शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत?

By विजय दर्डा | Published: April 22, 2024 5:44 AM

लोकशाहीच्या या महाउत्सवात मतदार इतके उदासीन का, हा प्रश्न प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकाने स्वत:ला विचारला पाहिजे!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत १०२ जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. कोण जिंकण्याची शक्यता जास्त, आणि कोण पडण्याची शंका वाटते आहे याची आकडेमोड करण्यात राजकीय विश्लेषक  गर्क आहेत. राजकीय पक्षातही कुठे कशाप्रकारे घातपात झाला, एखाद्या नेत्याने आपल्याच  उमेदवाराविरुद्ध कसे काम केले याची चर्चा सुरू आहे. कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले? मागच्या निवडणुकीपेक्षा ते कमी आहे की जास्त? जर कमी मतदान झाले असेल तर कोणाला फायदा होणार? वगैरे वगैरे... अशा प्रकारचे विश्लेषण होणे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि शेवटी ४ जूनला निकाल लागेपर्यंत चर्चा करायला विषय तर हवा! पण माझ्या चिंतेचा विषय वेगळा आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही मधले नागरिक! निवडणूक हे लोकशाहीचे महापर्व असून, यावेळी निवडणूक आयोगाने मतदारांना जागे करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले, तरी मतदानाची टक्केवारी कमी का? 

पहिल्या फेरीतील मतदानाच्या आधीचे दोन दिवस मी मोटारीने चौदाशे किलोमीटर प्रवास केला. याशिवाय वेगवेगळ्या राज्यात फिरलो; सामान्य माणसांशी बोललो. त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.  तरुण मतदारांमधल्या ज्या उत्साहाने २०१४ साली नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळवून दिली तो उत्साह यावेळी मला फारसा दिसला नाही. मतदारांमधला हा उत्साह गेला कुठे? हे तरुणच तर देशाचे भविष्य आहेत. आणि तेच जर उदासीन झाले तर तो लोकशाहीसाठी चांगला संकेत नाही. 

मतदानाची टक्केवारी कमी होईल हे माझ्या लक्षात आले होते. तेच घडले आहे. दोन ते तीन टक्क्यांनी मतदान कमी झाले. शहरी आणि ग्रामीण अशा दोन प्रकारचे मतदार आहेत. सत्तारूढ आणि विरोधी पक्ष एकमेकांवर काय आरोप-प्रत्यारोप करत आहेत यात मी जाणार नाही. परंतु दोन्ही बाजूच्या मतदारांमध्ये मला उत्साह दिसला नाही हे सत्य आहे. आपण नागपूरचेच उदाहरण घेऊ. विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी येथे उमेदवार होते. त्यांच्या विरोधातील विकास ठाकरे स्वत:ला सामान्य माणसांचे जनप्रतिनिधी म्हणवत होते. परंतु नागपूरच्या मतदारांमध्ये अजिबात उत्साह दिसला नाही. कित्येक प्रभागात तर ४२ ते ४३ टक्केच मतदान झाले.

देशातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीची तुलना करता मतदानाच्या टक्केवारीत नक्कीच प्रगती झाली आहे. परंतु तेवढ्यावर समाधानी राहून कसे चालेल? लोकसभेच्या ४८९ तसेच वेगवेगळ्या विधानसभांच्या ४०११ जागांसाठी पहिल्या निवडणुकीची प्रक्रिया ऑक्टोबर १९५१ मध्ये सुरू झाली आणि फेब्रुवारी १९५२ पर्यंत चालली. १७ कोटी ३२ लाख मतदारांपैकी जवळपास ४४ टक्के मतदारांनी त्यावेळी आपला हक्क बजावला. त्या निवडणुकीत काँग्रेसने ३६४ जागा जिंकल्या होत्या. देशातल्या त्या पहिल्या निवडणुकीला सात दशके उलटून गेल्यावर अजूनही आपण मतदानाच्या बाबतीत ७० टक्क्यांच्या खाली कसे काय? हे खरे की ईशान्येकडच्या काही राज्यात मतदानाची टक्केवारी भारताच्या मैदानी प्रदेशापेक्षा जास्त असते. परंतु असे सर्व राज्यात का होत नाही?

निवडणुकीच्या ताज्या आकड्यांवर नजर टाका.  जिथे ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले, असे त्रिपुरा हे एकमेव राज्य आहे. याशिवाय बंगाल, मेघालय, आसाम, सिक्कीम आणि पुदुच्चेरी या ठिकाणी पहिल्या फेरीतले मतदान ७० टक्क्यांच्या पलीकडे जाऊ शकले. मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस मानण्याची गंभीर चूक अनेक लोक करतात. त्यांना असे वाटते की, माझ्या एका मताने  असा काय फरक पडणार? - मग ते मतदान केंद्रावर जातच नाहीत. तीस टक्के लोकांनी मत दिले नाही याचा अर्थ देश चालविण्यात त्यांनी कुठलीही भूमिका निभावलेली नाही. तुम्ही मत देत नसाल तर सरकारवर टीकेचा अधिकार तुम्हाला का असावा? कुठलेही महत्त्वाचे कारण नसेल तर मत न देणाऱ्या नागरिकांबाबत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घेण्याचा विचार केला गेला पाहिजे.

एकीकडे आदिवासी क्षेत्रात जास्त मतदान होताना दिसते, तर दुसरीकडे राजकीय दृष्ट्या स्वतःला जास्त प्रगल्भ मानणारे लोक मतदानालाच जात नाहीत. बिहारला राजकीय दृष्ट्या अतिसक्रिय मानले जाते. पण पहिल्या फेरीत तेथे ५० टक्केही मतदान झाले नाही. काही लोक ‘नोटा’चा हक्क बजावून येतात. मागच्या निवडणुकीत अशा मतदारांची संख्या १% पेक्षा जास्त होती. मतदान कमी होण्याचे आणखी एक मोठे कारण आहे. एखादी व्यक्ती आपल्या मतदान केंद्रापासून दूर खाजगी क्षेत्रातील नोकरी करत असेल तर तिला बॅलेट वोटिंगची सुविधा दिली तर मतदानाच्या टक्केवारीत नक्कीच वाढ होईल. तंत्रज्ञानाच्या युगात हे अशक्य नाही.

अंदमान निकोबार द्वीपसमूहातील शोम्पेन आदिवासींमधील ७ सदस्यांनी पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्क बजावला याचा मला सर्वात जास्त आनंद झाला. ज्या दिवशी सगळे मतदार मतदान करतील, असा एखादा शुभ दिवस भारतीय लोकशाहीसाठी उगवावा, अशी एक इच्छा मी बाळगून आहे. त्या दिवशी अधिक अभिमानाने म्हणता येईल. 

‘जय हिंद’!

टॅग्स :Votingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४