शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

विशेष लेख: २०२४ साठी नरेंद्र मोदी यांची नवी घोषणा? विरोधकांना एकट्याने शिंगावर घेण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:56 AM

Narendra Modi: विरोधकांनी एकत्रित आघाडी उघडण्याचे प्रयत्न चालवलेले असले, तरी त्यांच्या एकत्रित शक्तीला शिंगावर घ्यायला मोदींची तयारी असावी, असे दिसते!

- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांविरुद्ध ‘सीबीआय’, ‘ईडी’, ‘आयकर’ इत्यादी तपास यंत्रणांचा ससेमिरा जरा कमी करा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आली होती; पण ती त्यांनी फेटाळली आहे. काँग्रेस, आम आदमी पक्ष, राजद, राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर पक्षांच्या नेत्यांविरुद्ध एकामागून एक खटले भरले जाऊ लागल्याने परिणामी ते एकत्र येण्यास मदत होईल आणि भाजपला लोकसभेच्या जागा  गमवाव्या लागतील, असे पक्षातील काही जणांना वाटते. अगदी अलीकडे तपास यंत्रणांनी संयुक्त जनता दलाच्या बिहारमधील काही नेत्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा माग घ्यायला सुरुवात केली होती. मात्र, या मोहिमेच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र होऊ लागल्याने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काही जागा पक्षाला गमवाव्या लागतील, असे दिसू लागले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच जाहीरपणे अशी भीती व्यक्त करणारी काही विधाने केली.

कर्नाटकमधील पराभवानंतर शाह यांनी जाहीर सभेत म्हटले, भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत ३०० जागा मिळतील. याआधी ते साडेतीनशे जागांचा दावा करीत होते. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा १४ ते १५ राज्यांमध्ये  विरोधक एकत्र आले तर ते येणाऱ्या निवडणुकीत भाजपपुढे कडवे आव्हान उभे करू शकतात, असे काही ज्येष्ठ नेत्यांना जाणवले. 

२०२४ च्या निवडणुकीत गांधी मंडळींपैकी कोणीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसतील असे काँग्रेसने याआधीच सूचित केले आहे. त्यामुळे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांच्यात नवाच उत्साह संचारला असून, विरोधकांना एकत्र आणण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पाटण्याला झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जींनी काँग्रेसबद्दलचे आपले ममत्व दाखविले.

मोदी मात्र  एकत्रित विरोधकांनाही शिंगावर घ्यायला  तयार आहेत. कदाचित, १९७१ साली इंदिरा गांधी यांनी दिलेली घोषणा त्यांच्या कानात घुमत असावी. ‘वो कहते है इंदिरा हटाव, मैं कहती हूं गरीबी हटाव.’ असे तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या. विशेष म्हणजे भाजपचा पूर्वावतार असलेला जनसंघ त्यावेळी विरोधी आघाडीत होता आणि लोकसभा निवडणुकीमध्ये याही पक्षाचे पानिपत झाले होते. एकत्रित विरोधकांना पराभूत करण्यासाठी २०२४ सालच्या निवडणुकीत मोदी कदाचित काही नवी घोषणा देतील, असे दिसते!

तिसऱ्या आघाड्यांची काँग्रेसला चिंतापाटण्याच्या शिखर बैठकीत काँग्रेस आणि इतर पक्षांशी वादावादी झाल्यानंतर आम आदमी पक्षाने राज्यांमधील इतर प्रादेशिक पक्षांशी सोयरीक करता येते का? हे पाहायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात अशी वेगळी युती होऊ शकते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्रीय समितीशी ‘आप’चा घरोबा होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेही कदाचित केसीआर आणि केजरीवाल यांच्याशी हातमिळवणी करतील. ‘एआयएमआयएम’ हा पक्ष तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीबरोबर आधीपासूनच आहे आणि महाराष्ट्रातही असदुद्दीन ओवैसी यांच्याशी काही गुप्त समझोता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अडचणीत येतील. ओवैसी यांनी यापूर्वीच काँग्रेसला चांगला फटका दिला आहे.

केसीआर मध्य प्रदेशमधील निवडणुका लढविण्याचाही विचार करीत आहेत. विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने बंडखोर काँग्रेस नेते सचिन पायलट हेसुद्धा काही पर्यायांचा विचार करीत आहेत, अशा बातम्या कानावर येतात. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते खासदार हनुमान बेनिवाल आणि बसपा यांच्यात राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी होईल, असेही कळते. निवडणूक डावपेचकार प्रशांत किशोर हे सध्या सचिन पायलट यांना सल्ला देत असल्याचीही माहिती आहे. येत्या काही महिन्यांत छत्तीसगडमध्येही तिसरी आघाडी उभी राहील, अशी शक्यता आहे!  जर असे घडले तर हे सगळे काँग्रेसला खूपच जड जाईल.

अखिलेश यांचे ५०-३० सूत्रसमाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव  येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इतर पक्षांबरोबर आघाडी करतील, हे  जवळपास निश्चित आहे. राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी विरोधी पक्षांच्या पाटणा बैठकीला उपस्थित नव्हते. सत्तारूढ पक्षाला जाट मतपेढी मजबूत करावयाची असल्याने चौधरी यानी भाजपशी सूत जमवायला सुरुवात केली आहे. कुस्तीगिरांना गृहमंत्री अमित शाह यांनी आधीच शांत केले आहे आणि कृषिविषयक तिन्ही बिले मागे घेण्यात आल्यानंतर शेतकरी नेत्यांना भाजपवर रागवण्याचे कारण उरलेले नाही; परंतु अखिलेश यादव यांनी मात्र जयंत चौधरी यांचे मन वळविण्याचे प्रयत्न थांबविलेले नाहीत.  समाजवादी पक्ष लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील ८० पैकी ५० जागा लढविण्याची शक्यता असून, उरलेल्या जागा काँग्रेस आणि इतर पक्षांसाठी सोडल्या जातील. पक्षाची स्थापना झाल्यापासून समाजवादी पक्षाने आतापर्यंत लोकसभेच्या कमाल ३६ जागा जिंकलेल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस