शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

अंथरूण पाहून.?

By admin | Published: September 30, 2014 12:07 AM

आपल्या समाजाची व्यवच्छेदक लक्षणं कोणती, असा सवाल केल्यास त्याचं पटकन उत्तरं देता येतील, ह्यचलता है ही मानसिकता आणि अल्पसंतुष्ट वृत्ती.

डॉ. बाळ फोंडके
पत्रकार व विज्ञान लेखक
आपल्या समाजाची व्यवच्छेदक लक्षणं कोणती, असा सवाल केल्यास त्याचं पटकन उत्तरं देता येतील, ह्यचलता है ही मानसिकता आणि अल्पसंतुष्ट वृत्ती. अंथरूण पाहून पाय पसरावेत हेच आपलं धोरण असावं, असं लहानपणापासून प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं जातं. अंथरूण तोकडं पडत असेल, तर ते मोठं करण्याची, आपले पाय झाकले जातील इतकं लांब-रुंद करण्याची धडपड का करायची नाही, असा प्रश्न विचारण्यालाही मुभा दिली जात नाही. कोणी धीटपणो असं विचारलंच, तर जास्त शहाणपणा करू नकोस; सांगतो ते मुकाटय़ानं ऐक, असा दमही दिला जातो. त्यामुळेच आपल्यात एकंदरीत विजिगीषू वृत्तीचा अभाव आढळतो. 
हे सर्वच क्षेत्रंत दिसून येतं. आपल्या शाळेत पहिला आला, बस्स बाजी मारली. त्यापुढे जाऊन जिल्ह्यात, राज्यात, देशात अव्वल येण्याची आकांक्षाही बाळगली जात नाही. मग, जगात आघाडीवर राहावं, ही इच्छा मनात कुठून पैदा होणार! आणि तशी झालीच तर जे सर्वागसुंदर आहे, परिपूर्ण आहे, असं काही करण्याच्या आड तीच आहे. त्यात चालवून घेण्याचं धोरण आड येतं. 
पण, यालाही काही जण अपवाद ठरतात. ते ही धोरणं मान्य करीत नाहीत. एक्सलन्सची कास धरतात. सर्वस्व झोकून एखादी गोष्ट साध्य करण्याचा प्रय} करतात. इतर कोणीच आजवर ते केलेलं नाही, ही त्यांना अडचण वाटत नाही. उलट ते आव्हान ठरतं. त्याचाच ध्यास ते घेतात. 
असाच ध्यास आपल्या अंतरिक्ष वैज्ञानिकांनी घेतलेला आहे. म्हणून तर आजवर अमेरिका, रशिया, युरोपीय समुदाय, जपान, चीन यासारख्या बलाढय़ आणि तंत्रज्ञानसमृद्ध देशांना जे साध्य झालं नाही, ते त्यांनी करून दाखवलं. आपल्या पहिल्याच प्रय}ात त्यांनी श्रीहरिकोटय़ाहून धाडलेलं मंगळयान यशस्वीरीत्या मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केलं आहे. ते करताना त्यांनी अनेक कसोटय़ा पार पाडल्या; पण त्यातल्या त्यात अखेरची कसोटी श्वास रोखून 
धरायला लावणारी होती. त्यांच्या कौशल्याची कठोर परीक्षा पाहणारी होती. कारण, दर सेकंदाला 11.4 किलोमीटर अशा वेगानं धरतीची नाळ तोडत निघालेल्या मंगळयानानं आपला मंगळार्पयतचा प्रवास सेकंदाला 22 किलोमीटर एवढय़ा वेगानं केला होता; परंतु मंगळाच्या जवळ पोहोचेर्पयत त्यानं तो घटवून सेकंदाला 5.1 किलोमीटर एवढा कमी केला होता. परंतु, मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येत त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी तो सेकंदाला 4.3 किलोमीटर एवढा कमी करणं आवश्यक होतं. ते साध्य करण्यासाठी त्याला गती देणा:या इंजिनाला आता उलटय़ा दिशेनं ज्वलन करावं लागणार होतं. त्यात त्याला मदत करण्यासाठी यानावर लिक्विड अॅपॉजी मोटर ही यंत्रणा सज्ज होती. तब्बल 3क्क् दिवसांच्या निद्रेतून तिला जागं करण्यातही यश मिळालं होतं. आता खोटी होती ती त्या यंत्रणोच्या निकराच्या करामतीची. कारण वेगातली ती घट अंमळ जास्ती झाली असती, तर यान मंगळाच्या पृष्ठभागावर जाऊन आदळलं असतं आणि ती घट अंमळ कमी झाली असती, तर यान मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचं क्षेत्र ओलांडून तसंच पुढं कुठे तरी भरकटत गेलं असतं. अगदी हवी तेवढीच घट अत्यंत अचूकपणो घडवून आणण्याची कामगिरी त्या यंत्रणोला आता करायची होती. पण, ती तिनं निर्वेध पार पाडली आणि भारतानं इतिहास घडविला. 
असा पराक्रम करणारा पहिला देश, इतकं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान संपूर्णपणो स्वबळावर साधणारा पहिला देश, संपूर्ण यानाची आणि त्याला अवकाशात ङोप घेण्यासाठी मदत करणा:या अग्निबाणाचीही बांधणी स्वदेशी सुटय़ा भागांना जोडूनच करणारा पहिला देश आणि हे सारं कमीत कमी खर्चात अतिशय किफायतशीर करणारा पहिला देश हा मान भारतानं मिळवला आहे. आपल्या अंतराळवैज्ञानिकांच्या कौशल्याची आणि निष्ठेची ती देणगी आहे. 
मंगळयानानं मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या आधी दोनच दिवस अमेरिकेचंही मेव्हन हे यान तिथं पोहोचलं होतं. पण त्यांचे पहिले तीन-चार प्रय} विफल गेले होते. मेव्हनची बांधणी करण्यासाठीही अमेरिकेला 3 र्वष लागली होती. आपण ती कामगिरी 15 महिन्यांमध्येच पार पाडली आणि तीही अमेरिकेच्या एकदशांश खर्चात. एकूण खर्च किती तर फक्त 45क् कोटी रुपये. मंगळयानाचा एकूण प्रवास 65 कोटी किलोमीटर झाला. म्हणजे दर किलोमीटरमागे केवळ 7 रुपये खर्च आला. गावातल्या गावात रिक्षाचा प्रवासही याहून महाग असतो. 
 आपल्या गरीब देशाला ही अंतराळसंशोधनाची चैन परवडणारी नाही, असं एक तुणतुणं बरेच जण वाजवत असतात. त्यालाही या संशोधकांनी चोख उत्तर दिलं आहे. कारण, या मंगळयानाच्या सफरीसाठी दरडोई 4 रुपयांहूनही, म्हणजेच एका कटिंग चहापेक्षाही कमी खर्च आला आहे. 
हे साध्य झालं, कारण या वैज्ञानिकांनी अंथरूण लांब-रुंद करण्याचा मार्ग पत्करला. ते पाहून आपले हातपाय आखडून घेतले नाहीत. हीच वृत्ती सर्वानीच आणि सर्वच क्षेत्रंमध्ये दाखवली, तर मग आपली भूमी सुजलाम्-सुफलाम् व्हायला वेळ लागणार नाही.