शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

पोरी खेळतात ते क्रिकेट असतं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 10:03 AM

क्रिकेटने आपली परिभाषा बदलायला सुरुवात केली आहे. महिलांचे आयपीएलही आता येऊ घातले आहे. त्यातून गावखेड्यातल्या अनेक मुलींना संधी मिळू शकेल.

ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा याचा विचार मी करत नाही, आम्ही जिथं वाढलो, जसे जगलो तिथं एवढा विचार करायला वेळ नसतो. तहान लागली आहे, घोटभर का होईना पाणी ग्लासमध्ये आहे, मी पिऊन टाकलं, त्या क्षणी तहान भागली, विषय संपला, पुढचं पुढे... -एका मुलाखतीत महेंद्र सिंग धोनीने एकदा सांगितले होते. स्मॉल टाऊन अर्थात लहान गावात वाढणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीसाठी झगडणाऱ्या अनेकांची ‘प्रोसेस’ धोनी सांगत होता. फार लांबची स्वप्नं न पाहता, आज दोन पाऊलं तरी पुढे सरकता आलं, याचा आनंद किती महत्त्वाचा असतो, याचीच ही गोष्ट. 

तसाच आनंद हरमनप्रीत कौरच्या भारतीय (महिला) क्रिकेट संघाने बांगलादेशात सिल्हेट येथे साजरा केला. टी-ट्वेन्टी आशिया कप सातव्यांदा जिंकत भारतीय क्रिकेटची पताका अभिमानानं उंचावली. विजेता चषक स्वीकारल्यावर हरमनप्रीत जे सांगत होती ते धोनीच्या स्मॉल टाऊन प्रोसेसशी नातं सांगणारंच होतं. ती म्हणाली, ‘आम्ही स्कोअरबोर्डकडे पाहत नव्हतोच, आम्ही आमच्यासाठी लहान लहान (शॉर्ट) टार्गेट्स ठरवली होती. तेवढंच आम्ही पाहत होतो, ते जमलं - यशस्वी झालो!’ 

भारतीय महिला क्रिकेटचा गेल्या २०-२२ वर्षातला प्रवासही या ‘शॉर्ट टार्गेट्स’चीच गोष्ट आहे. मिताली राज, झुलन गोस्वामी नुकत्याच निवृत्त झाल्या. सलग इतकी वर्षे खेळत राहणं, कामगिरी दाखवणं आणि कितीही वाट अवघड झाली तरी क्रिकेटचा मार्ग न सोडणं, हे या दोघींनी आपल्या हिमतीवर करुन दाखवलं. मागून येणाऱ्या मुलींसाठी वाट सोपी केली. वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिक्स, अंजूम चोप्रा, पुनम यादव ही अजून काही उत्तम खेळाडूंची नावं. आज भारतीय संघात उत्तम कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, राजेश्वरी गायकवाड यांच्यासारख्या अनेक मुली लहान शहरांतून, गावांतून आलेल्या आहेत. ज्याला ‘धोनी इफेक्ट’ म्हणतात त्या स्मॉल टाऊन जिद्दीचीच गोष्ट त्या सांगतात.

क्रिकेट हा मुलींचा खेळच नाही, बायकांच्या क्रिकेटला ग्लॅमरच नाही, खेळायला सोबती नाहीत, मैदानं नाही, पीच नाहीत, स्पॉन्सर्स नाहीत, मुलींनी घराबाहेर पडून मैदानावर खेळायला जाणं, हेच ज्या वातावरणाला रुचणारं नाही, त्या वातावरणातून या मुली क्रिकेट खेळू लागल्या. सुदैवानं अनेकींच्या पाठीशी त्यांचे पुरुष प्रशिक्षक, वडील, भाऊ, मित्र उभे राहिले आणि या मुलींनी क्रिकेटला ‘जेंडर डिस्क्रिमिनेशन’पलीकडे न्यायला सुरुवात केली. हरमनप्रीत किंवा स्मृती मंधाना बॅटिंग करतात तेव्हा त्यांची बॅटिंग पाहताना कुणीही सहज विसरुन जावं, की खेळाडू महिला आहे की पुरुष. स्मृतीने अंतिम सामन्यात २५ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या, तिची फलंदाजी अत्यंत शैलीदार, तंत्राचा हात धरुन, तुफान फटकेबाजी करणारी होती. हा खेळ पाहूनही कुणाला प्रश्नच पडला असेल की, क्रिकेट बायकांचा खेळ नाही तर तो केवळ त्याच्या दृष्टीचा किंवा पुरुषी ‘बायस’चा प्रश्न असावा, क्रिकेटचा नव्हे.

क्रिकेटने आपली परिभाषा मैदानाबाहेरही बदलायला कधीच सुरुवात केली आहे. बॅटर, परसन ऑफ द मॅच हे शब्दही सहज स्वीकारले जाऊ लागले आहेत. आता तर महिला आयपीएलचीही घोषणा बीसीसीआयने केली आहे. त्यातून गावखेड्यातल्या अनेक मुलींना संधी मिळू शकेल. निदान पैसा - प्रसिध्दीमुळे तरी पालक आणि समाज आपल्या मुलींचा खेळण्याचा मार्ग अडवून ठेवणार नाहीत. महिला क्रिकेट सामन्यांचंही थेट प्रक्षेपण सुरु झाल्यानं खेळाडू आणि खेळाची लोकप्रियताही वाढीस लागेल आणि आशा करु की, भविष्यात भारतीय महिला संघाने सामना किंवा मालिका जिंकल्यावरही तसाच जल्लोष होईल, जसा पुरुष संघाने जिंकल्यावर होत असतो... अर्थात या खेळाला खरोखर प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देण्यासाठी भारतीय महिला संघाला अजून अशा बऱ्याच मालिका जिंकाव्या लागणार आहेत... अपेक्षांचं ओझं जसं पुरुष क्रिकेट संघांवर असतं, तसंच महिला संघावरही असणारच, त्याला इलाज नाही..

अनन्या भारद्वाज,ज्येष्ठ पत्रकार

टॅग्स :asia cupएशिया कप 2022