शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

कामाच्या ताणाचे बळी टाळायचे असतील, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 12:33 PM

मुद्द्याची गोष्ट : अर्न्स्ट अँड यंग (ईयू) या प्रतिष्ठित कंपनीत कामाला असणारी चार्टर्ड अकाउंटंट अना सबास्टीयन पेरियल या तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्यानंतर यावर चर्चा सुरू आहे. सोबतच तिच्या अंत्यसंस्कारांना कंपनीचा एकही माणूस न जाणे याचीही लोक चर्चा करीत आहेत. जीव राहिला तरच करिअर करता येईल, असा सल्ला देताना काही जण दिसत आहेत. त्यानिमित्त...

डॉ. हमीद दाभोलकरमनोविकार तज्ज्ञ परिवर्तन संस्था

पुण्यात नुकतीच अना सबास्टीयन पेरीयल या २६ वर्षांच्या मुलीचा अतिकामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. आपल्या आजूबाजूला वाढलेल्या कामासंबंधी ताणाच्या प्रश्नाने किती गंभीर स्वरूप धारण केले आहे, याचा हा निर्देशांक आहे. सततची स्पर्धा, दुसऱ्याशी तुलना करत राहणे, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून सतत यशाच्या मागे धावत राहण्याचा प्रयत्न करणरी समाजाची मानसिकता यामधून एक अत्यंत घातक आणि जीवघेणी व्यवस्था आपण निर्माण करत आहोत, हे परत एकदा अधोरेखित झाले आहे. हा प्रश्न केवळ अना आणि तिच्या कंपनीपुरता मर्यादित नाही. आपल्या आजूबाजूला या ताणाच्या चक्रात अडकलेले असंख्य लोक आपल्याला रोज दिसतात. आपल्यापैकी देखील अनेक जण अशा तणावपूर्ण परिस्थितीत रोज भरडले जात असतील, म्हणून या विषयी आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन बघायला सुरुवात करणे आवश्यक झाले आहे.

आपण सर्व सध्या भोवळ येईल, अशा गतीने आयुष्य जगतो आहोत. दैनंदिन जीवनामधील विरंगुळा व विश्रांतीच्या जागा झपाट्याने कमी होत आहेत. सातत्याने कष्ट करायची तयारी असलेल्या वर्गासाठी कधी नव्हे एवढ्या विविध संधी सध्या दृष्टीक्षेपात आल्या आहेत. संधीची उपलब्धता हे एक दुधारी शस्त्र आहे. वैयक्तिक आयुष्यात एका मर्यादेपेक्षा जास्त संधी या मानवी मनाला गोंधळात टाकतात. तसेच, उपलब्ध संधी साधण्यासाठी मोठ्या जनसमूहात चुरस असल्यामुळे आयुष्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये एक टोकाची स्पर्धात्मकता दिसून येते. 

आणखी कशाने येतोय ताण?

आपल्या आयुष्यात समाधानाने जगण्यापेक्षा पैसा, गाडी, बंगला, महागडे कपडे, फोन या सगळ्या भौतिक गोष्टींना अवास्तव महत्त्व देणारी मानसिकता निर्माण झाली आहे.

एका बाजूला आयुष्यामध्ये सातत्याने वेगाने धावणे, ते करीत असतानाच उपलब्ध असंख्य पर्यायांमधून आपल्याला हवे ते पर्याय निवडणे ही गोष्ट निश्चितच ताणदायक आहे.

त्याचबरोबर जर आयुष्याच्या सार्थकतेचे भानदेखील गमावले गेले असेल, तर जी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, ती सध्या आपण समाज म्हणून अनुभवतो आहोत.

जवळच्या नाते संबंधांमधील विसाव्याच्या जागा या परिस्थितीमध्ये आपल्याला आधार देणाऱ्या ठरत असतात. बदलत्या जीवनशैलीमध्ये नातेसंबंधांची वीणदेखील उसवू लागल्यामुळे या हक्काच्या जागादेखील कमी होत चालल्या आहेत.

अतिकामाचा गौरव हे वर्ककल्चर काय कामाचे?

अनेक आयटी व इतर कंपन्या कर्मचाऱ्यांकडे केवळ एक साधन म्हणून बघत असतात. सातत्याने कामाचा दबाव वाढवणारे आणि अतिकाम करण्याचा गौरव करणारे एक वर्ककल्चर जाणीवपूर्वक तयार केले जाते. म्हणूनच नारायण मूर्ती यांच्यासारखे लोक हे कामाचे तास आठवड्याला सत्तर पेक्षा अधिक करण्याची मागणी करतात. साहजिक आहे की अना व तिच्यासारखे असंख्य जीव त्यात भरडले जातात. या सगळ्या गोष्टींमधून निर्माण होणारे ताण लक्षात घेता काही देश हे कामाची वेळ सोडून कर्मचाऱ्यांना संपर्क करणे हे कायद्याने प्रतिबंधित करू लागले आहेत. यंदा जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहातील थीमदेखील ‘कामाच्या ठिकाणी येणारा ताण कसा कमी करावा’ या विषयाला धरून आहे.

‘सिर सलामत तो पगडी पचास’ हे कायम लक्षात असावे...

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याच्या विषयी सजग असणे हे केवळ मानवी हक्क  दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही, तर ज्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्य संवर्धनावर भर देतात त्यांना या धोरणांचा दीर्घकालीन प्रवासात आर्थिक पातळीवर देखील फायदा होतो, असे दिसून येत आहे.

कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामाला योग्य प्रकारे नकार देण्याचे कौशल्य शिकणे आवश्यक आहे. शेवटी जर कंपनी आपल्या आरोग्याचा विचार करत नसेल, तर आपण तरी कंपनीच्या यशाचा किती विचार करावा, हा प्रश्न पडणे अजिबात चुकीची गोष्ट नाही.

वेळ पडल्यास कमी खर्चात, कमी महत्त्वाकांक्षी राहून समाधानी आयुष्य जगण्याची ‘ओल्डफॅशन’ जीवन पद्धती इथे आपल्या कामी येऊ शकते! ‘सिर सलामत तो पगडी पचास’ हे आपण विसरता कामा नये.

जर आपले भावनिक स्वास्थ्य अतिरिक्त कामाने बिघडते आहे, असे लक्षात येत असेल, तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात कमीपणा समजू नये. आपले प्राधान्यक्रम तपासून त्यात बदल करण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो. 

टॅग्स :Puneपुणे