शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

सारांश : कायद्याचा धाक ओसरतोय की काय?

By किरण अग्रवाल | Published: August 13, 2023 3:58 PM

हत्यांसह गुन्हेगारी घटनांमधील वाढ चिंताजनक, समाजस्वास्थ्य बिघडविणारी

क्षुल्लक कारणातून कुणाची हत्या करताना कायद्याचा जराही धाक बाळगला जात नसेल तर अशी स्थिती पोलिसांसाठीच आव्हानात्मक ठरते. यातून समोर येणारी निडरता समाज स्वास्थ्यासाठी घातक असल्याने अकोला पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार करणे अपेक्षित आहे.

एखाद्या मेट्रो शहरातील गुन्हेगारीशी स्पर्धा करावी अशा पद्धतीने सध्या अकोला शहर व जिल्ह्यात हत्यांच्या घटना घडून येत असल्याने समाज मन धास्तावणे स्वाभाविक बनले आहे. दिवसेंदिवस उंचावणारा गुन्हेगारीचा हा आलेख रोखायचा तर त्यासाठी कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे.

सामाजिक स्वास्थ्य ही तशी खूप मोठी संकल्पना झाली, त्यासाठी अनेक बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते; पण ती बिघडण्याच्या संदर्भाने विचार केला तर त्यात गुन्हे, घातपाताचे प्रकारच अधिक परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येते. त्याचदृष्टीने अकोला जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकारांकडे बघितले जायला हवे, कारण त्यातून सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. पातुर तालुक्यात नात्यातीलच एका नराधमाने एका तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना अलीकडेच समोर आली. अशा घटना व्यापक स्तरावर समाजमन भयभीत करणाऱ्या ठरतात. वैयक्तिक तसेच सामाजिक सुरक्षिततेच्या भावनेला त्यातून धक्के बसत असल्याने या प्रकारांकडे गांभीर्याने बघणे गरजेचे होऊन बसते.

अकोला शहर व जिल्ह्यात गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे सात-साडेसात महिन्यांत तब्बल २७ खुनाच्या घटना घडल्या आहेत. यातील दोन खून हे चक्क पिस्तूलने गोळी झाडून केले गेले आहेत. प्राणघातक हल्ल्यांचे प्रकार ३५ ते ४० घडले आहेत. छोट्या मोठ्या चोऱ्या वा लुटीचे प्रकारही काही कमी नाहीत. अकोल्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे असे राजकीय स्वरूपाचे आरोप योग्य ठरणार नाहीत, मात्र कायद्याचा धाक कमी होत चालला आहे की काय, असा प्रश्न ही आकडेवारी पाहता नक्कीच उपस्थित व्हावा. मेट्रो शहरांनाही लाजवणारी ही हत्यांची आकडेवारी आहे.

विशेष म्हणजे अतिशय किरकोळ कारणातून थेट खून व भोसकाभोसकीचे प्रकार घडून आल्याचे दिसून येते. याच आठवड्यातले उदाहरण घ्या. हिंगणा फाटा परिसरात केवळ शिवीगाळ केल्याचा राग आल्याने एका युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली गेल्याची घटना घडली. मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले आहे. चालू वर्षात आतापर्यंत जिल्ह्यातून ११२ मुली बेपत्ता झाल्या, त्यातील ७२ जणींना शोधून परत आणले गेले. म्हटली तर ती वैयक्तिक बाब आहे, परंतु मुलींची असो की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची; कायद्याची फिकीर न बाळगता काही करून जाण्याची त्यांची मानसिकता कशी बळावत चालली आहे हेच यातून स्पष्ट व्हावे व तेच खरे धोकादायक आहे.

प्रत्येक गुन्ह्यामागील कारणे भलेही वेगवेगळी असतात, परंतु त्यात एक बाब जोडीला असते ती म्हणजे कायद्याबद्दलची निडरता. अन्यथा थेट कुणाचा जीव घेण्यापर्यंत मजल गाठलीच जात नाही. यासाठीच कायद्याचा धाक असणे गरजेचे असते. विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध तब्बल २७८ कारवाया केल्या गेल्याचे पाहता संबंधितांना पोलिसांचा धाक उरलेला नाही ही बाब उघड होणारी आहे. सार्वजनिक पातळीवर दहशत निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्याच परिसरात मिरवले जाते ते त्याचसाठी. अकोल्यात अशी कुणाची ''वरात'' काढली गेल्याचे अलीकडील उदाहरण नाही. उगाच ती काढली जावी असेही कुणी म्हणणार नाही, परंतु राजरोसपणे बोकाळू पाहणाऱ्या गुंडगिरीला रोखायचे तर तेच गरजेचे असते. त्यासाठी चौका-चौकांत पावत्या फाडणाऱ्या पोलिसांसोबतच गुन्हेगारांना वठणीवर आणणारे पोलिसदादा दिसणे अपेक्षित आहे.

सारांशात, अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता ग्राफ चिंतादायी आहे. शैक्षणिक व मेडिकल हब म्हणून पुढे येत असलेल्या अकोल्याच्या प्रगतीस ही वाढती गुन्हेगारी मारक ठरणारी असल्याने यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करताना ''माझे शहर, माझी सुरक्षितता'' या भूमिकेतून ही गुन्हेगारी रोखण्यास सारे मिळून कटिबद्ध होऊया, इतकेच यानिमित्ताने...

-किरण अग्रवाल(लेखक अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी