शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

‘हवाहवासा’-‘कडू’ आणि ‘नकोसा’-‘गोड’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 7:41 AM

कृत्रिम बुद्धिमत्तेला शब्दांमधील गणिती सहसंबंध कळतो, अर्थ नाही ! पण कृत्रिम बुद्धिमत्ता आपले भाषिक-सांस्कृतिक पूर्वग्रह, दुराग्रह दाखवू शकते !

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक

एक छोटा  भाषिक प्रयोग करून बघा. दोन शब्द घ्या. उदाहरणार्थ- हवाहवासा आणि नकोसा. हे संकल्पनांचे कप्पे समजा. मग तिसरा कोणताही शब्द घ्या. त्याला यापैकी एका कप्प्यात टाका. चूक-बरोबर हा मुद्दा नाही. नैसर्गिकपणे किती पटकन तुम्ही तिसरा शब्द एका कप्प्यात टाकू शकता, हे महत्त्वाचे आहे. कप्पे करण्यासाठी आता शब्दांची दुसरी जोडी घ्या. उदाहरणार्थ गोड आणि कडू. पुन्हा एखाद्या शब्दाची त्यानुसार वर्गवारी करा.

इथपर्यंत सोपे वाटेलच. आता हवाहवासा व गोड अशी एक जोडगोळी करा आणि नकोसा व कडू ही दुसरी. आता या जोडगोळ्यांच्या कप्प्यात इतर शब्द टाकून बघा. तरीही फार अवघड नाही. आता जोडगोळ्या बदला. म्हणजे हवाहवासा व कडू आणि नकोसा व गोड या जोडगोळ्या होतील. त्यात शब्द बसवून बघा. अवघड वाटेल. वेळ लागेल. याचे कारण मुळातच भाषिक-सांस्कृतिक, जैविक अनुभवांमुळे आपल्याला कडू व हवाहवासा किंवा गोड व नकोसा यांची सांगड घालणे अवघड बनते. उलट गोड व हवाहवासा किंवा कडू व नकोसा यांच्यात आपल्याला चटकन सामायिकता दिसते.अशाच काही सामायिकता  मानवी वा सांस्कृतिक गुणवैशिष्ट्ये यांच्याही बाबतीत झालेल्या दिसतील. म्हणजे ‘मराठी माणूस व नोकरीपेशा, नाटकप्रेम’, ‘गुजराती माणूस व व्यापार-उद्योगशीलता’ वगैरे जोड्या स्वाभाविक वाटतात तर ‘मराठी माणूस व उद्यमशीलता’ किंवा ‘गुजराती माणूस व सैनिकी पेशा’ वगैरे जोड्या अस्वाभाविक.

आता हे वाटणे प्रत्यक्षात बरोबर की चूक, योग्य की अयोग्य हे इथे महत्त्वाचे नाही. हा सहसंबंध चटकन मनात येणे, तो बरोबर भासणे महत्त्वाचे ! - यालाच आपण भाषिक-सांस्कृतिक पठड्या किंवा पूर्वग्रह म्हणतो. ते मनात खोलवर दडलेले असतात. बहुतेकवेळा आपल्या भाषेतूनही ते कधी वरवर तर कधी खोलवर प्रकटत असतात. व्यक्तीच्या मनातील असे सुप्त सहसंबंध (इम्प्लिसिट असोसिएशन) मोजण्याच्या काही लोकप्रिय, परंतु वादग्रस्त अशा संख्यात्मक चाचण्याही निघाल्या आहेत. भाषिक, सांस्कृतिक संस्कारातून किंवा वास्तवातून मनात निर्माण झालेला संकल्पनांचा हा सहसंबंध कृत्रिम बुद्धिमत्ता  उत्तमपणे मापू शकते. 

कोणत्या शाब्दिक संकल्पनांची एकमेकांशी गाढ मैत्री आहे, कोणाचा एकमेकांशी नुसताच परिचय आहे, कोण अनोळखी आहे तर कोणत्या संकल्पनांमध्ये वितुष्ट आहे हे सारे कृत्रिम बुद्धिमत्ता शोधू शकते. फक्त तिला विदा पुरवायची, दिशा दाखवायची आणि प्रशिक्षण द्यायचे. ती शब्दांच्या सहसंबंधाचे तपशीलवार नकाशे तयार करू शकते.

तुम्ही म्हणाल हे काम तर भाषाशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञही करतच असतात. ते खरेही आहे. पण त्यांच्या कामाला मर्यादा आहेत. ते मर्यादितच विदा वापरून सहसंबंध ढोबळपणेच सांगू शकतात. पण प्रचंड विदा वापरून गहनमती हे काम नेमकेपणे करू शकते. शब्दांचे रुपांतर संगणकीय व्हेक्टरमध्ये झाल्यामुळे दोन संकल्पनांमधील अंतर वा सहसंबंध आकड्यांच्या रूपात सांगू शकते. विविध काळातील भाषिक विदा पुरवली, तर या काळात दोन शब्दांमधील संबंधांचा नकाशा किती आणि कसकसा बदलत गेला हे नेमकेपणे सांगू शकते. आपले सुप्त भाषिक-सांस्कृतिक पूर्वग्रह शोधून काढू शकते. हे काम समाजशास्त्रज्ञ, सांस्कृतिक चिकित्सक, विचारवंत आजवर करत आले, यापुढेही करतील. पण त्यासाठी त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची अधिकाधिक मदत घ्यावी लागेल. अर्थात हे वाटते तितके सोपे नाही. कारण मुळात कशा पद्धतीने विचार करून गहनमती हे शोधते हेच कळणे जवळजवळ अशक्य.

त्यामुळे या सगळ्या शोधात गहनमतीचेच काही अल्गोरिदमिक पूर्वग्रह, गृहितक येतात का सांगता येत नाही. ते वास्तवाशी, अनुभवांशी किंवा इतर विदेशी ताडून बघावा लागतो. स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या निखिल गर्ग आणि प्रिन्स्टन विद्यापीठातील कॅलिक्सन व नारायणन आणि सहकाऱ्यांनी दोन वेगळ्या अभ्यासांमधून तसे करण्याचा प्रयत्न केला. आणि निदान अमेरिकेतील नोकरी व्यवसाय, त्यातील स्त्री-पुरुषांचे प्रमाण व त्यानुसार निर्माण होणारे संकल्पनात्मक सहसंबंध याबाबत गहनमतीचे निष्कर्ष व इतर विदेमधून दिसणारे कल यात बऱ्यापैकी सुसंगती आहे असे दिसून आले. पण हे एका भाषेतले, एका क्षेत्रापुरते निष्कर्ष. भाषा, संदर्भ आणि विदा बदलली तर हीच संगती कायम राहील याची खात्री नाही. म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे हे शाब्दिक सहसंबंध शोधताना सावध असले पाहिजे नाहीतर या कृत्रिम बुद्धिमत्तेचेच पूर्वग्रह आपल्याला प्रभावित करू शकतील, असा इशारा हे तज्ज्ञ देतात. असा हा सारा शब्दांचा आणि संकल्पनांचा खेळ.

‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ हे भावगीत आपल्या परिचयाचे आहे. पण त्यात जो कळला तो शब्दांपलीकडे जाणारा अर्थ होता. कृत्रिम बुद्धिमत्तेला शब्दांमधील गणिती सहसंबंध कळतो. पण अर्थ नाही. पण असा अर्थ न कळूनही कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला त्या अर्थांच्याही पलीकडील आपले भाषिक, सांस्कृतिक पठड्या, पूर्वग्रह, दुराग्रह दाखवू शकते. याआधी कधीही उपलब्ध नव्हता असा मोठा आणि स्वच्छ आरसा आपल्यासमोर धरू शकते. आपण तयार आहोत का आपले रूप बघायला?vishramdhole@gmail.com

टॅग्स :technologyतंत्रज्ञान