स्त्री-पुरुष समानतेसाठीचा लढा सनातन आहे. जगभरात शेकडो वर्षापासून हा लढा सुरू आहे. काही देशांत काही प्रमाणात या लढ्याला यश प्राप्त झालं आहे, पण तरीही अनेक बाबतीत स्त्रिया आणि पुरुष यांच्यात आजही भेदभाव केला जातो, स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, तर पुरुषांचा तो 'जन्मसिद्ध अधिकार मानला जातो. काही देशांत या संदर्भात कायदेही करण्यात आले आहेत. कागदावर तर स्त्री-पुरुष समानता दिसते, पण प्रत्यक्षात मात्र महिलांना ते अधिकार दिले जात नाहीत. त्यामुळेच आम्हाला नुसते कायदेशीर आणि कागदोपत्री अधिकार नकोत, तर या अधिकारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करता आली पाहिजे असं अनेक महिला गटांचं म्हणणं आहे. ताजं उदाहरण आहे स्पेनचं. स्पेनमध्ये स्त्री-पुरुष समानतेसंदर्भात २०२०मध्ये कायदा करण्यात आला आहे. यानुसार स्त्री आणि पुरुष, त्यांचं शरीर याबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असं कायद्यातच म्हटलं आहे. पण तेथील महिलांचं म्हणणं आहे की, कायदा करूनही तुम्ही जर आम्हाला 'वंचित'च ठेवणार असाल, तर त्या कायद्याचा उपयोग तरी काय? त्यापेक्षा तो रद्दच करा.स्पेनमधल्या बायका का संतापल्या, त्याला म्हटलं तर तत्कालिक कारण ठरलं 'उन्हाळा'! उन्हाळ्यात जगात
सर्वच ठिकाणी स्विमिंग पूल, तरण तलावांवर मोठी गर्दी होते. उन्हाच्या काहिलीपासून आपली सुटका व्हावी, यासाठी अनेकजण पाण्याचा सहारा घेतात आणि तरण तलावात मनसोक्त डुंबतात. या तरण तलावांवर, स्विमिंग पूल्सवर येणाऱ्या अनेक महिलांचं म्हणणं होतं, इथे आम्हाला टॉपलेस आंघोळीला, स्विमिंगला परवानगी HOICE मिळावी. पण त्या-त्या स्विमिंग पूलवरचे अधिकारी महिलांना असं करण्यापासून परावृत्त करत होते. तुम्हाला 'सार्वजनिक ठिकाणी असं काही करता येणार नाही, असं त्यांना बजावलं जात होतं. महिलांनी यावर आक्रमक रूप घेतलं. त्यांचं म्हणणं होतं, स्त्री-पुरुष समानतेचा कायदा
आहे ना, स्विमिंग पूलवर येणारे पुरुषही टॉपलेस स्विमिंग करतातच ना, मग आम्हाला अडविण्याचा तुम्हाला काय अधिकार? पुरुष जर टॉपलेस स्विमिंग करू शकतात, तर महिलांनाही तो अधिकार आहेच. माय बॉडी, माय चॉईस! यावरून बरीच वादावादी झाली. पुरुष वर्चस्ववादी मनोवृत्तीवर सडकून टीका करण्यात आली. शेवटी सरकारलाही यात हस्तक्षेप करावा लागला. सरकारनं मग स्वतःच या अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं आणि सांगितलं, 'या महिला म्हणताहेत ते बरोबर आहे. स्त्री-पुरुष समानतेचा कायदा आपल्याकडे आहे. त्यामुळे त्यांना टॉपलेस स्विमिंग करण्यापासून, स्विमिंग पूलमध्ये
उतरण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एवढंच नाही, सार्वजनिक ठिकाणी स्त्रिया ब्रेस्ट फिडिंगही करू शकतात. आपल्या बाळाला दूध पाजू शकतात. असं करण्यापासून त्यांना कोणी रोखलं तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.' आता कडक कारवाई म्हणजे ही कारवाई किती कडक असेल? तर असं करण्यापासून महिलांना रोखणाऱ्यांना तब्बल चार लाख तीस हज़ार पाऊंड (सुमारे आम्हाला आनंद आहे!" साडेचार कोटी रुपये) इतका दंड होऊ शकेल! स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस प्रवेश करण्यास पुरुष अधिकारी आम्हाला रोखत आहेत, अशा असंख्य तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. यात स्त्रीवादी महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या स्पॅनिश फेमिनिस्ट ग्रुपचं नाव आहे 'मुग्रॉन्स लिअर्स' (फ्री निपल्स)!
कोणत्या देशात महिलांना स्वातंत्र्य?
अमेरिका, जर्मनी, कॅनडा, स्वीडन इत्यादी देशामध्येही महिलाना सार्वजनिक ठिकाणी 'टॉपलेस' असण्याचा अधिकार आहे. अर्थात त्या-त्या देशातील राज्यांच्या अंतर्गत कायद्यानुसार यात थोडाफार फरकही आहे. स्वीडनमध्ये लैंगिक समानता आणि व्यक्तिगत अधिकारांना सर्वोच्च मानलं गेलं आहे. त्यामुळे तिथल्या महिलांना हा अधिकार आपसूकच आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क प्रांतात १९९२मध्ये उच्च न्यायालयाने निकाल दिला होता की, सार्वजनिक ठिकाणी महिला आणि पुरुषांना समान अधिकार आहेत.
प्रवक्ता मारिओना ट्रॅबल यांचं म्हणणं आहे की, प्रश्न मनमानीचा नाही, पुरुषांची बरोबरी करण्याचाही नाही, तर स्त्री आणि पुरुष समानता, त्यांच्या हक्कांचा हा विषय आहे. पुरुष जर सर्व काही करू शकतात, तर महिला का नाही? हे प्रकरण कुठपर्यंत जाईल, आम्हाला माहीत नाही. पण सरकारनं या संदर्भात न्याय्य भूमिका घेतली, याचा स्पेनची प्रसिद्ध गायिका रोसियो साएजनं तर यापुढे जात मर्सिया येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात एलजीबीटीक्यू' समुदायाचा ध्वज हाती घेऊन स्टेजवर टॉपलेस परफॉर्मन्सही केला! पोलिसांनी तिची 'प्राथमिक' चौकशी केली, पण आता सरकारनंच दम भरल्यानं तेही शांत होण्याची शक्यता आहे.