शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विशेष लेख: गंभीर आजारांच्या उपचारासाठी जगाचे डोळे भारताकडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 9:19 AM

योग्य उपचारांची शाश्वती आणि तुलनेने अल्पदरात उपचार, यामुळे परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे.

डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असो., महाराष्ट्र|

कोणताही दीर्घकालीन आणि प्राण गंभीर आजार सर्वसामान्यांच्या छातीत धडकी भरवतो. त्यातही कर्करोग म्हटले की भल्याभल्यांचे हातपाय गळून जातात. पण कर्करोगावर उपचार होऊ शकतात आणि वैद्यकीय शास्त्रातील काही आधुनिक उपचार पद्धतींनी, काही कर्करोग बरेही होतात आणि बरेचसे नियंत्रणात येतात.

कर्करोगाच्या संदर्भात किचकट आजार आणि त्यावरील उपचारही बरेच महागडे, यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना ‘आता काय करायचे?’ म्हणून धडकी भरते. पाश्चात्त्य देशात विविध आजारांवरील उपचार अतिशय महागडे आणि सधन कुटुंबातील लोकांनाही न परवडणारे असल्याने काही गंभीर आजार उद्भवले की ते भारतात धाव घेतात. योग्य उपचारांची शाश्वती आणि तुलनेने अल्पदरात उपचार, यामुळे परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. भारतातही कर्करोगाच्या रुग्णांची संख्या कमी नाही.

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च या मान्यताप्राप्त भारतीय वैद्यकीय नियतकालिकात, नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, २०२० मध्ये भारतात कर्करोगाचे अंदाजे १४,६१,४२७ रुग्ण होते. हे प्रमाण, दर १ लाख भारतीयांमध्ये सरासरी १०० जण कर्करोगग्रस्त असल्याचे दर्शवते. दर नऊ भारतीयांमधील एकाला आयुष्यभरात केव्हा तरी कर्करोग होण्याची शक्यता असते. पुरुषांमध्ये फुप्फुसांचा, स्त्रियांमध्ये स्तनाचा आणि १४ वर्षांपेक्षा लहान मुलामुलींमध्ये रक्ताचा कर्करोग (लिम्फॉइड ल्युकेमिया) मोठ्या प्रमाणात आढळून आले. संशोधकांच्या अनुमानानुसार २०२५ पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये १२.८ टक्के वाढ होऊ शकते.

कर्करोगाच्या उपचारांसाठी पुढील काही महत्त्वाच्य पद्धती आज उपलब्ध आहेत.

१. शस्त्रक्रिया : यामध्ये कर्करोगाची गाठ आणि आसपासच्या उती काढून टाकल्या जातात. पहिल्या टप्प्यात शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.२. केमोथेरपी : कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबवण्यासाठी, कर्करोगाच्या गाठीचा आकार कमी करण्यासाठी, केमोथेरपीमध्ये काही विशेष औषधे शिरेवाटे दिली जातात. याचा वापर दुसऱ्या टप्प्यानंतर केला जातो.३. रेडिएशन थेरपी : कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी, त्यांची वाढ रोखण्यासाठी आणि ट्यूमर संकुचित करण्यासाठी किरणोत्सर्गी पदार्थांचे उच्च डोस या पद्धतीत वापरतात. शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही अशा प्रमाणात कर्करोगाची वाढ झाली असेल, तर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात रेडिएशन दिले जाते. 

कर्करोग रुग्णाची आर्थिक परिस्थिती बघत नाही. त्यामुळे गोरगरिबांनाच नव्हे, तर मध्यमवर्गीयांसाठीही हे उपचार आर्थिक कुवतेच्या पलीकडे असतात. पाश्चात्त्य नागरिकांची उपचारासाठी भारतात धाव घेण्यामागे केवळ आर्थिक बचत हे कारण नसून भरवशाचा उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि त्यांना मिळणाऱ्या सोयी हेदेखील एक कारण आहे.  कर्करोग, हृदयाच्या शस्त्रक्रिया, मेंदूच्या शस्त्रक्रिया, अवयवारोपण अशा अनेक वैद्यकीय उपचारांसाठी जगभरातून लाखो रुग्ण दरवर्षी भारतात येतात. रास्त दर, उच्च-गुणवत्तेची वैद्यकीय सेवा, अल्पप्रतीक्षा कालावधी, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, वैविध्यपूर्ण उपचार पर्याय, भाषिक आणि सांस्कृतिक संवेदनशीलता.. या सर्व गोष्टींमुळे आपला देश लाखो परदेशी रुग्णांसाठी लोकप्रिय ठिकाण बनत आहे. परंतु आजमितीला काही ठरावीक खासगी हॉस्पिटल्स आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करत आहेत. मात्र या गोष्टींचे नियोजन मोठ्या प्रमाणात, सर्वसमावेशक दृष्टीने, अधिक शिस्तबद्ध आणि आकर्षक व्यावसायिक पद्धतीने जगभरात सादर केले गेल्यास भारतात आणखी रुग्ण येतील. परिणामी आपल्याला अधिक परकीय चलन तर मिळेलच; पण त्यामुळे या वैद्यकीय सेवांचा खर्च कमी होऊ शकेल. त्याचा फायदा निश्चितच परदेशी आणि गरीब भारतीय रुग्णांना मिळू शकेल.

(avinash.bhondwe@gmail.com)

टॅग्स :cancerकर्करोगMedicalवैद्यकीय