शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

वादळी ट्रम्प युगाच्या अस्तित्वाची भयसूचक चाहूल

By admin | Published: January 18, 2017 12:47 AM

आजपासून दोन दिवसांनी अमेरिकेमध्ये सत्तांतर होईल आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या अधिकारपदाची सूत्रे हाती घेतील.

आजपासून दोन दिवसांनी अमेरिकेमध्ये सत्तांतर होईल आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या अधिकारपदाची सूत्रे हाती घेतील. आपल्या अध्यक्षपदाची सुरुवात करताना ट्रम्प यांना अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात नीचांकी स्वीकृतीनिर्देश मिळतो आहे, अशी माहिती एरिक ब्रॅडनर यांनी त्यांच्या ‘सीएनएन’मधल्या लेखात दिली आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांची धोरणे आाण योजना पुरेशा स्पष्ट आहेत असे केवळ ४१ टक्के जनता मानते आहे आणि ५५ टक्के लोकांनी, त्यांनी मांडलेल्या कार्यांना विरोध दर्शविला आहे. ओबामांनी २००८ साली आपल्या दुसऱ्या कारकिर्दीला सुरुवात केली, त्यावेळी हेच प्रमाण ओबामांच्या बाजूने ७२ टक्के होते तर १९९३ साली बिल क्लिंटन यांच्यावेळी ६२ टक्के व १९८९ साली बुश यांच्यावेळी ६५ टक्के लोकांनी त्या त्या वेळच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांच्या बाजूने मतप्रदर्शन केले होते. म्हणजेच अधिकारावर येत असताना जनतेच्या शंका आणि मोठ्या प्रमाणावर विरोधी भावना यांनी ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्षपदावर स्वागत होते आहे. ट्रम्प यांच्या विरोधातली आपली भूमिका सीएनएनने लपवलेली नाही. त्यातच मागच्या आठवड्यातल्या पत्रकार परिषदेच्यावेळी ट्रम्प यांनी सीएनएनच्या प्रतिनिधीना सर्वांसमक्ष सुनावले होते. त्यामुळे आता पुढच्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. फ्रिडा घिटीस यांचा एक लेख सीएनएनवर वाचायला मिळतो. ट्रम्प अमेरिकेची मानसिक दिशाभूल करीत आहेत आणि संतुलित विचारांची आणि विचारवंतांची टवाळी करण्याची त्यांना सवय आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे. निवडणुकीच्या काळात रशियाने अमेरिकन मतदारांची मानसिक दिशाभूल करण्यासाठी कारवाया केल्या होत्या आणि त्यामुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाला. यातूनच पुढच्या काळात अमेरिकन जनता आणि पत्रकारितेसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.सीएनएनवरच निक रॉबर्टसन यांचा लेखदेखील आहे. ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचा जो आराखडा त्यांच्याकडून मांडला गेला आहे, त्यात अनेक समस्या दिसत आहेत. रॉबर्टसन यांनी त्या समस्यांचा आढावा घेतला आहे. ‘न्यूयॉर्क टाईम्स’मधल्या लेखांमध्ये देखील असाच सूर आढळतो. ट्रम्प युग अवतरते आहे, पण जग अनिश्चिततेने भरून गेलेले आहे, अशा आशयाचा स्टीवन इर्लान्जर यांचा लेख त्यात वाचायला मिळतो. जर्मन्स चिडलेले आहेत, चीन कमालीचा संतापलेला आहे तर नाटोचे नेते चिंतेने ग्रासलेले आहेत आणि युरोपियन युनियनमधल्या नेत्यांना धोक्याचे इशारे मिळाल्यासारखे वाटते आहे, अशा शब्दात त्यांनी ट्रम्प युगाच्या आरंभकाळाचे वर्णन केले आहे. ट्रम्प यांच्याबद्दल कोणताही अंदाज करता येत नाही, हीच खरे तर सर्वात नक्की असणारी गोष्ट आहे असे ते म्हणतात.सीएनएन आणि वॉशिंग्टन पोस्टसारख्या मातब्बर माध्यमांशी पंगा घेत असतनाच ट्रम्प यांनी जर्मन वृत्तपत्र ‘बिल्ड’ आणि लंडनचा ‘टाईम्स’ यांना एक संयुक्त मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीचे तीव्र पडसाद उमटले आहेत असे दिसते. युरोपियन युनियन आणि जर्मन चॅन्सेलर अँजेला मार्केल यांच्यावर सिरीयन निर्वासितांना त्यांनी दिलेल्या आश्रयावरून ट्रम्प यांनी केलेली तीव्र टीका आणि त्यांची मते ऐकून युरोपातले नेते अस्वस्थ झाले आहेत. ट्रम्प यांची तातडीने भेट घेण्याचा आपला इरादा मार्केल यांनी व्यक्त केला आहे. ‘द टाईम्स’मध्ये याबद्दलचा सविस्तर वृत्तांत वाचायला मिळतो. मुळातली जर्मन कंपनी असणाऱ्या बीएमडब्ल्यूच्या मेक्सिकोतल्या उत्पादनांवर निर्बंध आणण्याचा ट्रम्प यांचा इरादाही जर्मनीला फारसा पसंत पडलेला नाही. नाटो करार हा आता कालबाह्य झालेला असून त्याचे पुनरावलोकन करण्याचा आपला इरादा तसेच थेट रशियाबरोबरच अण्विक करारासह इतर अनेक प्रकारचे सहकार्य प्रस्थापित करण्याच्या आपल्या इराद्यामुळे ट्रम्प यांनी पश्चिम युरोपातल्या आजवरच्या प्रचलित वैचारिक मांडणीला धक्का दिला आहे. त्यामुळे जर्मनीसारख्या युरोपचे पुढारपण करणाऱ्या देशात त्यांच्या आगमनाचे पडसाद उमटणे साहजिक आहे. युरोपमधल्या राष्ट्रांना आपल्यामधल्या संबंधांना अधिक पक्के करावे लागतील हे सांगताना युरोपचे भविष्य आपल्या स्वत:च्याच हाती आहे असे मार्केल यांनी सांगितले आहे. तर फ्रान्सच्या होलांदे यांनी कुणा बाहेरच्याने युरोपला सल्ला देण्याची आवश्यकता नाही, असे सुनावले असल्याचे टाईम्समधल्या वृत्तामधून वाचायला मिळते. ट्रम्पयुगात अमेरिका आणि युरोप यांच्यामधल्या आजवरच्या संबंधांचे पुनर्लेखन होण्याची शक्यता युरोपातले नेते नाकारत नाहीत. अर्थातच यामुळे एक कमालीचे अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हॉन मार्कुस बेकर या जर्मन पत्रकाराचा लेख ‘स्पेगल’ या ब्लॉगवर वाचायला मिळतो. केवळ रशिया किंवा अण्वस्त्रे यांच्यापुरताच नाही तर ऐक्य एकूणच युरोपाबद्दलचा ट्रम्प यांचा दृष्टीकोन एकांगी आणि चुकीच्या गृहीतकांवर आधारलेला आहे, असे अनेक उदाहरणांच्या आधारे सांगत ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे युरोपमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे सावट निर्माण झाले आहे असे दिसते. यातला लक्षणीय भाग म्हणजे युरोपातले उजव्या किंवा अतीउजव्या विचारांच्या नेत्यांना ट्रम्प यांच्या या भूमिकेचे आकर्षण वाटते आहे. इंग्लंडमधले निगेल फराज यांना ट्रम्प नुसते भेटलेच नाही तर इंग्लंडने त्यांना अमेरिकेतले आपले राजदूत म्हणून नेमावे अशी अनावश्यक सूचनादेखील त्यांनी केली होती. आतासुद्धा जर्मनीमधल्या अतीउजव्या गटाचे नेते फ्राउ पेट्री आणि जॉर्ज पाझ्देर्स्की यांनी ट्रम्प यांना अभिनंदनाचे संदेश त्वरेने पाठवले आहेत, हेदेखील ‘द लोकल’ या बिल्डच्या इंग्रजी आवृत्तीत वाचायला मिळते. पुढच्या काळात जर्मनीसह युरोपातल्या अनेक देशांमध्ये निवडणुका आहेत हे लक्षात घेता उजव्या विचारांच्या नेत्यांना ट्रम्प यांच्याबद्दलच्या वाटणाऱ्या आस्थेचा अर्थ समजू शकतो. या पूर्वीच्या गृहीतकांना धक्का देणारा आणखी एक विषय ट्रम्प यांनी अंगावर घेतला आहे, तो चीनबद्दलचा. तैवानचे अस्तित्व नाकारत एक चीन धोरण आजवर मान्य केले जात होते. त्याला छेद देत तैवानबद्दलची सहानुभूतीची भाषा वापरणारी ट्रम्प यांची वक्तव्ये चीनला पसंत पडणारी नाहीत. तैवानच्या नेत्या त्साई नुकत्याच मध्य अमेरिकेतल्या काही देशांमध्ये जाऊन आल्या. त्या प्रवासात त्या ट्रम्प यांना भेटणार असे बोलले जात होते. पण ही भेट झाली नाही. पण ट्रम्प यांच्या चीनबद्दलच्या वक्तव्याचा चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ या अधिकृत सरकारी वृत्तपत्रात चांगलाच समाचार घेतला आहे. अमेरिकेने एक-चीन धोरणाला स्वीकृती देऊन चीनवर कोणतेही उपकार केलेले नाहीत. आजवरच्या अमेरिकन अध्यक्षांनी मान्य केलेली ती गोष्ट आहे. त्या धोरणात बदल झाला तर चीन त्याचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही आणि चीन आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांवर त्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतो असा स्पष्ट इशारा त्यात दिला आहे. या विषयावर हेंग या व्यंगचित्रकारांचे एक व्यंगचित्र ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये प्रकाशित झाले असून ते अतिशय बोलके आहे. एकूणातच ट्रम्पयुगाचा प्रारंभ वादळी ठरणार असे दिसते आहे.-प्रा. दिलीप फडके(ज्येष्ठ विश्लेषक)