शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

शरद पवार : जखमी वाघाची निकराची झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 7:50 AM

वय आणि आजार यामुळे त्यांच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी त्यांचे धूर्त मन मुळीच सुस्तावलेले नाही, हे स्पष्ट दिसते आहे!

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार |

युद्ध सैनिक लढतात; परंतु सेनापतीच ते जिंकून देतात. निवडणुका विचारसरणीच्या आधारे लढवल्या जातात; पण लढवय्ये नेतेच त्या जिंकून देतात. तीन प्रभावी पक्षांतील संधिसाधूपणा, पक्षांतरे, कपटी प्रचार आणि राजकीय भ्रातृसंहाराच्या रणांगणात, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधील आजचे अद्वितीय महाभारत लढले जात आहे.  शिवसेना (उद्धवसेना), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची मविआ विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदेसेना) यांची महायुती असा हा मुख्य आखाडा आहे. विजय कोणाचाही होवो, लागलेला निकाल पक्षीय प्रभाव ओलांडून, राजकारणावर अमिट ठसा उमटविणाऱ्या दोन दिग्गजांभोवतीच फेर धरणारा असेल. परिस्थितीवश, आज परस्परांचे विरोधक बनले असले तरी ते दोघे, परस्परांविषयी आदर बाळगणारे मित्रही राहिले आहेत. 

महाराष्ट्रातील सामना  म्हणजे सरळसरळ शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील द्वंद्व आहे. पवारांच्या बाबतीत ही लढाई अतिशय महत्त्वाची आहे आणि मोदींच्या दृष्टीने त्यांच्या  करिष्म्याचा  अस्सलपणा जोखणारी ही एक निर्णायक कसोटी आहे. कैक कटकारस्थाने  आणि हातमिळवण्या झाल्यामुळे शरद पवारांना आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह गमवावे लागले; परंतु आजही सामान्य माणसांची त्यांच्यावरील निष्ठा ढळलेली नाही. कोणत्याही महत्त्वाच्या सार्वजनिक मेळाव्यात किंवा पक्षीय  सभेत आजही तेच केंद्रस्थानी असतात. स्वत:च्या कुटुंबीयांनी आणि विश्वासू अनुयायांनीच पवारांचा विश्वासघात केला. आपणच स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पुन्हा प्रस्थापित करण्याचे  उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पवार आता धोरणीपणाने पलटवार करू पाहत आहेत.  स्वत:च्या नियतीशीच दोन हात करण्याच्या जिद्दीने, एखाद्या जखमी वाघाप्रमाणे गुरगुरत, आपल्या  गुहेतून बाहेर झेपावयाला ते सज्ज झाले आहेत.  शिकारी सांगतात की,  जखमी वाघ सर्वाधिक धोकादायक असतो.  पवार मुळीच आपल्या जखमा चाटत बसलेले नाहीत. विरोधकांवर प्रहार करण्याच्या योजना ते मोठ्या धूर्तपणाने आखत आहेत.  देशाच्या राजकीय  पटलावरील सर्वाधिक कुशल आणि हिकमती राजकारणी अशी शरद पवार यांची  ख्याती आहे. तब्बल सहा दशकांचे त्यांचे राजकारण अंतिम टप्प्यावर आलेले असताना,  आजही ते अतर्क्यच राहिलेले आहेत. सर्व भाजपेतर पक्षांचे  नेतृत्व पवार आजही नेटाने  करत आहेत. वय आणि आजार यामुळे त्यांच्या हालचाली मंदावल्या असल्या, तरी त्यांचे धूर्त मन मुळीच सुस्तावलेले नाही.

पवार जन्माने ‘मराठा’ आणि विचाराने  सच्चे ‘काँग्रेसी’. आपले राजकीय सोबती त्यांनी  बऱ्याच वेळा बदलले असले तरी महाराष्ट्रातल्या फोडाफोडीच्या आणि  ध्रुवीकृत अशा संमिश्र रचनेत  केवळ तेच एकीकरण घडवून आणू शकतात.  लोकसभेत त्यांच्या पक्षाची सदस्यसंख्या दोन आकडीसुद्धा नसली तरी  राष्ट्रीय पातळीवर काही लोकांना ते पडद्यामागचे धुरंधर वाटतात, तर काहींना बलदंड विघ्नेश्वर! राष्ट्रीय नेता अशी रास्त  प्रतिमा असलेले ते एकमेव प्रादेशिक  सरदार आहेत. 

शरद पवार अत्यंत प्रभावी प्रशासक आहेत. कोणत्याही संकटाचे रूपांतर संधीत करण्याचे त्यांचे सामर्थ्य आणि  चापल्य याविषयी  विरोधकही शंका घेत नाहीत. २०१९ मध्ये भाजपने मिळवलेला विजय, अशक्यप्राय  आघाडी घडवून आणून, त्यांनी त्या पक्षाच्या जबड्यातून  हिसकावून घेतला होता. भाजप आणि शिवसेनेने आघाडी करून त्या निवडणुकीत निर्विवाद बहुमत प्राप्त केले होते; परंतु  त्यांच्यात निर्माण झालेल्या दरीचा पद्धतशीर फायदा उठवत पवारांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे सरकार आकाराला आणले. आपल्या मृदू-मधुर  भाषेच्या जोरावर कट्टर शत्रूंनासुद्धा  वश  करण्याचे कौशल्य  हेच पवारांचे खरे सामर्थ्य आहे.  जुन्या वळणाचे राजकीय वर्तन आणि आब न सोडणारी नम्रता यामुळे त्यांना एकप्रकारची विश्वासार्हता आणि आदरयुक्त  स्वीकारार्हता लाभते. चारचौघांत आपल्या रागाचे प्रदर्शन ते सदैव टाळतात.

 वर्ष २०१५ मध्ये शरद पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्तच्या सन्मान सोहळ्यात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुकर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधीही उपस्थित होत्या. त्या दिवशी मोदी म्हणाले, “शरद पवार यांच्यामध्ये सच्च्या शेतकऱ्याचे गुण आहेत. हवा केव्हा बदलते हे त्यांच्या बरोबर लक्षात येतं. आपल्या या गुणांचा वापर राजकारणात ते अतिशय परिणामकारकरीत्या करतात.” पुढे मोदी सरकारने पद्मविभूषण देऊन पवारांचा सन्मान केला. 

वर्ष १९७८ मध्ये  वयाच्या  ३८ व्या वर्षी पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर आजतागायत त्यांनी भारतीय राजकारणावर आपला प्रभाव कायम ठेवला आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी सर्वोच्च पदासाठी नरसिंह राव यांना आव्हान दिले. पुढे  सीताराम केसरी यांची गच्छंती झाल्यावर काँग्रेस अध्यक्षपद न मिळाल्याने सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा काढून  त्यांनी काँग्रेसचा त्याग केला. इतके होऊनही पुन्हा २००४ मध्ये ते केंद्रीय मंत्री बनले आणि  यूपीएच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी सोनिया गांधींनाही स्वीकारले. त्यानंतर गेली २० वर्षे, काँग्रेसबरोबर केलेल्या आघाडीत पवार निष्ठापूर्वक राहिलेले आहेत. काँग्रेसनेही  महाराष्ट्रातील आघाडीचे  निर्विवाद नेतृत्व त्यांच्याकडे सोपवून योग्य प्रतिसाद दिला आहे.  पवारांचे संघटनकौशल्य आणि ग्रामीण, तसेच शहरी जनसामान्यांशी असलेले त्यांचे अनुबंध हे मविआचे सामर्थ्यस्थळ आहे. एवढेच फक्त की, परवा-परवापर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले पवार अखेरच्या काळात आपली छोटीशी जहागीर अबाधित राखण्याच्या प्रयत्नांत गुंतून पडले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस