विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा!

By यदू जोशी | Published: August 25, 2023 11:34 AM2023-08-25T11:34:15+5:302023-08-25T11:35:05+5:30

नऊ महिन्यांनी जन्मणाऱ्या सत्तेच्या बाळाचा बाप कोण असेल आणि त्या बाळाचे नाव काय असेल, हे ठरविण्यासाठीचा खटाटोप राज्यात सुरू झाला आहे!

Special Article on Maharashtra Politics as Every party leader wants to contest for Lok Sabha elections | विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा!

विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा!

googlenewsNext

राज्याच्या राजकारणात गेली चार वर्षे अचाट शक्तीचे जे अद्भुत प्रयोग झाले, त्याने सामान्य मतदारांना पार गोंधळून टाकले. आपण कोणाला, कशासाठी मते दिली होती, असा उद्विग्न करणारा प्रश्न सगळ्यांना सतावत असताना आता लोकसभेच्या चंद्रमोहिमेसाठी सगळेच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. कोणाचे यान 'सेफ लँडिंग' करेल आणि कोणाचे 'क्रॅश' होईल हे मतदार नावाचे वैज्ञानिक ठरवतील. मतांच्या यानातून सत्तेच्या चंद्रावर कोणाला पाठवायचे, याचा फैसला मतदार करतील. गेल्या चार वर्षांत सर्वच मोठ्या पक्षांनी राज्याच्या राजकारणात गेली चार वर्षे अचाट शक्तीचे जे अद्भुत प्रयोग झाले, त्याने सामान्य मतदारांना पार गोंधळून टाकले. आपण कोणाला, कशासाठी मते दिली होती, असा उद्विग्न करणारा प्रश्न सगळ्यांना सतावत असताना आता लोकसभेच्या चंद्रमोहिमेसाठी सगळेच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. कोणाचे यान 'सेफ लैंडिंग' करेल आणि कोणाचे 'क्रॅश' होईल हे मतदार नावाचे वैज्ञानिक ठरवतील. मतांच्या यानातून सत्तेच्या चंद्रावर कोणाला पाठवायचे, याचा फैसला मतदार करतील. गेल्या चार वर्षांत सर्वच मोठ्या पक्षांनी मतदारांना गृहीत धरले. एकत्रित शिवसेना राष्ट्रवादी अन् काँग्रेसच्या मांडीवर बसली. राष्ट्रवादीला अन् कॉंग्रेसला शिवसेना गोड वाटली. भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडले सगळ्यांना पवित्र करून घेत एकनाथ शिंदेंच्या सोबतीने अजित पवारांसोबत पाट लावला. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अन् उपमुख्यमंत्री अशा ट्रिपल रोलमध्ये पाहिले. अजितदादा दोनवेळा उपमुख्यमंत्री अन् एकदा विरोधी पक्षनेते झाले. दोन वर्षांत दोन मोठे पक्ष फुटले. राज्याच्या राजकारणाचा कॅनव्हास इतका कधीच बदलला नव्हता.

प्रत्येकच पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागण्यासाठी धडपडायला लागला आहे. भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात येत्या १३ महिन्यांसाठी (विधानसभेपर्यंत) १०० कार्यकर्ते निवडले आहेत. त्यापैकी प्रत्येकजण ६०० घरी जाईल; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ वर्षातील उपलब्धींचे पुस्तक देईल अन् त्या घरातील एका सदस्याच्या फोनवरून पक्षाने दिलेल्या नंबरला मिस कॉल करेल. एका विधानसभा मतदारसंघात ६० हजार घरी तर एका लोकसभा मतदारसंघात साडेतीन लाख घरी पोहोचण्याचा हा उपक्रम आहे. घर चलो अन् जनसंवाद यात्रेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघांमध्ये पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत आहेत. प्रदेश काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून १० दिवस लोकसंवाद पदयात्रा काढणार आहे. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण कधी पायी, कधी गाड्यांनी फिरतील, लोकांना भेटतील. राहुल गांधींच्या पावलावर पाऊल टाकून नेते फिरणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे यंग टर्कस् रोहित पवार, रोहित आर. आर. पाटील, संदीप क्षीरसागर, सलक्षणा सलगर असे २५-३० जण एकाच बसमधून राज्यभर फिरून वातावरणनिर्मिती करणा असल्याचे समजते. जयंत पाटील यांनी अलीकडेच पक्षाचे जिल्हा प्रभारी नेमले. त्यात रोहित पवारांना भंडारा, गोंदिया दिले. पटेलांच्या गडात रोहित पवार काय करतील ते पाहायचे. आदित्य ठाकरेही योजना तयार करताहेत. अजित पवार गट लवकरच 'अजित पर्व, नवे पर्व' हे अभियान सुरू करत आहे. शरद पवार एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत. चक्क राज ठाकरेही बाहेर पडले आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांना निवडणुकीत यश मिळविणारे नेते म्हणून स्वतःला सिद्ध करायचे आहे.

लोकसभा निवडणुकीला आठ महिने बाकी असताना सगळेच पक्ष इलेक्शन मोडवर गेले आहेत. इतकी घाई कशासाठी? कारण सर्वच राजकीय पक्ष धास्तावलेले आहेत. यशाची खात्री कोणालाही नाही. मतदारांच्या भावनांचा कोणताही विचार न करता मनमानी भूमिका तर घेतल्या पण त्याच मतदारांसमोर आता परीक्षा द्यायची वेळ आल्याने ही धास्ती वाढत आहे. लोकसभेचा पेपर कोणाहीसाठी सोपा नाही. कारण, चार वर्षात राजकारण्यांनी आपापल्या सोईने प्रश्न निवडले आणि त्यांची त्यांच्या सोईनुसार उत्तरे दिली, आता तसे नसेल. मतदार कठीण प्रश्नपत्रिका तयार करतील अन् नेत्यांना अचूक उत्तरे द्यावीच लागतील. भिन्न प्रकारची वाद्ये एकत्र आणून फ्यूजन केले जाते, महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच घडले. त्यातून निघालेले सूर मतदारांना किती भावले, कोण बेसूर राहिले, याचे उत्तर नऊ महिन्यांनंतर मिळणार आहे.

नऊ महिन्यांनी जन्मणाऱ्या सत्तेच्या बाळाच्या बाळाचा बाप कोण असेल आणि त्या बाळाचे नाव काय असेल, हे ठरविण्यासाठीचा खटाटोप सुरू झाला आहे.

Web Title: Special Article on Maharashtra Politics as Every party leader wants to contest for Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.