शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

क्षमा वीरस्य भूषणम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 1:03 AM

विस्कानसीन विद्यापीठ, अमेरिका येथे झालेल्या अभ्यासाअंती असे आढळून आले की जे लोक क्षमाशील असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही क्षमा न करण्याºया लोकांपेक्षा जास्त असते व त्यांना कमी प्रमाणात आजार होतात. असे म्हणतात की तीन महिन्यापर्यंत दु:ख धरून ठेवल्यास आजाराची सुरुवात होते व सहा महिन्यापर्यंत दु:ख विसरलो नाही तर त्याचे आजारात रूपांतर होते.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारविस्कानसीन विद्यापीठ, अमेरिका येथे झालेल्या अभ्यासाअंती असे आढळून आले की जे लोक क्षमाशील असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही क्षमा न करण्याºया लोकांपेक्षा जास्त असते व त्यांना कमी प्रमाणात आजार होतात. असे म्हणतात की तीन महिन्यापर्यंत दु:ख धरून ठेवल्यास आजाराची सुरुवात होते व सहा महिन्यापर्यंत दु:ख विसरलो नाही तर त्याचे आजारात रूपांतर होते.जेव्हा आपण दु:ख पकडून ठेवतो तेव्हा ते आतल्या आत वाढत जाते व मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती निर्माण करते. त्याचे पर्यवसान क्रोध, इर्षा, मत्सर, द्वेष अशा दुर्गुणांमध्ये होते व त्यामुळे आपली मानसिक स्थिती खालावते. सुडाची भावना आपल्याच शरीरावर दुष्परिणाम करते. क्षमा करण्याºया लोकांना क्रोध कमी प्रमाणात येतो व अपमानाचा अनिष्ट प्रभावसुद्धा कमी प्रमाणात प्रकृतीवर पडतो तसेच क्षमा करणारे लोक प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी असतात. जेव्हा आपण मनात कसलीच जळमटं ठेवत नाही व मोठ्या मनाने दुसºयाला क्षमा करतो तेव्हा आपल्या मनात जमा झालेली नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात मोकळी होते. दु:ख पकडून ठेवल्यामुळे आपल्यात नकारात्मक विचारांची शृंखला चालू होते व आपल्या आत्मिक शक्तीचा ºहास होतो. क्षमा केल्यामुळे मनाला शांती मिळते व दु:ख पकडून ठेवल्यास नैराश्यता वाढते. म्हणूनच डॉ. रॉबर्ट एनाराईट या व्यक्तीने अमेरिकेत ‘इंटरनॅशनल फरगिव्हनेस इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे ‘इंटरनॅशनल फरगिव्हनेस डे’ हा दिवस आॅगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जगभर साजरा केल्या जातो. महात्मा गांधी म्हणतात की कमजोर व्यक्ती कधीही क्षमा करू शकत नाही तर क्षमा करणे हा शक्तिशाली व्यक्तीचा गुण आहे. यामुळेच म्हणतात ‘क्षमा वीरस्य भूषणम’. संत तुकाराम महाराज म्हणतात की, ‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’. श्रीमत भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की,तेज: क्षमा धृती: शौचमद्रोहो नातिमानिता।भविन्त सम्पंद दैवीमिभजातस्य भारत।।हे अर्जुना, तेज, क्षमा, धैर्य, बाह्य शुद्धी, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वत:विषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. म्हणूनच जीवनाच्या प्रत्येक क्षणी क्षमाशील असणे अत्यंत आवश्यक असते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या