- उमेश शर्मा (चार्टर्ड अकाउण्टण्ट) कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जीएसटी पोर्टलवर जीएसटीआर-०१ किंवा IFF चे सुधारित व्हर्जन उपलब्ध करून दिले गेले आहे.अर्जुन : यात कोणती नवीन कार्यप्रणाली आली आहे? कृष्ण : १) सुधारित जीएसटीआर-०१ डॅशबोर्ड : रेकॉर्डचा तपशील टाकणे आणि रेकॉर्डच्या तपशिलात सुधारणा करणे, असे दोन स्वतंत्र भाग आहेत. नवीन तपशील जोडण्यासाठीचे सर्व टेबल्स ‘रेकॉर्ड तपशील टाका’ या विभागात उपलब्ध असतील. २) बी२बी आणि क्रेडिट नोट (CDNR) टेबलमध्ये सुधारणा : रेकॉर्ड तपशील टेबलमध्ये खालील कॉलम असतील.करदात्याचा प्रकार प्रलंबित/चुकीचे इन्व्हॉइसेस इन्व्हॉइसेस ॲड करणे.शोधणे : डॉक्युमेंट डिटेलच्या पानांमध्ये सामान्य शोधप्रणाली जोडली गेली आहे. याचा वापर करून करदाते आता विशिष्ट GSTIN शी संबंधित विशिष्ट रेकॉर्ड शोधू शकतात.रेकॉर्ड प्रति पेज : ‘रेकॉर्ड तपशील टाका’ या विभागांतर्गत सर्व सारण्यांमध्ये रेकॉर्ड पानांनुसार दाखवील. हे वैशिष्ट, करदात्यांना प्रत्येक पानावर पाहण्यासाठी रेकॉर्डची संख्या कस्टमाइज करण्यास अनुमती देईल.अर्जुन : जीएसटीआर-०१ साठी नव्याने सादर केलेले रंग कोडिंग काय आहेत? कृष्ण : प्रत्येक टेबलसाठी दस्तऐवजाची संख्या रंग कोडिंगसह अधिक माहितीपूर्ण बनविली गेली आहे.१) कोणतेही रेकॉर्ड चुकल्यास, टेबल लाल रंगात हायलाइट केले जाईल. २) रेकॉर्ड अर्धवट असल्यास टेबल निळ्या रंगात हायलाइट केले जाईल. ३) रेकॉर्ड सेव्ह झाले असल्यास टेबल हिरव्या रंगात हायलाइट केले जाईल.अर्जुन : याचा करदात्यांवर काय परिणाम होईल? कृष्ण : एक नवीन प्रणाली करदात्याने नवीन रेकॉर्ड जोडला आहे की नाही ते तपासून घेईल. नवीन रेकॉर्ड जोडला गेल्यास, नवीन सारांश तयार होईपर्यंत ‘सबमीट’ करा आणि “प्रिव्ह्यू” बटण अक्षम राहतील. ही चेकप्रणाली सुनिश्चित करील की जीएसटीआर-०१ किंवा IFF अचूक दाखल केला जाईल. पूर्वी टेबलच्या बाहेरून इन्व्हॉइसेसची एकूण रक्कम दिसत होती; परंतु आता फक्त इन्व्हॉइसची संख्या दिसेल आणि जीएसटीआर-०१चे प्रिव्ह्यू डाऊनलोड केल्यानंतरच एकूण रक्कम तपासली जाऊ शकते.
जीएसटीआर-०१ (IFF) मध्ये महत्त्वाचे बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 5:26 AM