शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
2
मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
3
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
4
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
5
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
6
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
7
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
8
कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का
9
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी
10
मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
12
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
13
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
14
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
15
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
18
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल: महायुतीची लाडकी बहीण आदिती तटकरे जिंकल्या; औपचारिक घोषणा बाकी!
19
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."
20
Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार

बिलावल भुत्तो, तुमची जीभ आवरा !

By विजय दर्डा | Published: December 19, 2022 8:07 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी वापरलेली भाषा केवळ उद्धटच नव्हे, नीचपणाची हद्द होय!

विजय दर्डा,चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड,लोकमत समूहभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी ज्या शब्दांचा वापर केला ते इतके घाणेरडे आणि नीच होते की मी त्यांचा उल्लेखही करू शकत नाही. पाकिस्तानचा कुणी नेता भारताबद्दल काही चांगले बोलेल अशी अपेक्षाच नसावी, हे मला कळते; पण तिथल्या लोकप्रतिनिधीचे विचार इतके नीच असावेत? बिलावल जे बोलले, त्यामुळे प्रत्येक भारतीय दुखावला गेलेला आहे. त्यांना एवढेच सांगावे म्हणतो, आपली लायकी ओळखा आणि आपल्या जिभेला लगाम घालायला शिका!

बिलावल, तुमची आई बेनझीर भुत्तो आणि आजोबा झुल्फिकार अली भुत्तो यांनी कायम शालीन भाषा केली हे तुम्ही विसरला आहात. त्यांच्या घरात तुमच्यासारखा कुलकलंक निपजेल अशी त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल, त्यांना किती क्लेश होत असेल? एवढे लक्षात ठेवा की, तुम्ही ज्या देशाचे परराष्ट्रमंत्री आहात, तो देश इतर देशांनी फेकलेल्या तुकड्यांवर गुजराण करतो आहे. हे तुकडे बंद झाले तर तुमच्या देशात हाहाकार माजेल. आपल्या लोकांची पोटे भरण्यासाठी तुमच्याकडे चवन्नी नाही, हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. एक कर्ज चुकवण्यासाठी तुम्ही दुसरे कर्ज घेता. कधी अमेरिकेच्या मांडीवर जाऊन बसता, तर कधी चीनच्या मांडीला चिकटता. तुमच्या नेत्यांना मी दोष तरी कसा देऊ? कारण तुमच्या इथली सत्ता खरे तर लष्कराच्या ताब्यात.

लष्कराच्या मनात आले तर ते तुमच्या नेत्यांना झुरळासारखे उचलून फेकून देतात. तुमच्या देशात किती लष्करी राजवटी आल्या आणि किती काळ खरी लोकशाही होती याचा जरा हिशोब लावून पाहा. तुमच्या आजोबांना याच लष्करशहांनी फासावर लटकवले आणि तुमच्या आईचीही हत्या केली, हे तुम्ही विसरला आहात का? तुमच्या विचारांचा धिक्कार करावा तेवढा थोडा ! बिलावल, तुम्ही कधी खऱ्या स्वातंत्र्याची चव चाखली आहे? पाकिस्तानमधल्या तुमच्यासारख्या नेत्यांची ही अशी दुर्दशा असताना तुम्ही जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाच्या सर्वांत लोकप्रिय पंतप्रधानांविषयी घाणेरडे बोलताहात यावरून तुमच्या बौद्धिक दिवाळखोरीचेच दर्शन होते. बिलावल, तुम्ही तुमचे समकालीन, तुमचे पूर्वसुरी जेव्हा काश्मीरच्या गोष्टी करता, तेव्हा मला खरे तर तुम्हा सगळ्यांची कीव येते. तुम्ही कधी आमच्या काश्मीरच्या भूमीला समजून घेण्याचा प्रयत्न तरी केलाय का? मुघल बादशाह जहांगीर जेव्हा पहिल्यांदा काश्मीरमध्ये गेला तेव्हा त्याने म्हटले होते'गर फिरदौस बर रु ए जमीं अस्त,हमी अस्त ओ हमीं ओ हमीं अस्त'.

याचा अर्थ जर जमिनीवर स्वर्ग कुठे असेल तर तो येथेच आहे, येथेच आहे, येथेच आहे!

आणि तुम्ही? पाकिस्तानच्या लष्करशहांनी या स्वर्गाचा नरक व्हावा यासाठी हरप्रकारचे प्रयत्न केले; पण तुमच्या तुकड्यांवर गुजराण करणारे दहशतवादी कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत. भारतीय सैन्याची ताकद तुमच्या देशाने १९६५, १९७१, १९९९ मध्ये पाहिली आहे. त्यावेळी तुमची बेइज्जती झाली होती. १९७१ साली तुमचे ९३ हजार सैनिक शरण आले होते हे तुमचे पाकिस्तानी नेते विसरलेले दिसतात.

पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया चालल्या असतील तर तुम्ही बेशरमपणे भारतावर आरोप करत? बिलावल असे आरोप करताना पहिल्यांदा हा तरी विचार करा की संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या १२६ खतरनाक दहशतवाद्यांच्या यादीतले २७ दहशतवादी पाकिस्तानमध्ये राहतात. दिल्ली, मुंबई, पुलवामा, पठाणकोटपासून ते न्यू यॉर्क, लंडन अशा असंख्य शहरांत तुम्ही पाळलेल्या दहशतवाद्यांनी रक्तपात घडविले आहेत. तुम्ही म्हणता, दहशतवादाचे सर्वाधिक घाव पाकिस्तानने झेलले आहेत. घरात साप पाळला तर कधी ना कधी तो तुम्हाला चावणारच! तो काय फक्त शेजारी देशाला चावत राहील का? मेहबूबा हीना रब्बानी खार तुमच्या परराष्ट्रमंत्री होत्या तेव्हा साप चावण्याची ही गोष्ट हिलरी क्लिंटन यांनी थेट त्यांनाच ऐकवली होती, विसरलात? लख्खी, हाफीज सईद, मसूद अजहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम यांच्यासारख्या पिशाच्चांना पाळणारे तुम्ही पाकिस्तानी नेते कोणत्या तोंडाने भारतावर आरोप करता? लष्करशहांसोबत तुम्ही पाकिस्तानी नेत्यांनी इस्लामचा ठेका घेऊन ठेवला आहे त्याची तर गोष्टच करू नका.

तुमच्या देशाची जेवढी लोकसंख्या आहे. जवळजवळ तितकेच मुसलमान आमच्या देशात राहतात. भारतामध्ये राहणारे मुस्लीम स्वस्थ आणि शांततापूर्ण जीवन जगतात. अवादात्मक घटना तर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात घडत असतात. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा तेथे अल्पसंख्यांकांची लोकसंख्या २३ टक्के होती. आता ती ३.५ टक्के इतकीच उरली आहे. हे माहिती आहे ना तुम्हाला? तुम्ही बांगलादेशी मुस्लिमांशी कृरपणे वागलात. अहमदिया समुदायाशी तर आजही क्रौर्याने वागता. हे तुमचे चरित्र आहे आणि भारतात? इथे अल्पसंख्यांकांच्या संख्येत वाढच होत आलेली आहे.

बिलावल, तुम्ही असा वा झरदारी या कोणी लष्करप्रमुख, तुमचे दुःख मी समजू शकतो. हिंदुस्थानला नष्ट करण्याचा हरसंभव प्रयत्न तुम्ही करत असता आणि स्वतःच नष्ट होत राहाता. हिंदुस्थान जगातली पाचवी आर्थिक शक्ती झाला आहे. लवकरच आम्ही तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू. जी २० चे अध्यक्षपद, तसेच संयुक्त राष्ट्र परिषदेचे एक वर्षासाठीचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यामुळे तुमचा मत्सर जागृत झालेला दिसतो. पाकिस्तान इतका रसातळाला का जातो आहे याचा विचार तुम्ही सारे नेते एकत्र बसून करत का नाही?

थोडीफार लाज शिल्लक असेल तर तुमच्या नागरिकांचे हाल एकदा डोळे उघडून पाहा. अन्नधान्य, पाणी, वीज, औषधे, रोजगार यासाठी लोक टाचा घासत आहेत. शेतकरी आणि तरुण उद्ध्वस्त झाले आहेत. तुमचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना हे समजले होते. पाकिस्तानसाठी ते एकमेव भरवशाचे गृहस्थ होते; पण तुम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलात! जरा ठिकाणावर येण्याचा प्रयत्न करा! हिंदुस्थानवर टीका करताना तुमचीच जीभ खराब होते आहे 'सर्वे भवन्तु सुखिन: असे म्हणणारी आमची संस्कृती आहे. आम्ही पुढे ज्ञात आहात आणि जात सह तुमच्या सडक्या जिभेमुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही, इतके लक्षात असू द्या.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी