विशेष लेख: राहुल गांधी अमेरिकेत कोणाकोणाला भेटले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 10:41 AM2023-06-15T10:41:58+5:302023-06-15T10:42:41+5:30
अलीकडेच अमेरिकेत असताना राहुल गांधी व्हाइट हाउसमध्ये गेले होते का? हा प्रश्न दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे?
हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी याच्या अमेरिका दौऱ्याबाबत सध्या एका गोष्ट उत्सुकतेने चर्चिली जाते आहे. अलीकडेच अमेरिकेत असताना राहुल गांधी व्हाइट हाउसमध्ये गेले होते का? - हा प्रश्न राजधानी दिल्लीत सध्या चर्चेचा विषय आहे. काँग्रेस पक्षातील कोणीही ते गेले होते याला दुजोरा देत नाही; अथवा गेले नव्हते असेही म्हणत नाही. सध्या राहुल गांधी युरोपच्या प्रवासात आहेत.
वॉशिंग्टनमधून आलेल्या बातमीनुसार राजनैतिक पारपत्र नसलेल्या या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने परराष्ट्र खात्यातील वरिष्ठ नॅशनल एडि अधिकाऱ्यांची भेट घेतली. काही विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तंत्रज्ञ त्यांच्याबरोबर नवी होते. भारतीय समुदायाला उद्देशून त्यांनी भाषणही केले. योजनाबद्धरीत्या अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांना राहुल गांधी भेटण्याची ही पहिलीच वेळ होती. ते व्हाइट हाउसमध्ये गेले होते, अशा बातम्या आहेत; पण ते तेथे कोणाला भेटले हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. जो बायडेन यांची भेट राहल गांधी यांनी मागितली असेल आणि त्यांना ती मिळाली असेल, ही शक्यता खूपच कमी दिसते. पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या सरकारी दौऱ्यावर येत असताना व्हाइट हाउसकडून असा काही संकेत मिळणे दुरापास्तच! कोणत्याही भारतीय पंतप्रधानासाठी असा दौरा हा ऐतिहासिक मानला जातो. तुळात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
मात्र गेल्या काही काळापासून विशेषतः सोनिया गांधी यांनी त्यांचे पद सोडल्यानंतर राहुल गांधी यांचा स्वीकार वाढता असल्याचे दिसून येत आहे. भारत जोड़ो यात्रा आणि कर्नाटक विधानसभेतील विजयाचा त्याच्याशी संबंध आहे. अर्थात सार्वजनिक ठिकाणी कसे बोलायचे, लोकांशी कसे जोडून घ्यायचे याचे तंत्र राहुल 'गांधी यांना शिकावे लागेल. त्यांना अजून बरेच अंतर कापायचे आहे.
तुषार मेहताना मुदतवाढ मिळणार
मोदींच्या गोतावळ्यातील सर्वशक्तीमान कायदा अधिकारी भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची पाच वर्षांची मुदत ३० जून २०२३ रोजी संपत आहे. नरेंद्र मोदी-अमित शाह या जोडगोळीमुळे ते देशाच्या राजधानीत पोहोचले. चार वर्षे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून काम केल्यानंतर २०१८ साली रंजीतकुमार यांना मुदतवाढ न दिली गेल्याने मेहता सॉलिसिटर जनरल झाले. मेहता यांना मुदत वाढ मिळेल असा विश्वास कायदा क्षेत्रात व्यक्त केला जात असून २०२४ नंतर आर वेंकटरामाणी यांच्या जागी ते भारताचे अॅटर्नी जनरल होऊ शकतात. साधारणता अर्धा डझन ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ची मुदत लवकरच संपत आहे त्यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्यांच्यापैकी काही जणांनी पुढे काम न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे कळते.
एस. जयशंकर इतक्या भराभर हिंदी का शिकत असावेत?
गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेतृत्व हिंदीचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देत आहे. लोकांशी संवाद साधणे तसेच सरकारी पत्रव्यवहार हिंदीतून केला जात आहे. पंतप्रधान, गृहमंत्री अमित शाह आणि इतर मंत्री लोकांशी बोलताना हिंदीचा वापर करतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या हिंदीतील मजकूर वाचायला शिकत असून संसद सभागृहात तसेच बाहेर लोकांशी हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक २००८ साली त्या भारतीय जनता पक्षात आल्या तेव्हापासून त्यांनी हिंदी शिकण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. त्यांना पक्षाचे अधिकृत प्रवक्तेपदही देण्यात आले.
राजकीय निरीक्षकांसाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे अलीकडेच मंत्रिमंडळात आलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही जाहीरपणे बोलताना हिंदीचा वापर करतात. जयशंकर यांनी अतिशय जलद गतीने हिंदी आत्मसात केली, याचे राजनैतिक अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटते. जयशंकर २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत काय? पक्षात कोणालाच याबाबत विशेष माहिती नाही. परंतु तामिळनाडू आणि इतर राज्यांचे दौरे ते वारंवार करत आहेत. अतिशय मोकळे, थेट बोलतात आणि त्यांनी हिंदी वेगाने आत्मसात केली; त्यामुळे कदाचित २०२४ च्या निवडणुकीतील ते स्टार प्रचारक असू शकतात.