कधीकाळी मुठा नदीकाठच्या रिसॉर्टवर रमणारे बारामतीचे धाकटे दादा सध्या बालाघाटच्या डोंगरावर ‘गोंधळ’ मांडण्यात तल्लीन जाहले. काय हा विचित्र चमत्कार घडला. अवघा महाराष्ट्र दचकून पाहत राहिला. हा नास्तिकाचा बागुलबुवा होता की अस्तिकाची करणी. कलियुगी उत्तर शोधण्यात प्रत्येकजण दंग जाहला. आम्ही पामरही डोंगरावर पोहोचलो. या गोंधळाचे साक्षीदार बनलो.आहाऽऽहाऽऽ गोंधळ-जागरणातील दादांचा आर्त ध्वनी काय म्हणुनी वर्णावा? किती म्हणुनी कर्णात साठवावा? त्यांच्या गळ्यातील कवड्याची माळ कशी लखलखत होती. जणू हिरे-माणकांसारखी. एकेक रत्न असावे एक हजार कोटींचे. सुमारे सत्तर तरी असावेत माळेत. साडेतीन वर्षांपासून सुन्या सुन्या पडलेल्या त्यांच्या गलितगात्र ललाटावर पुन्हा एकदा आत्मविश्वासाचा मळवट भरलेला. शिवाय धनंजय बीडकरांची डीमडी अन् सुनील रायगडकरांची घंटीही सोबतीला. ‘गोंधळ’कार दादांच्या गोड मुखातून अन् मधुर वाणीतून (?) सत्तेची आळवणी सुरू झालेली.गोंधळाला उभा गोंधळी सत्ता सुंदरीचा,लख्ख पडला प्रकाश दिवट्या सरकारचा,सत्तेविना आत्मा तडफडला..आता मात्र पुरता संयम तुटला..म्हणुनी आंदोलनाचा धुरळा उठला..दादांच्या हातातील संबळचा आवाजही घुमू लागला. गोंधळ अधिकच रंगू लागला.सिंहासनाची सवय तुटलीलाल बत्तीची चटक सुटलीछातीत कशी कळ लचकली, खुर्ची गं..खटल्याची उगी भीती घातलीम्हणुनी बंडाची उर्मी दाबून ठेवलीआता मात्र मती सटकली, खुर्ची गं...एकनाथ भाऊंची साथ मिळालीबापटांचीही भविष्यवाणी लाभलीजणू परिस्थिती पालटली, खुर्ची गं...पोपटपंचीला जनता विटलीबिनदुधाची चहाची किटलीतेव्हा आनंदाची उकळी फुटली, खुर्ची गं..गेल्या साडेतीन वर्षांतील भळभळत्या जखमांच्या वेदनांची आर्त कहाणी दादांच्या तोंडून प्रसवू पाहत होती. गोंधळाची जागरण कहाणी पुढं-पुढं सरकत होती. सोबतीला लाडक्या तार्इंचं तुणंतुणं होतंच.गोंंधळाला यावं, सर्वांनी गोंधळाला यावंउस्मानाबादच्या सिंहांनी यावंवळसे घालत पाटलांनीही जमावंकºहाडच्या बाबांनी बघतच रहावंमातोश्रीच्या पिता-पुत्रांनी लक्षात ठेवावंगोंधळाला यावं, सर्वांनी गोंधळाला यावंफेसबुकवाल्या राजनी मोबाईलवर बघावंसाताºयाच्या राजेंना बाजूला सारावंफलटणच्या रामानंही माझ्यासोबत रहावंआमच्या काकांनी मात्र लांबूनच बघावंगोंधळाला यावं, सर्वांनी गोंधळाला यावंहा गोंधळ ऐन भरात आला असतानाच कुणीतरी कानात येऊन सांगितलं, ‘सिंचन अधिकाºयांवर केस ठोकण्याची मोहीम जोरात सुरू झालीय,’ मग काय, क्षणार्धात अवघं वातावरण पालटलं. जागरण-गोंधळ संपवून घाईगडबडीनं ‘लंगर’ तोडण्याची धडपड सुरू झाली. लंगर म्हणजे हातातील लोखंडी साखळी हो. साखळीची कडी तुटली तर म्हणे कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. मंडळीऽऽ आलं का लक्षात ? गोंधळ मांडिला हो.. कडी तोडण्याचा गोंधळ मांडिलाऽऽऽ- सचिन जवळकोटे
सत्तेविना जागरण; दादांचा गोंधळ
By सचिन जवळकोटे | Published: January 18, 2018 3:20 AM