शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

विशेष लेख: पुतीन आले हो, महायुद्धाची भाषा करीत... अवाढव्य रशियात सत्ता कायम!

By shrimant mane | Published: March 19, 2024 10:48 AM

रशियाच्या अध्यक्षपदी पुन्हा पुतीनच निवडून येणार हे उघड गुपित होते. त्यांच्या परत येण्याने तिसऱ्या महायुद्धाचा घंटानाद आणखी तीव्र झाला आहे.

श्रीमंत माने,  संपादक, लोकमत, नागपूर

अगदी अपेक्षेनुसार रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमीर पुतीन यांची पाचव्यांदा निवड झाली आहे. अकरा टाइमझोन असलेल्या अवाढव्य रशियात, तसेच जगभरातील वकिलातींमध्ये शुक्रवार ते रविवार, असे तीन दिवस मतदान झाले. आपल्याकडे केरळमध्ये थिरूवअनंतपूरम येथेही रशियन नागरिकांसाठी मतदान केंद्र होते. रशियाच्या विघटनानंतरचे विक्रमी ७७ टक्के मतदान यावेळी झाले आणि त्यापैकी तब्बल ८८ टक्के मते घेऊन व्लादिमीर पुतीन पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले. 

हा पाचवा कार्यकाळ पूर्ण केला तर ते जोसेफ स्टॅलिन यांच्यापेक्षा अधिक काळ रशियाच्या अध्यक्षपदी राहणारे नेते ठरतील. त्यानंतर पुतीन यांच्याप्रमाणेच क्रिमिया प्रांत रशियाला जोडून घेणारे अठराव्या शतकातील सम्राट द ग्रेट कॅथरिन हेच त्यांच्यापेक्षा अधिक काळ रशियावर सत्ता गाजविणारे राज्यकर्ते असतील. 

यंदाचे वर्ष हे जगाच्या इतिहासात निवडणुकांचे वर्ष म्हणून नोंद होईल. भारत, अमेरिकेसह जवळपास पन्नास देश यंदा निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि ११ कोटी ४२ लाख मतदारांचा रशिया हा त्यापैकी प्रमुख देश आहे. अमेरिकेप्रमाणेच रशियातही पूर्वी दोनपेक्षा अधिकवेळा कोणाला अध्यक्ष बनता येत नव्हते. पुतीन यांच्यासाठीच तो कायदा बदलला गेला. या विजयाने तेच रशियाचे तहहयात अध्यक्ष राहतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

स्वत: पुतीन यांनी रशिया हे लोकशाही राष्ट्र असल्याचा आणि ही निवडणूक पूर्णत: पारदर्शकपणे पार पडल्याचा दावा केला असला तरी रशियाबाहेर ते कोणी मान्य करायला तयार नाही. उलट ही निवडणूक लुटुपुटुचीच होती, असे म्हणायला भरपूर वाव आहे. एकतर खऱ्या अर्थाने विरोधक म्हणावे, असे कुणी पुतीन यांच्या विरोधात निवडणुकीला उभेच नव्हते. जेमतेम चार-सव्वाचार टक्के मते घेणारे कम्युनिस्ट पक्षाचे निकोलाय खरितोनोव्ह, न्यू पीपलचे व्लादिस्लाव दवानकोव्ह व डेमोक्रेटिक पक्षाचे लिओनिड स्लटस्की, असे तीन उमेदवार पुतीन यांच्या विरोधात उभे होते खरे. परंतु ते डमी वाटावेत, असेच होते. सगळी राजकीय व्यवस्था, माध्यमे व प्रत्यक्ष ही निवडणूक पूर्णपणे क्रेमलिनच्या ताब्यात होती. त्या यंत्रणेने निवडणुकीआधीच काही उमेदवारांना निवडणूक लढण्यास बंदी घातली. 

सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांवर मतदानासाठी दबाव होता, असा आरोप झाला. गोलोस नावाच्या तटस्थ निरीक्षक संस्थेला ती विदेशी एजंट असल्याचे सांगून मतदान केंद्रांवर पोहोचू दिले नाही. गेल्या चोवीस वर्षांत पुतीन यांना प्रखर विराेध करणारे बहुतेक विरोधक एकतर तुरुंगात आहेत किंवा हे जग सोडून गेले आहेत. गेल्या महिन्यात तुरुंगात मरण पावलेले ॲलेक्सी नवाल्नी हे त्या मालिकेतले शेवटचे. नवाल्नी यांच्या पत्नी युलिया यांच्या पुढाकाराने ‘नून अगेन्स्ट पुतीन’ संघटनेच्या नावाने प्रचारकाळात काही ठिकाणी निदर्शने झाली खरी. परंतु निकालावर परिणाम होईल, इतकी ती तीव्र नव्हती. 

रशियन अध्यक्षपदाची लुटुपुटु निवडणूक आणि त्यात पुतीन यांच्या अपेक्षित दणदणीत विजयानंतर अपेक्षेनुसार चीन व उत्तर कोरिया वगळता जगभरातील अन्य देशांनी टीकेचा भडिमार चालवला आहे. २४ फेब्रुवारीला रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाली. नाटो संघटनेची सदस्य राष्ट्रे तसेच अमेरिकेच्या पाठबळावर युक्रेन हे युद्ध तडफेने व मोठ्या हिमतीने लढत आला आहे; पण पुतीन यांच्या विजयाने युक्रेनपुढील संकट गडद झाले आहे. 

युद्धादरम्यान रशियाच्या ताब्यात आलेल्या युक्रेनचे झापाेरिझिझिया, खरसोन, डोनेट्स्क, लुहान्स्क प्रांत तसेच क्रिमियामध्येही या निवडणुकीसाठी मतदान झाले. निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी लष्करी बंदोबस्तात मतपेट्या घेऊन घरोघरी गेले व त्यांनी लोकांकडून मतदान करवून घेतले. मुळात आपल्या युद्धग्रस्त भागात असे मतदान करून घेण्यावरून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की संतापले आहेत. त्यांनी पुतीन यांना पुन्हा हुकूमशहा म्हणत ते सत्तेच्या नशेत धुंद असल्याची आणि युद्धखोर म्हणून हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्या व्यक्तीवर खटला चालायला हवा ती रशियाचा पुन्हा अध्यक्ष बनल्याची कडवट टीका केली आहे. 

जर्मनीने ही छद्म-निवडणूक असल्याचे म्हटले आहे, तर ही निवडणूक अजिबात मुक्त वातावरणात झाली नाही, अशी टीका अमेरिकेने केली आहे. इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डेव्हीड कॅमेरून यांनीही पुतीन यांच्या विजयावर टीकास्त्र सोडले आहे. स्वत: पुतीन यांनी या टीकेचा समाचार घेताना अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेची झाडाझडती घेतली आहे. रशियाची ऑनलाइन मतदान प्रक्रिया अमेरिकेपेक्षा अधिक पारदर्शक आहे. अमेरिकेत मेलवर मतदान होते आणि उमेदवार दहा डॉलरमध्ये मत विकत घेऊ शकतो, असा प्रतिहल्ला पुतीन यांनी चढवला आहे. चीनने मात्र निवडणूक निकालाचे स्वागत करताना पुतीन व शी जिनपिंग यांच्या नेतृत्वात दोन्ही देश आणखी प्रगती करतील, असे म्हटले आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी पुतीन यांचे जाहीर अभिनंदन केले आहे. 

हा विजय पुतीन यांच्या महत्त्वाकांक्षांना अधिक बळ देणारा ठरेल. विजयानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत:च तिसऱ्या महायुद्धाचा उल्लेख केला आणि पाश्चात्त्य जगाला आणि विशेषत: नाटो संघटनेला इशारा दिला. आमच्याशी वागताना सांभाळून राहा. युक्रेनमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करू नका. अन्यथा तिसरे महायुद्ध अटळ आहे, हा त्यांचा इशारा युक्रेन व नाटो संघटनेचे सदस्य असलेल्या देशांपलीकडे जगभर नवे संकट उभे करणारा ठरला, तर आश्चर्य वाटू नये.

shrimant.mane@lokmat.com

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन