- विजय दर्डा
एक विचित्र ध्वनीमाझ्या कानांवर आदळतो आहेहा ध्वनी नेहमीचा नाहीनाही ओळखी-पाळखीचा पण काही अधिक गतीनेहा ध्वनी दणाणत धावतो आहे..नंतर कळलं की हा सायरनचा आवाज आहे!परंतु नेहमीसारखा नाहीउरावर मृत्यू धावून यावातशासारखे काही!
रात्रंदिवस हाच आवाजमाझ्या कानांवर आदळतो आहे.याच आवाजांमधून काहीविचलित करणारे आवाज टाहो आणि तडफडाटांनी भरलेले आहेतते धडाधड दारे ठोठावीत आहेत.हे कसले आवाज ते मला माहीत नाही.आणि माझी - त्यांची ओळखही नाही.मग मी असा अस्वस्थ का?ही ॲम्ब्युलन्स कुठेतरी पोहोचल्यावर थांबून का राहत नाही?फक्त भटक्यांसारखी का भटकत आहे?वाटतंय की ती काही शोधते आहे..
कुठे विनवणी सुरू आहेकुणीतरी त्यांचे त्यांनाजवळ करतील म्हणून!परंतु अशी जवळीकदाखवणारे कोणी नाहीतखरंच कुणी आधार देतीलगळाभेट घेतील?पण असे गळेदेखील आता कुठे नाहीत.. निष्प्राण डोळे, अडखळते बोलथरथरणारे हात आणि नजरेपुढे राख !आधीपेक्षा आता तर कितीतरी अनोळखी टाहोमाझ्या चाैफेर धावताहेत.. लाचार बिचारामाझा लोकप्रतिनिधीतोही फक्त स्तब्ध आहेतो इकडे-तिकडे पाहतो आहे..काळस्थितीवरून आपली नजरअन्यत्र लपवतो आहे..काय करावे हे त्याचे त्यालाहीकळेनासे झाले आहे.. कुणापाशी ते दोन हात आहेत?ज्या कुणापाशी ते असतीलते आपलेपणाने उराशी का लावत नाहीत?वेळ मिळाला होता बाका मग का नाही साधला मोका?काय ते जगणे काय ते मरणेसारे चित्र जसेच्या तसेच !
सर्वत्र भीतीचे वातावरणत्यातही दिसतो एक आशेचा किरण!तो आहे डॉक्टर.. सूर्यकिरण साक्षात!आणि त्याच्यासोबत राबणारेसोबतीही प्रत्यक्षात!आम्हीही आहोत त्यांचे सारथीतरीही गात नाही त्यांच्याअथक सेवेची आरती.. उपदेशांची नक्षी काढणाऱ्यांनो, निष्ठा राखा, समर्पण शिका.. फार केल्यात अकारण बाताभाऊ, चला निघा आणि झोपा आता !उरलाय फक्त स्वप्नांचा आसराखोट्या स्वप्नांमध्ये स्वत:ला विसरामाझा आवाज त्यांच्यापर्यंतका पोहोचत नाही?परंतु त्यांच्या दबलेल्या स्वरातील आवाज माझ्यापर्यंत पोहोचत आहेत!तरीही ते असहाय आणि हतबल!
त्यांच्याकडील अस्त्रे-शस्त्रेनिष्प्राण भासताहेत, नि:शस्त्र हातही बांधले आहेत,ना श्वसनाला ऑक्सिजन,ना घाव भरायला इंजेक्शन, ना औषधे पुसतात हालतिकडे मात्र फॅक्टऱ्या लबालब आणि मालामाल..!तर इकडे परिसीमा गाठत आहेतू-तू - मी-मी चा पाऊस इरसाल! तरीही मी शांत आहेकुठलाही आक्रोश न करता.. आज नाही तर उद्याच्याआशेवर जगतो आहे !इतिहासाने सत्यच सांगितलेय की वाईट असते निराशासर्वांत सुंदर फक्तआशा आणि आशाच !!हे कसले दृश्य आहे..?रुग्णांचे दु:ख बघूनरडत असलेलापरिस्थितीपुढे हतबल झालेलाडॉक्टर, या आधीमी कधी पाहिला नाही.आज तोही उदास आणिपाहा कसा चिंताग्रस्त आहे.. त्यालाही कुठे हे भावत आहे?
इथे तर चौफेरभय आणि भयाचेच सावट आहे.हिमालयातून वाहणारी गंगाआता अपवित्र झाली आहे.. मात्र लाखोंनी तिच्यात डुबकीमारून स्वत:स पवित्र केले आहे.सर्वत्र जिंदाबादचे निर्भय नारे लागताहेत कुठल्यातरी कोपऱ्यातून बंद कानांवर अजानचा आवाज येतो आहे,आरतीच्या प्रकाशातलुभानचा सुगंध मिसळतो आहेअडवू नका, मिसळू द्या यांना परस्परात कुणीही त्यांना थांबवू नका !!
होळीपेक्षाही जोरात तेजाळत आहेप्रेतांची भूमी अशी काहीअपरिचित प्रवाशाला बघून आज तिलाही रडू आवरलेले नाही !!
होळी म्हणाली, ‘‘अकाली येणाऱ्या पाहुण्यांचीकशी ठेवावी बडदास्तचला अजून कुठले गाव शोधूतिथेही चेतवायची आहे होळी बघा खास’’
हरेक स्थळी एकसारखे दृश्य आहे..कुठे आपली माणसंआपणापासून गमावल्याचं दु:ख, तर कुठे दूर दडून राहणाऱ्यामाणसा-माणसाचे दु:ख.. कशी दुरावत चाललीयमाणसा-माणसातली माया,सर्वत्र दु:ख आणि दु:खाचीच छाया..
अशातच कुठे मला, कुठे तुलाआशांचे दीप चेतवायचे आहेत..काळ बदलायला हवानाहीतर याला बदलवायला हवे !
मला ठाऊक आहेइथे प्रत्येकजण आहे ‘मजबूर’ परंतु काही ‘मजबूत’ पण आहेत!तेच आता माझा आशेचा प्रकाश,आणि जगण्याचा विश्वास आहेत...
अनुवाद - सुधाकर गायधनी 'देवदूत'कार
(लेखक लोकमत समुहाचे चेअरमन आहेत)