शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

विशेष लेख: हाताला काम, पोटाला अन्न, प्रत्येकाला सन्मान : हे साध्य होईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 11:21 AM

Unemployment: ‘आयएलओ’च्या अहवालानुसार, भारतात २०२२ मध्ये अशिक्षित लोकांपेक्षा पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर नऊ पटीने जास्त होता. याचा अर्थ काय होतो?

- राघव मनोहर नरसाळे(अर्थतज्ज्ञ)एखाद्या राष्ट्राची आपल्या लोकांना फायदेशीरपणे रोजगार देण्याची क्षमता त्याच्या सामाजिक आणि आर्थिक स्थिरतेसाठी जबाबदार असते. गेल्या काही वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे ७-८ दशलक्ष तरुण भारतीय जॉब मार्केटमध्ये प्रवेश करत आहेत. पुढील दशकापर्यंत हा ट्रेंड कायम राहील. हे लक्षात घेता, विकसित होत असलेल्या श्रमिक बाजारपेठ, शिक्षण आणि कौशल्याच्या परिस्थितीत रोजगारनिर्मितीची सद्य:स्थिती समजून घेणे महत्त्वाचे ठरते. ही समज भविष्यातील रोजगाराची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी धोरणे तयार करण्यात मदत करते. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंट (IHD) यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेला ‘इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट २०२४’ या संदर्भात मोठे योगदान देतो.

२०००-२०१९ दरम्यान भारताने शिक्षण आणि रोजगाराच्या प्रवासात महत्त्वपूर्ण प्रगती साधली. दुर्दैवाने कोविड काळात या प्रवासाला खीळ बसली. गेल्या दोन दशकांमध्ये शिक्षणाची प्राप्ती लक्षणीयरीत्या सुधारली आहे. उच्चशिक्षित तरुण प्रामुख्याने नियमित पगाराच्या नोकऱ्यांमध्ये काम करताना दिसतात. आपल्या देशात भांडवल सखोलतेसोबत श्रम उत्पादकता सातत्याने वाढली आहे. २००२-२०१९ दरम्यान श्रम उत्पादकता ही दरडोई सकल मूल्यवर्धितवाढीचे प्रमुख कारक राहिली. याच कालावधीत, रोजगार कमी उत्पादक शेतीतून तुलनेने उच्च उत्पादकतेच्या बिगरकृषी क्षेत्राकडे वळले. सेवा क्षेत्र हे २००० पासून भारताच्या वाढीचे प्राथमिक कारक आहे. 

हे सारेच चित्र उत्साहवर्धक असले तरी काळजी करण्यासारखे बरेच काही आहे. आजही, भारतातील रोजगारामध्ये प्रामुख्याने स्वयंरोजगार आणि अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, जवळपास ८२ टक्के कर्मचारी अनौपचारिक क्षेत्रात गुंतलेले आहेत आणि जवळपास ९० टक्के अनौपचारिकपणे कार्यरत आहेत. २००० ते २०१२ दरम्यान, रोजगाराचा वार्षिक वाढीचा दर केवळ १.६ टक्के होता. २०२२ मध्ये ६२ टक्के अकुशल अनौपचारिक शेती कामगार आणि बांधकाम क्षेत्रातील ७० टक्के प्रासंगिक कामगारांना निर्धारित दैनिक किमान वेतन मिळाले नाही. शिक्षणाच्या वाढत्या पातळीबरोबरच तरुणांचे बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. २०२२ मध्ये ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, अशा लोकांपेक्षा पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर नऊ पटीने जास्त होता.

अर्थात, रोजगाराच्या संदर्भातही काही आशावादाचे हिरवे अंकुर आहेत. २०००-२०१९ दरम्यान तरुणांमधली बेरोजगारी जवळपास तिप्पट वाढली (२००० मध्ये ५.७ टक्क्यांवरून २०१९ मध्ये १७.५ टक्के). पण चांगली बातमी अशी आहे की, २०२२ मध्ये तरुणांची बेरोजगारी १२.१ टक्क्यांवर आली आहे. निम्न आर्थिक वर्गाच्या सरासरी मासिक उत्पन्नातही सुधारणा झाली आहे.

देशामध्ये कौशल्ये निर्माण करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे मार्ग शोधावे लागतील. मुलांना सेल फोन वापरून शिकता येईल आणि परीक्षा देता येतील, अशा अभ्यासक्रमांची रचना करणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये आणि कामाच्या ठिकाणी अशा अभ्यासक्रमाद्वारे प्राप्त केलेली प्रमाणपत्रे आणि पदव्या स्वीकारणे आवश्यक आहे. यामुळे स्थलांतरित मजुरांची मुले तसेच महिलांना वर्षे न गमावता कुशल आणि शिक्षित होण्यास मदत होईल. नोकऱ्यांचा दर्जा सुधारणे खूप महत्त्वाचे आहे. तरुण पुरुष शेतकरी—जे देशाचे पोट भरतात—लग्नासाठी धडपडत आहेत. सोलर पॅनेल बसवणे आणि त्यांची देखभाल करणे, ड्रोन व्यवस्थापन, डेटाचलित कीड व्यवस्थापन या क्षेत्रात शेतकरी कुशल होऊ शकतात. यामुळे  समाजात सन्मान वाढून त्यांच्या जीवनमानाचा दर्जाही उंचावू शकेल.

भारत आता जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. या वाढीचा फायदा समाजातील सर्व घटकांना मिळू शकतो, हे सिद्ध करण्याचे आव्हान आणि संधीही आपल्या देशासमोर आहे.raghavmanoharnarsalay@gmail.com

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीjobनोकरी