शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
3
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
4
Loan EMI : केव्हा कमी होणार लोनचा EMI? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं मोठं भाकीत
5
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
6
पितृपक्ष: पितृ पंधरवड्यातील ७ तिथी सर्वांत महत्त्वाच्या; पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
7
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
8
बजाज IPO घेण्याची संधी हुकली? 'या' बँकेचा शेअर पुढील 2-3 दिवसात होणार रॉकेट; ब्रोकर म्हणाले..
9
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
10
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
11
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
12
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
13
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
14
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
15
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
16
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
17
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
18
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
19
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
20
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू

विशेष लेख: ऑलिम्पिकची पदके मिळवण्यात आपला भारत नक्की कुठे पडतोय कमी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 8:07 AM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण ६ पदके जिंकली आहेत.

रोहित नाईक, उप-मुख्य उपसंपादक

भारतीय संघाने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदकांची कमाई करत यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील आपली मोहिम समाप्त केली. कागदावर ही कामगिरी समाधानकारक दिसत असली, तरी प्रत्यक्षात ही कामगिरी निराशाजनकच ठरली आहे.

भारताने यंदा ऑलिम्पिकसाठी ११७ खेळाडूंचा चमू पाठवला. गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिमध्ये भारताने १२० खेळाडूंचा चमू पाठवला होता. त्यावेळी भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने पटकावलेल्या ऐतिहासिक सुवर्ण पदकासह भारताने एकूण ७ पदके जिंकली होती. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. त्याआधी, लंडन २०१२ ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके मिळवली होती. यंदा मात्र, पहिल्यांदाच पदकांचा दुहेरी आकडा गाठू, असा गाजावाजा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) केला होता. हे लक्ष्य सहज पार होईल, असा विश्वासही वाटत होता. मात्र, घडले भलतेच. दुहेरी आकडा दूर, भारतीय खेळाडूंना टोकियो, लंडन ऑलिम्पिकची कामगिरीही मागे टाकता आली नाही.

अजून काय करावं?खेळाडूंना सुविधा नाही, सुविधा दिल्या. त्यांना आर्थिक पाठबळ नाही, केंद्र सरकारने 'टॉप्स' योजनेद्वारे आर्थिक पाठबळ दिले. खेळाडूंना विदेशात सरावाची संधी मिळावी, तशी संधी केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिली. खासगी प्रशिक्षक नेमण्याची परवानगी दिली. ज्या ज्या मदतीची गरज होती, ती सर्व मदत केली. मग, नेमकं चुकलंय कुठे? हेच कळेनासे झाले आहे. खेळामध्ये हार-जीत मान्य आहेच. पण, अशा सर्वोच्च स्तरावर सातत्याने थोडक्यात येत असलेल्या अपयशामुळे प्रश्न तर विचारले जाणारच.

गमाविलेल्या त्या पदकांची सल बाेचरी

भारताचे नेमकं कुठे आणि काय चुकतंय, याचा आता विचार करण्याची गरज आहे. भारतीय खेळाडू पदकाची आशा उंचावून रिकाम्या हाताने परतताना दिसले. पोडियमच्या जवळ जाऊन माघारी फिरत असलेल्या आपल्या खेळाडूंना पाहून मोठी निराशा झाली. एक, दोन नव्हे तर तिरंदाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, नेमबाजी, टेबल टेनिस आणि कुस्ती या खेळांमध्ये भारताने हातातील पदक अक्षरश: गमावले. जिंकलेल्या सहा पदकांचा आनंद आहेच, पण या गमावलेल्या पदकांची सल देखील आहे.

इथे झाली निराशा...

- तिरंदाजी : मिश्र सांघिक गटात चौथे स्थान.- बॅडमिंटन : कांस्य लढतीत लक्ष्य सेन पराभूत.- नेमबाजी : १० मीटर एअर रायफल - अर्जुन बबूताचे चौथे स्थान.- नेमबाजी : २५ मीटर पिस्टल - मनू भाकरचे चौथे स्थान.- नेमबाजी : स्कीट - महेश्वरी चौहान-अनंतजीत नरुका यांचे चौथे स्थान.- कुस्ती : विनेश फोगाट - १०० ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे अंतिम सामन्यासाठी अपात्र.- भारोत्तोलन : केवळ एक किलो कमी उचलल्याने मीराबाई चानू चौथ्या स्थानी राहिली.

काय चुकीचं बोलले पदुकोण?

बॅडमिंटनच्या कांस्य पदक लढतीत लक्ष्य सेनला पहिला गेम जिंकल्यानंतरही पराभव पत्करावा लागला. यावेळी त्याला झालेली दुखापतही काहीशी कारणीभूत ठरली. मात्र, यानंतर प्रशिक्षक व माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी खेळाडूंच्या खराब कामगिरीवर टीका केली हाेती.

पदुकाेण यांनी म्हटले की, 'सरकारने यंदा सर्व मदत पुरवली. त्यांनी त्यांचे सर्व काम करत खेळाडूंना प्रत्येक बाबतीत पूर्ण पाठिंबा दिला. आता खेळाडूंनी यशासाठी जबाबदारी घ्यावी.' यावर भारताची बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाने पदुकोण यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना, 'हा खेळाडूंचा अपमान असून खेळाडू देशासाठी जीव तोडून खेळतात. त्यांचा आदर राखला पाहिजे,' असे म्हटले होते. 

खेळाडू नक्कीच देशासाठी जीवापाड खेळतात, पण प्रशिक्षकही त्या खेळाडूच्या आणि देशाच्या भल्यासाठीच राबत असतो, हेही विसरता कामा नये. शिवाय ज्या व्यक्तीच्या मताचा आपण विरोध करतोय, त्या व्यक्तीने देशासाठी काय केलंय हेही पाहिले पाहिजे.

फारशा सोयी-सुविधा नसताना पदुकोण यांनी बॅडमिंटनमधील विम्बल्डन मानले जाणारे ऑल इंग्लंड जेतेपद पटकावले होते. तसेच, भारताला पहिले जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे पदकही मिळवून दिले होते.निश्चितच पदुकोण यांच्या काळातील प्रतिकूल परिस्थिती आज नाही. त्यामुळे या आधुनिक युगातील खेळाडूंनी पदके मिळवायलाच हवी.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Vinesh Phogatविनेश फोगट