरचा प्रश्न हाताळण्यासाठी पटेल यांना मुक्त वाव मिळाला असता तर हाही प्रश्न खूप वर्षांपूर्वीच सुटला असता.देशातील संस्थानांच्या विलीनीकरणाचे वर्णन सरदार पटेल यांनी ‘रक्तहीन क्रांती’ असे केले होते. संस्थानिकांनी संस्थानातील सर्व अधिकारांचा त्याग करावा व त्यासाठी त्यांना नुकसानभरपाई दाखल घटना समितीने प्रिव्ही पर्स द्यावी, असे त्यांना वाटत होते. पटेल हे महात्मा गांधींचे सच्चे अनुयायी होते. त्यांचे अनेक वेळा महात्माजींशी मतभेदही व्हायचे. जम्मू-काश्मीरचा प्रश्न पं. नेहरू हाताळत असताना पटेलांनी नेहरूंच्या डोळ्यास डोळा भिडविणे टाळले. पण आपले हे मतभेद त्यांनी देशहिताच्या आड येऊ दिले नाहीत. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी त्यांनी नेहरूंच्या खांद्याला खांदा भिडवून काम केले.सरदार पटेल यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी होते. ते धडाडीचे राजकीय नेते होते. त्यांच्यापाशी संघटनकौशल्य होते. ते उत्तम प्रशासक होते. तसेच उत्कृष्ट मध्यस्थ होते. महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आल्यावर ते त्यांचे पट्टशिष्य बनले. खेडा आणि बार्डोली येथे त्यांनी ब्रिटिशांनी लागू केलेल्या अन्याय्य कराच्या विरोधात शेतकºयांना एकजूट केले. शेतकºयांच्या आंदोलनामुळे व पटेलांच्या ठाम भूमिकेमुळे सरकारला त्यांनी लागू केलेला कल मागे घेण्यास भाग पडले, म्हणून त्यांची ओळख पोलादी पुरुष अशी झाली. त्यांनी मुलकी सेनेचा वापर देशाची अखंडता अक्षुण्ण राखण्यासाठी केला. महात्मा गांधींवरील प्रगाढ श्रद्धेपायी त्यांच्या म्हणण्यावरून त्यांनी १९४६ साली काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नेहरूंच्या नावाचा पुरस्कार करण्यासाठी स्वत:ची उमेदवारी मागे घेतली होती.आज त्यांना मानवंदना देण्यासाठी नर्मदा सरोवराजवळ त्यांच्या १८२ फूट उंचीच्या एकात्मतेच्या पुतळ्याचे लोकार्पण होत आहे याचे मला समाधान आहे. देशाचे ऐक्य राखण्यासाठी आणि संस्थानांचे विलीनीकरण घडवून आणण्यासाठी त्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. आज त्यांची जयंतीदेखील आहे. त्या दिवशी त्यांचे गुण आत्मसात करण्याचा आणि नव्या समृद्ध भारताचे त्यांचे स्वप्न पूर्ण करून देशाला सुराज्याकडे नेण्याचा संकल्प करू या!
एकात्म भारताचे उद्गाते - सरदार पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 6:23 AM