शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

चमकोगिरीमुळे आंदोलने भरकटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 12:44 PM

मिलिंद कुलकर्णी आंदोलन हा शब्दच मुळी मानवी भावभावना प्रकट करणारा आहे. या आयुधाचा वापर प्रत्येक देशात होत असतो. ...

मिलिंद कुलकर्णी आंदोलन हा शब्दच मुळी मानवी भावभावना प्रकट करणारा आहे. या आयुधाचा वापर प्रत्येक देशात होत असतो. स्वातंत्र्यचळवळीत त्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. आपल्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराविषयी आवाज उठविणे, प्रतिकार करण्याचे आंदोलन हे माध्यम आहे. महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, नेल्सन मंडेला यांनी या आयुधाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करुन दिले. आंदोलनांचे देखील प्रकार आहेत. गांधीजींनी त्या आयुधाचा समर्पकपणे वापर केला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग अशा आंदोलनातून त्यांनी ब्रिटिश सरकारविरुध्दचा रोष जसा प्रकट केला तशीच अन्याय, अत्याचाराविषयी जनभावना तयार होईल, हेदेखील आवर्जून बघितले. आंदोलन हिंसक होऊ लागले तर गांधीजींनी ते मागेदेखील घेतल्याची उदाहरणे आहेत. वृक्षांना वाचविण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन असो की, अलीकडे अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुध्द केलेले आंदोलन असो, त्यात जनसहभाग महत्त्वाचा ठरला. आंदोलनाचे कारण हे खूप महत्त्वाचे असते. गांधीजींनी स्वातंत्र्यचळवळीविषयी जागृती निर्माण करीत असताना विदेशी कपड्यांची होळी, मिठाचे आंदोलन असे मुद्दे घेऊन जनतेच्या मनात स्फुल्लींग पेटविले. नेल्सन मंडेला यांनी वांशिक विद्वेषाविरुध्द आंदोलन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेविरुध्द आंदोलन करताना चवदार तळे, काळाराम मंदिराच्या प्रसंगात जनसामान्यांमधील असंतोष, अन्यायाच्या भावनेचे प्रकटीकरण केले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी सानेगुरुजींनी आंदोलन केले. आंदोलनाचे विषय संवेदनशील, जनतेच्यादृष्टीने महत्त्वाचे असले तर त्याला जनसमर्थन मिळाल्याशिवाय राहत नाही. आंदोलनाची नेमकी वेळ, काळ निवडणे जसे महत्त्वाचे असते तसे ते थांबविणे, मागे घेण्याची वेळदेखील महत्त्वाची असते. वेगवेगळे विषय घेऊन सरकारला धारेवर धरणाºया अण्णा हजारे यांच्या धरसोडीच्या भूमिकेवर टीका झाली होती. टोल नाक्याविरोधात आंदोलन अर्धवट सोडल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर झाली होती. त्यामुळे आंदोलनाची अखेरदेखील महत्त्वाची असते. स्वातंत्र्योत्तर काळात संघटनकौशल्य असलेल्या संघटना, पक्षांनी केलेली आंदोलने गाजली. महाराष्टÑाचा विचार केला तर मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या आंदोलनामुळे विस्थापित आदिवासींना घरे, जमिनी मिळाल्या. सरदार सरोवर धरण रोखले गेले नाही, पण आदिवासींसाठी त्या अद्याप झगडत आहेत. शरद जोशी यांचे शेतकरी आंदोलन ऐतिहासिक ठरले. कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष या सारख्या संघटनावर भर देणाºया पक्षांमध्ये आंदोलनाचे सातत्य आणि चिकाटी वाखाणण्यासारखी आहे. देशव्यापी आंदोलन प्रत्येक जिल्हाठिकाणी होणारच, भले चार कार्यकर्ते का असेना, पण आंदोलन होणारच. अलिकडे मात्र आंदोलनांमध्ये चमकोगिरीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विषय बाजूला पडून नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा प्रभावी ठरत आहे. त्यातून आंदोलनाविषयी तारतम्याचे भान राहत नाही. भाजपचे अलिकडचे दूधविषयक आंदोलन टीकेचा विषय ठरले. दूध व दुधाची भुकटी याला सरकारने अनुदान द्यावे, यामागणीसाठी हे आंदोलन होते. नंदुरबारात एकही शासकीय डेअरी नाही. त्यामुळे तेथे सरकारकडून दूध विकत घेण्याचा आणि मागणीप्रमाणे अनुदानाचा विषय उद्भवत नाही. तरीही तेथे आंदोलन झाले. जळगावात जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी जिल्हा दूध संघासमोर आंदोलन केले. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असलेल्या या संघाचे संचालकपद भोळे यांच्याकडे आहे. मागणी सरकारशी संबंधित असताना दूध संघासमोर आंदोलनाचे प्रयोजन कळले नाही. माध्यमात आंदोलनस्थळ चर्चेचा विषय ठरले. कळसाध्याय ठरला तो चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याने दूध आंदोलन मागे पडून चव्हाणांविरोधात प्रतिआंदोलन सुरु झाले. मोबाईल, कॅमेरा समोर असल्यावर भल्याभल्यांची जीभ, वर्तन घसरताना सगळ्यांनी पाहिलेले आहे. अशा वर्तनाने ते टीकेचे धनी ठरले आहेत. एवढे भान बाळगले तरी आंदोलनाचा मूळ हेतू साधला जाईल.
टॅग्स :Jalgaonजळगाव