शहरं
Join us  
Trending Stories
1
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
2
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
3
Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या!
4
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
5
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
6
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
7
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका
8
लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं
9
"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..."
10
यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान
11
भयंकर! ४०० प्रवाशांसह बोट नदीत उलटली, ५० जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता
12
VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली
13
"तुमचे १०० बाप आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!
14
रोटी, कपडा और मकान नव्हे; आता हवेत लाइक, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर
15
"मुस्लीम असून मी हिंदूशी विवाह केल्याने...", आंतरधर्मीय लग्नामुळे १० वर्षांनीही सोहा खानला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना
16
नवऱ्याचा काटा काढला अन् बेडवर साप ठेवला, कारण...; बायकोचा विषारी प्लॅन, असा झाला पर्दाफाश
17
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
18
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
19
"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?

दुखऱ्या जिवांना पोटाशी घेणारी ‘बिडी बिडी’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 07:43 IST

आणि हा दिलासा त्याच्या आयुष्यात आणला आफ्रिकेतली सगळ्यात मोठी निर्वासितांची छावणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिडी बिडी’ या केंद्रातल्या ‘परफॉर्मिंग आर्ट सेंटर’ने!

साऊथ सुदानमधून युगांडाच्या आश्रयाला आलेला सीझर गॉडफ्रे हा निर्वासित तरुण मुलगा अवघ्या २१ वर्षांचा आहे.  त्याने लहान वयात खूप हिंसा पाहिली, अनुभवली. त्याच्या आई-वडिलांचा खून डोळ्यांनी पाहिला. ‘माझ्या समाजातल्या लोकांच्या मते, मी पुरता वाया गेलो होतो. सिगारेट्स ओढायचो. दारू प्यायचो. उपद्रवी होतो. नंतर माझ्या आयुष्यात म्युझिक आलं आणि मी बदललो, मी गातो तेव्हा मी सगळं विसरतो,’ असं हा मुलगा सांगतो तेव्हा ती त्याची एकट्याची नाही तर त्याच्यासारख्या अनेक निर्वासितांची प्रातिनिधिक गोष्ट असते. आणि हा दिलासा त्याच्या आयुष्यात आणला आफ्रिकेतली सगळ्यात मोठी निर्वासितांची छावणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिडी बिडी’ या केंद्रातल्या ‘परफॉर्मिंग आर्ट सेंटर’ने!

युगांडा हा पूर्व आफ्रिकेत वसलेला छोटासा देश. हा देश खासकरून तिथल्या वन्यजीव समृद्धीसाठी ओळखला जात असला तरी अलीकडच्या काळात नागरी युद्ध आणि दहशतवादी, गुन्हेगारी कारवायांसाठीही युगांडा कुप्रसिद्ध आहे. युगांडाची आणखी एक ओळख मोठी ठसठशीत आहे. आफ्रिकेतील  सर्वाधिक निर्वासितांचं वास्तव्य सध्या युगांडामध्ये आहे. आफ्रिकेतली सगळ्यात मोठी निर्वासितांची छावणी म्हणून ओळखलं जाणारं ‘बिडी बिडी’ हे केंद्र अनेक कारणांसाठी महत्त्वाचं आहे. याच बिडी बिडीमध्ये एक ‘परफॉर्मिंग आर्ट सेंटर’ आहे. निर्वासितांच्या  आयुष्यातले घाव भरून काढण्यासाठी आर्ट थेरपी हे सेंटर देतं. 

या केंद्राच्या परिसरात आपल्याला एखादं वाद्य वाजवण्याची संधी मिळावी किंवा गाणं रेकॉर्ड करायला मिळावं, या अपेक्षेने तरुण-तरुणी जमतात. इथलं भलंमोठं अंजिराचं झाड हा या सगळ्यांचा हक्काचा आसरा. या झाडाखाली जमायचं आणि नाचायचं, गाणी म्हणायची हा इथे येणाऱ्यांचा शिरस्ता. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोहून युगांडात संगीत शिकवण्यासाठी आलेले एडवर्ड बायेंबा स्वतः एक निर्वासित आहेत. सीझर गॉडफ्रे हा त्यांचाच शिष्य. २०२२ मध्ये या सेंटरचं काम सुरू झालं.  युगांडामध्ये सुमारे १.७ मिलियन निर्वासित आहेत. त्यांपैकी ७५ टक्के महिला आणि मुलं आहेत. त्यापैकी २५ टक्के निर्वासितांचं वय १५-२४ दरम्यान आहे. 

निर्वासित लोकसंख्येपैकी सुमारे ५३ टक्के लोकसंख्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. युगांडामध्ये निर्वासितांसाठी मुक्तद्वार धोरण आहे. सुदान, साऊथ सुदान, बुरुंडी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांमधले बहुतेक निर्वासित इथे येतात. युगांडामध्ये त्यांना आरोग्य आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधा मिळतात. ते तिथे काम करू शकतात आणि सहज कोणत्याही निर्बंधांशिवाय वावरू शकतात. निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी संगीत आणि मनोरंजन ही माध्यमं वापरण्याच्या उद्देशाने सिना लोकेता ही स्वयंसेवी संस्था, टू फाउंडेशन ही स्वीस सामाजिक संस्था आणि प्लेयिंग फॉर चेंज फाउंडेशनच्या पाठबळावर हे बिडी बिडी परफॉर्मिंग आर्ट सेंटर कार्यरत आहे. 

इथे येणारे निर्वासित कमी वयातच बरंच काही बघून, सोसून आले आहेत. त्यांच्या मनावर झालेल्या आघातांचे घाव कमी करण्यासाठी, समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी संगीत आणि नृत्य यांचा वापर केला जातो.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीSouth Africaद. आफ्रिका